|
स्त्री. रेघ ; रेखा ; ओळ . ज्याला लांबी आहे परंतु रुंदी व जाडी मुळीच नाहीत त्याला रेषा म्हणावे . - महमा १ . तंतु . आंब्यातील धसकटे किंवा तुंतुमय भाग . [ सं . ] ०उमटणे उपटणे भाग्याची रेषा स्पष्ट दिसूं लागणे ; दैव उघडणे ; अकल्पित रीतीने भाग्य उदयास येणे . शाहू महाराजांची कृपा म्हणण्यापेक्षां त्यांच्या दैवाची रेषा उमटून ते राज्यलक्ष्मीचा उपभोग घेऊं लागले म्हटले तरी चालेल . - मराठ्यांचे पराक्रम . ०ओढून - काढून - एखाद्याच्या वागणुकीला मर्यादा घालून देणे . देणे - काढून - एखाद्याच्या वागणुकीला मर्यादा घालून देणे . ०काढणे जंगलाच्या हद्दीवर पन्नास फूट जागा जाळणे . - बदलापूर ३२९ . परिमाण न . लांबी मोजण्याचे माप . मराठीः - अंगुले , तसू , गज , दंड , काठी , कोस , योजन . इंग्रजीः - इंच , फूट , यार्ड , पोल , फर्लांग , मैल इ ००मय वि. रेघांनी युक्त ; रेघांनी भरलेली . वृत्त न . विषुववृत्ताशी लंब व दोन्ही ध्रुवांतून जाणारे वृत्त ; याम्योत्तरवृत्त ; माध्यान्हवृत्त . रेषुं सक्रि . लिहिणे ; रेखाटणे ; चित्र काढणे . मग आदरीले चीत्र रेषुं । - उषा २८ . १५ . [ सं . लिख ]
|