Dictionaries | References

रिंगणे

   
Script: Devanagari

रिंगणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : रिठा, चोखणी

रिंगणे     

 न. लहान मुलांची तोंडात घालून चोखण्याची वस्तु ; चोखणी .
अ.क्रि.  
रिघणे ; शिरणे ; प्रवेश करणे . चापेआंचेआं सेजारांतु । रीगता झाला । - शिशु १७६ .
उद्युक्त होणे ; तयार होणे . वृक्ष जेणे प्रतिपाळिला । तो त्या आधीन जाहला । कां जो छेदावया रिगाला । त्यासही झाला स्वाधीन । - एभा ७ . ३९४ . [ सं . रिंग = जाणे , हालणे ] रिगम , रिगमु , रिगु , रिगू , रीग - पु . रिघाव ; प्रवेश ; अवकाश ; शिरकाव ; ( गो . ) रिगवो [ दे . रिग्ग ] रिगवणी , रिगवणे - न .
प्रवेश .
आरंभ . झालिया वसंताचे रिगवणे । वृक्ष सपुष्प सफळ तेणे । - एभा १६ . ७२ . रिगनिग , रिगिनिगी , रिघीनिघी - स्त्री . ये जा ; येणे जाणे ; जा ये . पै प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरी तियेचि रिगिनिगी द्वारी । पांचे इही । - ज्ञा १३ . १०२ . [ रिगणे + निघणे ] रिगावा , रीगावा , रिघावा - पु .
प्रवेश ; रीघ ; रिघाव ; प्राप्ति . मग ब्रह्मसाक्षात्कारी रीगावा । तुज मी करीन । - भाए २१२ .
प्रारंभ ; सुरवात . तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । - ज्ञा १८ . ७८१ . रिगुंक , रिगौक - क्रिवि . ( गो . ) प्रवेश होण्याला ; शिरण्यास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP