|
स्त्रीन . मेढ , मेढा पहा . लहान मेढ . आडव्या फळीस , तुळईस धीर देण्यासाठीं खांबासारखा उभा केलेला दुबेळका किंवा बिन दुबेळका लहान खुंट . खळ्यांत मधोमध पुरलेला खांब ; तिवडा . जेवि खळांत वृषांचा घेरा सर्वत्र मेढिला होतो । - मोआश्रम ५ . ८८ . [ मेढ ] मेढीचें केल , ळ - न . ( कों ). १ मेढीच्या वरच्या बाजूस लांकूड ठेवण्यासाठीं राखलेले सुमारें हात भर लांबीचे दोन फांटे ; दुबेळकें . मेढीचा शेंडा . मेढेकरी - पु . आधारस्तंभ ; आधार ; अवष्टंभ . मेढ्या पहा . मेढेकोट - पु . मेढा ; लकडकोट ; लांकडाचें केलेलें दाट , मजबूत कुंपण [ मेढा ] मेढेजोशी - पु . जमीनींत खुंटे पुरुन तिथि इ० कांची गणना करणारा जोशी . भविष्यकथन , शकुन पाहणें , शुभाशुभ काल सांगणें , पंचांग करणें . इ० धंदे करणार्यांचा एक वर्ग किंवा त्यांतील एक व्यक्ति हे शूद्र असून मेढेमताचे अनुयायी असतात . मेढेमत पहा . ( उप . ) गांवचा पिढीजाद , वतनदार जोशी . महारांचा धर्मगुरु . दाकोता पहा . मेढेदाई , मेढेदाईक - वि . शेजार्याच्या आवारापासून आपले आवार भिन्न करण्यासाठीं आपल्या हद्दीवर कुंपण घालणारा शेत इ० चा मालक . [ मेढा + दाय ] मेढेबंदी - स्त्री . मेढेकोट . मेढेंमत - न . उत्तरध्रुवाच्या तार्यावरुन बसविलेलें एक ज्योतिषमत . शूद्रांत हें मत प्रचलित आहे . यावरुन मेढेजोशी किंवा डौरीजोशी यांचा वर्ग निघाला . [ मेढ = ध्रुवतारा + मत ] मेढ्या - वि . ( कुटुंब , सैन्य , मंडळी इ० कांचा ) आधारस्तंभ असलेला ; मेढेकरी ; पुढारी ; मुख्य . लबाडीच्या , लुच्चेगिरीच्या कामांत तरबेज असलेला . मेढेजोशी पहा . [ मेढ ]
|