-
स्त्री. १ कचरा ; घाण ; अनेक प्रकारचा मळ . २ श्वेत प्रदरांतील पांढरा सांका ; लघवींतुन पडणारें वीर्याचें कण . ३ आकाशांतील पांढरें , कापसासारखें ढग ; पातळ पसरलेलें अभ्र . ४ आकाशांतील संध्याकाळचा रंग , आरक्त रंग , ५ जमीन भाजण्याकरितां टाकलेल्या टहाळांवरील जुनें गवत . पानें काटक्या ; शेण कुट इ० चा कचरा ; राब . ६ मुरुम किंवा बारीक खडी . ७ विहिरींतुन खणुन काढलेली माती ; गाळ इ० ८ रस करतांना राखेंत अथवा मातींत पडलेला सोन्या - रुप्याचे कण . ९ नदीच्या तळची वाळु ; पाण्यातील गाळ , घाण ; ( गो .) पाण्याचा तळ १० ( नाविक ) माल भिंजुं नये म्हणुन बांकावर पसरलेली लांकडें . ११ ( सोनारी ) कोळसांची बारीक पुड ; ही पाण्यांत घोटुन तिचा थर मुशीच्या आंतुन देतात . १२ ( कु .) देव . ( सं .)
-
पु. गाढव . ' खरी टेंको नेदी उडे । तानौनि फोडी नाकाडें । ' - ज्ञा . १३ . ७०५ . ' बाइल म्हणे खर मरता तरी बरें । ' - तुगा ८७३ . ( सं . फा .)
-
वि. १ तीव्र ; तिखट ; कडक ; प्रखर ; कढत ( मिर्यें , ऊन , थंडी ). २ ( कों .) ज्याची पाणढाळ फारच उतरती आहे असें ( घर , वाडा वगैरे ). ( कों .) उभट ( नांगर इ० ) ३ झोंबगारें ; बोंचणारें ; कडक ( भाषण , शब्द ). ' खर दुर्वाक्य शरशतें भेदित होतासि जेधवा मर्म । ' - मोकर्ण ४९ . ९ . ४ जास्त ( वजन किंवा माप ). जसें - एका ठिकानाचा शेर दुसर्या ठिकाणच्या शेरापेक्षां जास्त असतो . ५ दाट ; घट्ट ( चिखल , लगदा इ० ). ( सं .)
-
ना. गद्धा , गधडा , गर्दभ , गाढव , रासभ ;
Site Search
Input language: