Dictionaries | References

वेड

   
Script: Devanagari
See also:  येड , येडका , येढवळ , येढोळ , येढोळां , येणेंकडून , येणेंकरुन

वेड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बुतांव

वेड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
Lime-tree, Citrus lemonum. 2 n also वेडलिंबूं or -निंबूं n A lime.
out of. वेड घेऊन पेड- गांवास जाणें To feign madness or idiocy in order to accomplish some crafty purpose. वेड पिकणें, वेडाचा पाऊस पडणें Phrases expressive of wild excesses, riotous and extravagant proceedings, any general tumultuousness or uproar. वेड भरणें in. con. To get mad. वेड भरणें or भरविणें To drive one mad or furious; to vex to madness. वेड लावणें To bring madness upon. Ex. वेड लावलें भ्रताराला ॥ नाहीं राहिला लौकिक ॥. वेडीचें सोंग घेणें To feign madness. Used esp. of a debtor feigning insolvency, of a man of service or work feigning incompetency &c.

वेड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Madness; folly.
n f  A ring.
वेड लावणें   Bring madness upon.
वेडीचें सोंग घेणें   Feign madness.

वेड     

ना.  उन्माद , बुद्धिभ्रंश , भ्रम ;
ना.  अतिशय आसक्ती , छंद , नाद , फाजील इच्छा ;
ना.  अविचार , मूर्खपणा .

वेड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार   Ex. औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुद्धिभ्रंश भ्रम खूळ चळ वेडेपणा
Wordnet:
asmপাগল
bdफाग्लाबादि
benউন্মাদ
gujગાંડપણ
hinउन्माद
kanಹುಚ್ಚು
kasمَژَر
kokपिशेपण
malഭ്രാന്ത്
mniꯀꯣꯛ꯭ꯕꯦꯔꯥ꯭ꯂꯩꯕ꯭ꯃꯤ
nepबौलाहा
oriଉନ୍ମାଦ
panਪਾਗਲਪਣ
sanमतिभ्रंशः
tamபைத்தியம்
telఉన్మాది
urdدیوانگی , پاگل پن , دیوانہ پن
noun  अत्युत्कट किंवा फाजील इच्छा   Ex. त्याला पैसा कमावण्याचे वेड लागले आहे.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজঁক
bdबोरनाय
benঝোঁক
gujઝનૂન
hinसनक
kanಗೀಳು
kasجنوٗن
kokपिशें
malഭ്രാന്ത്
panਜਨੂਨ
sanबुद्धिवैकल्यम्
tamதீவிரஆசை
telపిచ్చి
urdجنون , پاگل پن , دھن

वेड     

 न. ( गो . ) कुडें . वेडीजोड - पु . कुडयांचा जोड .
 स्त्री. ईडलिंबाचें झाड . - न . ईडलिंबू . याचअर्थी वेडलिंबू - निंबू . [ ईड ]
 स्त्री. १ मंडळीतींल म्हणजे गंजींतील गव्हाच्या पेंढया चोरांना उपसून काढतां येऊं नयेत म्हणून त्याच्या ताटांच्या मुळांची गंजींभोंवती घातलेली वेणी - गुंफण . २ - नस्त्री . हाताच्या किंवा पायांच्या बोटांत घालण्याचा दागिना ; वळें ; वेढें . [ वेढणें . सं . वेष्टन ]
 न. मेंदूमध्यें कांहीं बिघाड झाल्यामुळें उत्पन्न होणारा आजार ; बुध्दिभ्रंश ( यांत भूलभलतें बोलणें , करणें इ० गोष्टीं होतात ); मेंदूचा विकार व त्याचा परिणाम ; खूळ . २ मूर्खपणा ; मूर्खपणाचें कृत्य . ३ ( ल . ) अतिशय आसक्ति ; अत्युत्कट किंवा फाजील इच्छा ; छंद ; नाद ; उत्कट लहर . जगांतींल सर्व महत्कार्यांचा उदय वेडाच्या उदरींच झालेला आहे . - रणदुंदुभि ४६ . ४ सबळ कारणाशिवाय मनांत ठाम बसलेली समजूत . या काव्यांत कवीच्या पूर्वचारित्र्यांतील कांहीं चमत्कारिक घडामोडींचा उल्लेख आहे असें वेड माझे डोक्यांत शिरतें . - केकाआर्या १ . ५ अविचार ; अज्ञान . तो बलावीत होता तेव्हां गेला नाहींत हें वेड केलंत . [ का . एड्ड - ड्‍डु = मूर्खपणा , मूर्ख माणूस ; तुल० सं . वैधेय ( मूर्ख )- वेढेअ - वेढ - वेड . - भाअ १८३५ ]
 स्त्री. घोड्यास इशारा करणें . तुजला मारिन मी , करिन येड । - ऐपो १२६ . येड करणें - घोड्यास इशारा करणें , प्रेरणा करणें .
०काढणें   १ वेड पांघरणें ; वेड घेणें . २ एखाद्यानें मुद्दाम पांघरलेलें वेड धाकदपटशा दाखवून घालविणें ; खोड मोडणें . वेऊन पेडगांवास जाणें - आपला कांहीं मतलब साधण्यासाठीं वेड दाखविणें , पांघरणें .
०देणें   ( व . ) लगामाच्या इषार्‍यानें घोड्यास मागें परतविणें .
०पांघरणें   मुद्दाम वेडयासारखें करणें ; वेड काढणें अर्थ १ पहा .
०पिकणें   वेडाचा पाऊस पडणें - १ एखाद्या गोष्टीबद्दल अवास्तव कुतुहल उत्पन्न होणें . २ असमंजसपणा , अविचार यांची समृध्दि होणें ; एखाद्या वस्तूचा ध्यास लागणें .
०भरणें   वेड लागणें ;
०भरणें   भरविणें - वेड लावणें ; वेडा करणें ; वेड लागेपर्यंत त्रास देणें ; फार उपद्रव देणें .
०लावणें   १ एखाद्याला मोहित करणें ; त्याचें मन आकृष्ट करणें ; छंद लावणें . वेड लावले भ्रताराला । नाहीं राहिला लौकिक । २ घोटाळयांत घालणें . ३ वेड लागण्याइतकी स्थिति होईपर्यंत एखाद्याला अति उपद्रव करणें ; वेडा करणें . वेडीचें सोंग घेणें - वेड पांघरणें ; वेडाचें ढोंग करणें . ( ऋणकरी दिवाळखोरी दाखवीत असतां हा वाक्प्रचार योजितात ). वेडगळ , वेडका , वेडगेला , वेडसर - वि . वेडयासारखा ; अर्धवट मूर्ख ; वेडयांत जमा ; बावचळलेला ; खुळचट . वेडगळणें - अक्रि . १ ( क्व ) वेडें होणें . २ वेडेचार करणें ; छांदिष्टपणा , आडदांडपणा , मूर्खपणा करणें . वेडझवा - वि . १ व्यवहारज्ञानशून्य ; खुळचट ; मूर्ख ; बेअकली ; विक्षिप्त ; चमत्कारिक ; विलक्षण ; अडाणी . ब्रह्मा वेडझंवा म्हणूनि विभवा देतो अशा गाढवा । २ भ्रमांत पडलेला ; गोंधळलेला ; काय करावें तें सुचत नाहीं असा ; भ्रमिष्ट . ( ह्या शब्दाचें मूळचें अश्लील स्वरूप जाऊन आता तो सभ्य लोकांच्या बोलण्यांतहि येतो ). वेडविणें - सक्रि . ( वेड लागण्याइतकें वेडावून , त्रास देऊन ) छळणें ; सतावणें , गांजणें . वेडाविणें पहा . [ वेडा ]

वेड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वेड  n. n. a kind of coarse sandal (= सान्द्र-विच्छिन्न-चन्दन), [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP