Dictionaries | References

लढणे

   
Script: Devanagari

लढणे

 क्रि.  झुंझ करणे , द्वंद्व करणे , युद्ध करणे ;
 क्रि.  चढाओढ करणे , झगडणे , टक्कर देणे , स्पर्धा करणे .

लढणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे   Ex. तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
प्रतिस्पर्धासूचक (Competition)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
युद्ध करणे लढाई करणे झुंजणे झुंज देणे दोन हात करणे सामना देणे
Wordnet:
asmযুদ্ধ কৰা
bdदावहा नां
benযুদ্ধ করা
gujયુદ્ધ કરવું
hinयुद्ध करना
kanಯುದ್ಧ ಮಾಡು
kasجنٛگ
kokझुज करप
malയുദ്ധം ചെയ്യുക
mniꯂꯥꯟ꯭ꯁꯣꯛꯅꯕ
nepयुद्ध गर्नु
oriଯୁଦ୍ଧ କରିବା
panਯੁੱਧ ਕਰਨਾ
sanयुध्
tamஎதிர்த்துப் போராடு
telయుద్ధంచేయు
urdجنگ کرنا , لڑنا , جوجھنا , جدوجہدکرنا
 verb  एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे   Ex. तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लढा देणे
Wordnet:
bdनां
gujલડવું
kasلَڑٲیۍ کَرٕنۍ , لَڑُن
kokझुजप
panਲੜਣਾ
telకలుగ చేయు
urdلڑنا , لڑائی کرنا , جدو جہد کرنا
 verb  मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे   Ex. आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
HYPERNYMY:
असणे
SYNONYM:
संघर्ष करणे झुंज देणे झुंजणे
Wordnet:
benলড়াই করা
gujલડવું
kanಯುದ್ಧಮಾಡು
kasتکلیٖف تُلٕنۍ
tamபோரிட்டுக் கொண்டே இரு
telయుద్ధంచేయు
urdجوجھنا , لڑائی کرنا
   See : झुंजत, स्पर्धा करणे, लढाई

लढणे

 अ.क्रि.  
   युद्ध करणे ; झुंझ करणे ; द्वंद्व करणे .
   झगडणे ; भांडणे ; तंटा करणे .
   ( ल . ) स्पर्धा करणे ; चढाओढ करणे ; टक्कर मारणे . [ हिं . लडना ] ( वाप्र . ) लढून पडणे - मोठ्या औत्सुक्याने , उत्कंठेने एखाद्यावर झटून पडणे ; तुटून पडणे . लढत - स्त्री . युद्ध ; झुंज ; झगडा ( क्रि० लागणे ; चालणे ; होणे ). लढा अर्थ १ पहा . [ लढणे ] लढता - वि .
   लढाऊ ; युद्धकुशल ; लढवई पहा . शिंदे यांची फौज एवढी , लढती , तिची ही गत . - भाब ७५ .
   लढवय्या ; लढणारा .; योद्धा . लढवय्या - पु . लढाण्यांत हुशार असलेला मनुष्य ; योद्धा ; वीर . [ हिं . ] लढवई , लढवाई - वि .
   झुंजार ; रणधीर ; रणशूर .
   लढाईस योग्य ( मनुष्य , घोडा , जहाज , रथ , शस्त्र ). [ हिं . ] लढविणे - सक्रि .
   झुंजावयास लावणे .
   बरोबरी , स्पर्धा करण्यास लावणे . हे पागोटे त्या पागोट्याशी लढवून पाहिले परंतु लढत नाही .
   चालविणे ; करणे ; योजणे ; उपयोग करणे ( मसलत , शक्कल , युक्ति , यत्न , तजवीज , साधने ). लढा - पु .
   भांडण ; वाद ; तंटा ; वादाचा विषय , भूमि . ( क्रि० लागणे ; चालणे ; असणे ; होणे ; राहणे व तोडणे ; चुकविणे ).
   प्रतिबंध ; अडथळा ; निरोध ; हरकत ; निग्रह करणारे , आड येणारे , गति कुंठित करणारे कारण . त्या कागदावर घोटणी नाही म्हणून रेघ ओडतांना मध्ये लढा लागतो .
   ( शब्दशः व ल . ) गुंता ; गुताडा ; गुरफटा . लढाई - स्त्री .
   भांडण , तंटा करणे .
   सामना ; रण , संग्राम .
   युद्ध ; युद्धसंसार . [ हिं . लडाई ] ( वाप्र . )
०जिंकणे   लढाईत जय मिळविणे ; विजयी होणे . लढाऊ वि . लढण्यास योग्य ( मनुष्य , पशु , जहाज इ० ). [ हिं . लडाऊ ]
०गलबत   जहाज न . लष्करी जहाज .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP