Dictionaries | References

रुपक

   
Script: Devanagari

रुपक

  पु. एक ताल . ह्याच्या मात्रा सात व विभाग तीन असतात . हा कर्णाटक संगीत पद्धतीतील आहे . ह्याचे मात्राप्रकार पांच आहेत . ते असे - ५ . ६ . ७ . ९ . ११ . सुताळा रुपका । वरि नाचतां पात्रकळिका । - भाए ४६० . रुपकालप्ति - स्त्री . ( संगीत ) चीजेचे बोल व तिचा ताल ह्याने रागाचे प्रकाशन करणे . रुपकालाप - पु . ( संगीत ) रागविस्तार करीत असतां यांत चीजेची अक्षरे व ताल नसून स्वरांच्या समुदायांचे वेगळाले भाग पाडून केलेले रागाचे मंडन किंवा रागविस्तार असतो .
  न. एक अर्थालंकार . जेथे उपमान आणि उपमेय यांचा अभेद वर्णिलेला असतो तेथे हा अलंकार समजावा ; मुख्य बोलण्याचा विषय अन्योक्तीने सांगणे . [ सं . रुप = रुप देणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP