Dictionaries | References

माहेरघर

   
Script: Devanagari
See also:  माहेर

माहेरघर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The maternal mansion of a married girl.

माहेरघर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : माहेर

माहेरघर

  न. 
   लग्न झालेल्या मुलीच्या आईबापांचें घर ; तिच्या सासरहून भिन्न असें आप्तस्वकीयांचें घर .
   ( ल . ) आसरा ; विश्रांतिस्थान ; सुखाच्या आश्रयाची जागा . साधुसंतांचें माहेर । बाप रखुमादेवीवर ।
   उत्पत्तिस्थान ; जन्मस्थान . ना तरी सकळ धर्माचें माहेर । - ज्ञा १ . ३१ .
   मायबाप . जरी माहेरें श्रीमंतें होतीं । तुम्हा ऐसीं । - ज्ञा ९ . ३ . [ सं . मातृगृह ; प्रा . माइघ ( ह ) र ; गुज . माहीरुं ] म्ह० माहेराची पेज सर्वांगास तेज ( घरच्या साध्या अन्नाची बरोबरी कशासहि येत नाहीं या अर्थी ). माहियेरें - वि . मायेचें ; माहरच . - शर .
०पण  न. माहेरीं राहणें .
०वाट  स्त्री. 
   स्त्रियांच्या केसांचा उजवीकडें काढलेला भांग ; डावीकडच्या भांगाला सासुरवाट म्हणतात .
   माहेरघर .
०वाशीण   वासी माहेरकरीण - स्त्री . लग्नानंतर आपल्या माहेरीं रहावयास आलेली मुलगी ; माहेरीं आलेली स्त्री .
०वाशीण   - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).
मुरडणें   - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).
०वास  पु. लग्नानंतर मुलीचें माहेरीं राहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP