Dictionaries | References

शत

   
Script: Devanagari

शत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सौ, सौ

शत     

शत n.  जंभासुर के शतंदुदुभि नामक पुत्र का नामांतर [वायु. ६७.७८]

शत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hundred. शतं तत्र पंचोत्तर शतं Where we are spending or giving a hundred what matters five over?

शत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A hundred. शतक
  A century or a cento.

शत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शंभर

शत     

वि.  शंभर . भारताचें शतें सात । सर्वस्वगीता । - ज्ञा १८ . १६६१ . [ सं . ] म्ह० शतं तत्र पंचोत्तर शतं ( शंभर तेथें एकशें पांच ) ऐशीं तेथें पंचायशी ( खर्च करण्यास काय हरकत ? ). [ सं . ]
०क  न. शेंकडा ; शंभराचा समुदाय . [ सं . ]
०कूट वि.  शेकडों तुकडे झालेला ; शतधा भिन्न . तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे । - ज्ञा १ . १४७ . वाटे उर्वी शतकूट । होऊन जाईल क्षणार्धे । - पांप्र ४१ . २२ .
०कृत्य  न. १ ( शतक्रतूबद्दल चुकीचा शब्दप्रयोग ) शंभर अश्वमे यज्ञ करण्यासारखें अचाट कृत्य ; शंभर यज्ञांचें कार्य . २ ( ल . ) एखादें अचाट काम ; महत्कृत्य . शतक्रतु पहा . ३ विशेष प्रकारची चटणी , रायतें .
०कृत्य   पुण्य करणें ; चांगली गोष्ट करणें .
करणें   पुण्य करणें ; चांगली गोष्ट करणें .
०क्रतु  पु. १ इंद्र . २ शंभर अश्वमेघ यज्ञ हे केले असतां यजमानाला इंद्रपद मिळतें . ३ ( ल . ) मोठा विजय ; मोठा पराक्रम ; मोठें शौर्य ; अचाट कृत्य . जन्मास आल्यापासून एक तळें बांधलें एवढा कायतो शतक्रतु केला . [ सं . ]
०गुण वि.  शंभरपट . शतगुणें स्नेहोवाढला तिसी । - एभा ७ . ६०१ . [ सं . ]
०घृत   शंभर वेळां धूवून स्वच्छ केलेलें तूप ( औषधाकरितां ). [ सं . ]
०घ्नी  स्त्री. ( शंभरांची हत्त्या करणारा ) लोखंडी भाले , खिळे बसविलेला एक ठोकळा ; एक विशिष्ट हत्यार ; कारलें ; शेंकडों लोक मारण्याचें जुनें आयुध . पट्टिश बाण लोहवृश्चिक उरण । दशघ्नया आणि शतघ्नया । - ह २२ . ३४ . २ एक प्रकारची तोफ ; उल्हाटयंत्र . शतघ्नी नामक अस्त्रें उंच प्रदेशावर नेऊन ठेवावीं . - हिंलई २४ .
०चिंध्या  स्त्री. शंभर जागीं फाटलेलें वस्त्र ; नेसतां किंवा वापरतां न येण्याइतकें फाटकें वस्त्र ; लक्तर्‍या .
०चूर वि.  शंभर तुकडे झालेलें . शतकूट पहा . घट घायें कीजे शतचूर । - एभा २२ . ४२७ .
०चूर्ण  न. अगदीं चुरा ; तुकडे तुकडे झालेले , पडलेले आहेत अशी स्थिति ; पार चुराडा . फुटोनि होय शतचूर्ण । - अमृ ७ . ६७ . एकेचि घातें शतचूर्ण । - एरुस्व ८ . ४६ . - वि . चुरा झालेला ; विभिन्न . [ सं . शत + चूर्ण ]
०च्छंदी वि.  ( शंभर लुच्चेगिर्‍या , फंद असणारा ) फंदी ; बेढंगी ; वाईट चालीचा .
०च्छिद्र वि.  शेंकडों भोकें पडलेला ; चाळण झालेला ( कागद , वस्त्र इ० ).
०जर्जर वि.  शंभर ठिकाणीं फुटलेली ; शेंकडों ठिकाणीं खिळखिळी झालेली . शतचूर्ण पहा . यालागीं शतजर्जर नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें । - ज्ञा ९ . ४९० . [ सं . ]
०तंत्रीवीणा  स्त्री. एक वाद्य . सारमंडळ पहा .
०तारका  स्त्री. १ सत्तावीस नक्षत्रांपैकीं चोविसावें नक्षत्र ( शंभर तार्‍यांचें मिळून झालेलें ). २ ( ल . ) एखाद्यास अनेक मुली असल्या म्हणजे थट्टेनें म्हणतात . [ सं . ]
०द्वार वि.  शंभर द्वारें , दरवाजे , भोंकें वगैरे असलेलें . [ सं . ]
०धा   क्रिवि . १ शंभरदां ; शंभरवेळां . २ शेकडों प्रकारांनीं . कैसा शतधा दुर्वादीं । निस्तेजिलासी । - ज्ञा ११ . १०१ . [ सं . ]
०धृति  पु. १ ब्रह्मदेव . २ इंद्र .
०धौत वि.  शंभरवेळां धुतलेलें ( तूप वगैरे ).
०पत्र  न. एक जातीचें कमळ . २ सेवतीचें फूल . - वि . शंभर पाकळया , पानें असलेलें ( कमळ ). [ सं . ]
०पत्रनेत्रा  स्त्री. कमलाक्षी ( स्त्री ). तेथूनि तूं मजसि ने शत - पत्र - नेत्रा । - नवनीत पृ . ९७ . [ सं . ]
०पत्रिका   एक फुलझाड ; शेवंती . [ सं . ]
०पद   पाद पदी - स्त्री . घोण ; गोम .
०पदी  स्त्री. शतपावली ; जेवणानंतर अन्नपचनक्रिया सुलभ होण्यासाठीं फेर्‍या घालणें , थोडें चालणें . [ सं . ]
०पावली  स्त्री. शतपदी पहा .
०भाग वि.  ( शाप . ) शंभर भाग ज्याचे पाडले आहेत असें . ( इं . ) सेंटिग्रेड . - रसामू ३० . शतंभीष्म - पु . १ ( शंभर भीष्म ; भीष्माचार्या सारखे पुष्कळ , एकाहून एक बलवान ) आपल्या सामर्थ्याची बढाई मारणार्‍याबद्दल निंदार्थी शब्दप्रयोग ; अनेक वरचढ , अधिकाधिक पराक्रमी पुरुष . तूं आपली एवढी प्रतिष्ठा कशास सांगतोस . तुजसारखे असे शतंभीष्म पडले आहेत . ऐसे दाते शतंभीष्म बहुत आहेत . - शिवाजीचें चरित्र तुझ्या सारखे मी पुष्कळ शतंभीष्म लोळविले आहेत . २ वृध्द ; विशेष ज्ञानी पुरुष .
०मख  पु. १ शंभर यज्ञ करणारा ; इंद्र . जें शतमखा लोक सायासें । तें तो पावें अनायासें । कैवल्यकामु । - ज्ञा ६ . ४४१ . २ शंभर यज्ञ . जें शतमखींहीं आंगवणें । नोहेचि एका । - ज्ञा ८ . २६५ . [ सं . ]
०नखोत्तीर्ण वि.  ( शंभर यज्ञ करून पार झालेला ) शंभर यज्ञ पूर्ण झाल्यामुळें इंद्रपद मिळालेला ; इंद्र . जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे । - ज्ञा १० . २४० . [ शत + मख + उत्तीर्ण ]
०मान वि.  १ शंभराचें माप , मोज ; शंभर संख्या भरणारें . शतमान आयुष्य . २ ( सांकेतिक ) शंभर रुपये दक्षिणा तेथें तुम्हास काय मिळाले ? शतमान किंवा एक शतमान मिळालें .
०मारी वि.  १ शंभर रोगांवर रामबाण उपाय करणारा निष्णात ( वैद्य ). २ ( ल . ) शंभर रोग्यांना मारक किंवा त्यांची हत्या करणारा ( वैद्य ).
०मूर्ख  पु. ( शंभरपटीनें , शंभरमूर्खा इतका मूर्ख ) अत्यंत मूर्ख , अज्ञानी ; शुध्द , केवळ मूर्ख ; महामूर्ख . [ सं . ]
०वर्ष   वार्षिक - वि . १ शंभर वर्षे टिकणारें , चालणारें ; शंभर वर्षाच्या मुदतीचें . २ शंभर वर्षांतून एकदां येणारें . ३ शंभर वर्षाचा ; शंभर वर्षे जगलेला ; शतायुषी . ४ शंभर वर्षासंबंधी . [ सं . ]
०वृध्द  पु. शतायु ; शंभर वर्षाचा . जे तो शतवृध्द आहे । नेणों कैचा । - ज्ञा १३ . ५८४ .
०शः   अक्रिवि . शेंकडों ; शेंकडयानें , शंभर शंभर अशा संख्येनें मोजलें जाणारें . [ सं . ]
०शाख वि.  ( शंभर फांद्या , अंगें , विभाग असलेला ) विविध प्रकारचा ; बहुविध ; नानाविध ; असंख्य प्रकारांनीं युक्त . [ सं . ] शताधीश , शतायु , शतायुषी - पु . १ शंभरांचा स्वामी - मालक ; शंभर लोकांवरील अधिपति . २ ( थट्टेनें ) ज्याच्या जवळ शंभर रुपये आहेत तो . शंभर वर्षे वयाचा , शंभर वर्षे जगणारा . [ सं . ] शताळशी , शताळसी - वि . अतिशय आळशी ; आळश्यांचा राजा . [ सं . शत + आळशी ] शती - स्त्री . शेंकडा ; शे . [ सं . ] ( समासांत उपयोग ) द्वि - त्रिशती . शतं - न . शतकृत्य पहा . रान सुटले ... शतं केले . - ख ९७४ . - वि . शंभर . [ सं . ] शतंजीव - अ . ( शंभर वर्षे जग ) एक आशीर्वाद ; लहान मुलांस शिंक आली असतां त्याची आई अथवा कोणी प्रौढ स्त्रिया उच्चारतात . शिंक आली असतां आयुष्यहानि होते अशी भावना आहे त्यावरून . शतंजीव शिंकतां आळवीसी वो । - मध्व १५ . [ सं . ]

शत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शत  n. n. (rarely m.; ifc.f(). ) a hundred (used with other numerals thus, एका-धिकं शतम्, or एक-श्°, a + one, 101 विंशत्य्-अधिकं शतम् or विंशं श्°, a + twenty, 120; शते or द्वे शते or द्वि-शतम् or शत-द्वयम्, 200; त्रीणिशतानि or त्रि-शतानि or शत-त्रयम्, 300; षट्-शतम्, 600; or the comp. becomes an ordinal e.g.द्वि-शत, the 200th; द्विकं, त्रिकं शतम् = 2, 3 per cent; शतात्पर, ‘beyond a , exceeding 100’; the counted object is added either in the gen., or in the same case as शत, or ibc.e.g.शतम् पितरः or, शतम् पितॄणाम् or पितृ-शतम् ‘a ancestors’; sometimes also ifc. See comp. below; rarely शतम् is used as an indecl. with an instr.e.g.शतं॑ र॑थेभिः, ‘with a chariots’ [RV. i, 48, 7] ; rarely occurs a masc. form in pl.e.g.पञ्च-शता, रथान्, [MBh. iv, 1057] ; and शतn. rarely in comp. of the following kind, चतुर्-वर्ष-शतम् or °तानि, ‘400 years’), [RV.] ; &c.
शत-पत्त्र   any very large number (in comp. as &c. below).
ROOTS:
शत पत्त्र
शत   [cf.Gk.ἑ-κατόν ‘one’ hundred; Lat.centum; Lith.szmtas; Got. (twa) हुन्द; Germ.hund-ert; Eng.hund-red.]

शत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
शत  n.  (-तं)
1. A hundred.
2. Any large number.
E. शो-डतच् .
ROOTS:
शो-डतच् .

शत     

adjective  दशाधिकं नवतिः अभिधेया।   Ex. अस्मिन् सम्मेलने प्रायः शतं विद्वांसः पर्युपास्यन्ते इति सूचना वर्तते।
MODIFIES NOUN:
दशा तत्वम् कर्म
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmএশ
bdजौसे
benএকশ
gujસો
hinसौ
kasہَتھ
kokशंबर
malനൂറ്
marशंभर
mniꯆꯥꯝ
oriଶହେ
panਸੌ
tamநூறு
telవంద
urdسو , صد

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP