Dictionaries | References

रेंटणे

   
Script: Devanagari
See also:  रेटणे

रेंटणे

 स.क्रि.  
   पदार्थाला पुढे जाण्यासाठी गति देणे ; ढकलणे ; मागून दाब घालणे ; खुपसणे .
   ( कांही अनिष्ट प्रसंग ) प्रतिकार करुन थांबविणे ; संभाळून धरणे ; थोपविणे .
   ( कठिण काम ) नेटाने पार पाडणे ; ( धंदा , नोकरी , उद्योग इ० ) विघ्नास न जुमानतां चालविणे .
   कष्टाने चालविणे ; संकटाच्या स्थितीत काढणे किंवा कंठणे ( दिवसकाळ ).
   ( खाद्यपदार्थ ) आधाशीपणाने खाऊन टाकणे ; गिळणे . रेटून जाबसाल करणे - भीडमुरवत न ठेवतां स्पष्टपणे आपले म्हणणे मांडणे ; उघड बोलणे ; धीटपणाने आपले म्हणणे सांगणे . रेटून - क्रिवि .
   जोराने ; आवेशाने .
   मोठ्या प्रमाणांत . रेटणे , रेंटणे - अक्रि .
   सरकणे ; स्थानभ्रष्ट होणे ; आपली जागा सोडणे ; ( फार दाबामुळे खांब , तुळई इ० ) कलणे .
   ( धान्य , पाणी इ० ) विपुल होणे , पिकणे ; अमर्याद होणे ; अतिशय होणे . उदा० पीक रेटले , पाऊस , रेटला , अमदानी रेटली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP