|
पु. १ कल्पनाशक्ति , बुध्दि यांचा व्यापार ; शोध ; अभ्यासपूर्वक चिंतन ; खलबत ; चर्चा ; तारतम्य ; विवेक ; तर्क ; मनन . २ विवेक , चिंतन , मनन करून केलेला निश्चय , निर्णय , निकाल , मत . ३ विधिनिषेध ; महत्त्व ; क्षिति . तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा काय विचार । - दा ३ . १० . ५३ . ४ घोटाळा ; विवंचना ; त्रास ; कटकट . पृथ्वीप्रलय होतो तैसा विचार जाहला . - भाब १५ . मग तुम्हांस विचार भारी पडेल . - शारो ८१ . ५ गोष्ट ; हकीकत ; खरी स्थिति . कळतां तेथिचा विचार । - दा ८ . ८ . ४३ . हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व । - शनि १८१ . ६ मत ; अभिप्राय ; बेत . परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंच नाहीं । - दा १ . ६ . १३ . ७ युक्ति ; उपाय ; मनसुबा ; मलसत . दयानिधि ऋषेश्वर । सांगता झाला विचारु । - गुच ३४ . १६ . चला आमुचे मंदिरा । बोलो पुढील विचारा । - कथा १ . ३ . ११८ . घडून येण्यास कोणता विचार . - रत्नकांता २१ . ८ वर्णन . याहीं वेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु । - दा ५ . २ . ६९ . ९ इच्छा मर्जी ; मनोदय . तहनामा तुमच्या विचारें केला जाईल - विवि ३ . ५ . १८७६ . [ सं . वि + चर् ] या शब्दाचे अनेक सामासिक शब्द होतात . उदा ०सारासार पु. गुणदोष पाहून केलेला विवेक , बनविलेलें मत . सदसद्विचार - पु . योग्य अयोग्य यांची निवड ; चांगलें वाईट ठरविणें . कार्याकार्य - पु . साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें ; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें . याप्रमाणें इष्टानिष्ट - कर्माकर्म - कर्तव्याकर्तव्य - कार्यकारण - गमनागमन - ग्राह्याग्राह्य - धर्माधर्म - पात्रापात्र - पापपुण्य - भक्ष्याभक्ष्य - योग्यायोग्य - वर्ज्यावर्ज्य - वाच्यावाच्य - विधिनिषेध - विहिताविहित - शुभाशुभ - साध्वसाधु - संगासंग - विचार इ० . ( वाप्र . ) जागविणें - ( प्र . ) विवेक जागविणें पहा . विचारांत पडणें - चिंता उत्पन्न होणें ; काळजी वाटणें . विचारक - वि . विचारी ; विचार करणारा ; शोधक . विचारगम्य - वि . विचार केल्यानंतर समजण्यासारखें ; तपास करण्यासारखें ; बुध्दीस आकलन करतां येण्यासारखें ; चिकित्सा ; करतां येण्याजोगें . विचारण - न . १ शोध ; चिकित्सा ; विवेक . विचारणा - स्त्री . १ शोध ; चौकशी ; विचार ; तर्क ; कल्पना . विचारणा देवाची । - दा १६ . १० . २८ . २ पंचाईत ; चिंता ; काळजी ; गूढ . ३ व्यवस्था ; तजवीज . लग्नविचारणा न पुसतां मांडिली । - सप्र २ . ३७ . विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । - दावि ७ . २ . १२ . ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका . - हंको . विचारणीय - वि . १ विचार करण्यासारखें ; शोध , तपास , चिकित्सा करण्यासारखें . २ विचारण्यासारखें ; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें ; प्रश्न करण्याजोगें ; प्रष्ठव्य . विचारणें - उक्रि . १ प्रश्न करणें ; चौकशीसाठीपुढें मांडणें ; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें . २ परामर्श घेणें ; विचारपूस करणें ; पुसणें ; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें . मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी । - दा ३ . ३ . १५ . ३ आदर दाखविणें ; आज्ञा पालन करणें ; काळजीपूर्वक लक्ष्य देणें . ४ महत्त्व देणें ; क्षिति बाळगणें ; पर्वा करणें ; किंमत देणें . ५ विचार करणें ; चौकशी , तपास , चर्चा करणें ; लघुपतनकें विचारलें . - पंच २ . १ . एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें - ज्ञा १ . २४६ . पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता । - भाए ६४ . ६ चालविणें ; चालू करणें . याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी । - मुआदि २४ . ३४ . विचारणें - अक्रि . चिंतन करणें ; मनन करणें ; विचार करणें . मनीं विचारी लंकानाथ । - रावि . विचारिल्यावीण करूं नये तें । - सारुह ३ . २ . विचारपूस - स्त्री . १ वास्तपुस्त ; चौकशी ; शोध . २ परामर्श ; कुशलप्रश्न . ( क्रि० करणें ). [ विचारणें + पुसणें ] , वंत , वान , शील , विचारी - वि . सुज्ञ ; विचार करून वागणारा . विचार पु. गुणदोष पाहून केलेला विवेक , बनविलेलें मत . सदसद्विचार - पु . योग्य अयोग्य यांची निवड ; चांगलें वाईट ठरविणें . कार्याकार्य - पु . साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें ; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें . याप्रमाणें इष्टानिष्ट - कर्माकर्म - कर्तव्याकर्तव्य - कार्यकारण - गमनागमन - ग्राह्याग्राह्य - धर्माधर्म - पात्रापात्र - पापपुण्य - भक्ष्याभक्ष्य - योग्यायोग्य - वर्ज्यावर्ज्य - वाच्यावाच्य - विधिनिषेध - विहिताविहित - शुभाशुभ - साध्वसाधु - संगासंग - विचार इ० . ( वाप्र . ) जागविणें - ( प्र . ) विवेक जागविणें पहा . विचारांत पडणें - चिंता उत्पन्न होणें ; काळजी वाटणें . विचारक - वि . विचारी ; विचार करणारा ; शोधक . विचारगम्य - वि . विचार केल्यानंतर समजण्यासारखें ; तपास करण्यासारखें ; बुध्दीस आकलन करतां येण्यासारखें ; चिकित्सा ; करतां येण्याजोगें . विचारण - न . १ शोध ; चिकित्सा ; विवेक . विचारणा - स्त्री . १ शोध ; चौकशी ; विचार ; तर्क ; कल्पना . विचारणा देवाची । - दा १६ . १० . २८ . २ पंचाईत ; चिंता ; काळजी ; गूढ . ३ व्यवस्था ; तजवीज . लग्नविचारणा न पुसतां मांडिली । - सप्र २ . ३७ . विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । - दावि ७ . २ . १२ . ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका . - हंको . विचारणीय - वि . १ विचार करण्यासारखें ; शोध , तपास , चिकित्सा करण्यासारखें . २ विचारण्यासारखें ; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें ; प्रश्न करण्याजोगें ; प्रष्ठव्य . विचारणें - उक्रि . १ प्रश्न करणें ; चौकशीसाठीपुढें मांडणें ; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें . २ परामर्श घेणें ; विचारपूस करणें ; पुसणें ; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें . मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी । - दा ३ . ३ . १५ . ३ आदर दाखविणें ; आज्ञा पालन करणें ; काळजीपूर्वक लक्ष्य देणें . ४ महत्त्व देणें ; क्षिति बाळगणें ; पर्वा करणें ; किंमत देणें . ५ विचार करणें ; चौकशी , तपास , चर्चा करणें ; लघुपतनकें विचारलें . - पंच २ . १ . एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें - ज्ञा १ . २४६ . पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता । - भाए ६४ . ६ चालविणें ; चालू करणें . याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी । - मुआदि २४ . ३४ . विचारणें - अक्रि . चिंतन करणें ; मनन करणें ; विचार करणें . मनीं विचारी लंकानाथ । - रावि . विचारिल्यावीण करूं नये तें । - सारुह ३ . २ . विचारपूस - स्त्री . १ वास्तपुस्त ; चौकशी ; शोध . २ परामर्श ; कुशलप्रश्न . ( क्रि० करणें ). [ विचारणें + पुसणें ] , वंत , वान , शील , विचारी - वि . सुज्ञ ; विचार करून वागणारा . ०शक्ति स्त्री. बरेंवाईट वगैरे विवेक करण्याचें सामर्थ्य ; मननशक्ति . ०संगति स्त्री. विचारमालिकेंतील निरनिराळया विचारांचा सुसंगतपणा ; परस्परसंबंध ; एकसूत्रता ; एका कल्पनेवरून तत्सदृश दुसरी कल्पना सुचते तेव्हां त्या दोहोंमधील साहचर्यसंबंध . ०संक्रांति स्त्री. विचारांचें परिवहन ; एक विचार दूरस्थ व्यक्तींच्या मनांत एकाच वेळीं येणें . ( इं . ) टेलेपॅथी . नीतिशास्त्रप्रवेश ३९० . ०स्थित वि. विचार करण्यांत , चिंतनांत , मनन करण्यांत निमग्न , गुंग झालेला . ऐसें बोलती श्री गुरुनाथु । तंव शिष्य झाला विचारस्थितु । ०क्षम वि. विचार करण्याचें सामर्थ्य असलेला ; विवेकी . विचारित - वि . विचार करून ठरविलेलें ; निश्चित ; बुध्दीनें स्वीकृत . विचार्य - वि . विचार करण्यास योग्य .
|