|
न. कापूस , रेशीम , लोंकर इ० चे कापड . कपडा ; अंगावर घेण्याची , नेसण्याची वस्तु ; प्रावरण ; चिरगूट . पोषाख . म्ह० लाभ पांचाचा आणि वस्त्र दाहांचे . वस्त्राआड जननागवे . देवास वाहतात ती सूत पुतळी . [ सं . ] ( वाप्र . ) ०आड - लज्जारक्षणासाठी नेसणे . जुनेर आड करुन चार लोकांत कसे बरे यायचे बाहेर ! - एकचप्याला . एका वस्त्राने निघणे - ( अंग शब्दाच्या पोटांत ) एका अंगवस्त्राने निघणे पहा . वस्त्रे देणे - दिवाणगिरी इ० चा अधिकार देणे . काळी वस्त्रे देणे - पदच्युत करणे ; काढून टाकणे . ( शब्दशः व ल ) . वस्त्रे होणे - करणे - लज्जारक्षणासाठी नेसणे . जुनेर आड करुन चार लोकांत कसे बरे यायचे बाहेर ! - एकचप्याला . एका वस्त्राने निघणे - ( अंग शब्दाच्या पोटांत ) एका अंगवस्त्राने निघणे पहा . वस्त्रे देणे - दिवाणगिरी इ० चा अधिकार देणे . काळी वस्त्रे देणे - पदच्युत करणे ; काढून टाकणे . ( शब्दशः व ल ) . वस्त्रे होणे - अधिकार प्राप्त होणे . ( विपरीतल . ) अधिकारावरुन दूर होणे . वस्त्रांतर होणे - करणे - पोषाख बदलणे . ०गाळ गाळीव वि . कपड्यांतून गाळून घेतलेले . ०गोपन न. एक कला ; वस्त्रे नेहमी नवी राहतील अशा युक्तीने ठेवणे . ०परिधान न. पोषाख चढविणे , करणे . ०पात्र न. नेहमीच्या व्यवहारांतील भांडी , कुंडी , कपडे लत्ते इ० ; सामानसुमान . ०प्रावरण न. ( व्यापक ) कपडालत्ता ; वापरण्याचे कपडे . ०प्रासाद पु. तंबू . वस्त्रप्रासादी शुभशयनी जातांचि भागला पहुडे । - मोकर्ण ३९ . ४ . ०लोचन न. ( प्र . ) वस्त्रलुंचन ; वस्त्रे लुबाडणे , चोरुन नेणे ; नागविणे . ०विलास वि. नटवा ; उंची ; सुंदर पोषाख करण्यांत आनंद मानणारा . ०हरण वस्त्रहरण - वस्त्र बुचाडणे ; फेडणे ; द्रौपदीवस्त्रहरण . वस्त्रे चोरुन नेणे , लुबाडणे . वस्त्रागार - न . तंबू . निर्मऊन पैलाडी वस्त्रागार । - दावि ३९१ . वस्त्राचा ताणा - पु . वाळत घातलेल्या कपड्यांची रांग . ( क्रि० लावणे ). - वस्त्रे भूषणे - न . अव . कपडे ; अलंकार ; कपडेलत्ते , दागदागिने . तिला वस्त्रे भूषणे घालून संतोषित केले . - कमं २ .
|