|
न. १ ( दैवी ) धर्म , विधि , नियम , विद्या यासंबंधीं वचन , आज्ञा . हें ईश्वरी किंवा अपौरुषेय मानण्यांत येतें . बहुधा सामासांत उपयोग . समाशब्द - शास्त्रमर्यादा , शास्त्ररीती , शास्त्रमार्ग , शास्त्रप्रतिपादित , शास्त्राभ्यास , शास्त्रज्ञ , शास्त्रज्ञान , शास्त्रतत्त्व . २ ( समास नसतांना ) धर्म , वाङ्मय , विज्ञान , कला इ० संबंधीं नियम . हा अर्थ अभिप्रेत असतां बहुधा मर्यादा घालणार्या दुसर्या शब्दांस जोडून येतात . उदा० वेदांतशास्त्र , शिल्पशास्त्र , कामशास्त्र , न्यायशास्त्र , व्याकरणशास्त्र , ३ ( सामा . ) प्रबंध ; ग्रंथ . ४ नियमबध्द , सिध्दांतमय रचना असलेला विषय . [ सं . ] ( वाप्र . ) शास्त्रास , शास्त्राचा , शास्त्रापुरता , शास्त्रार्थास असणें , शास्त्रार्थास नसणें - केवळ नांवाला असणें - नसणें . हा आपला उगीच शास्त्रास चाकू आहे . ह्यानें बोट देखील कापणार नाहीं . आज घरांत शास्त्राला साखर नाहीं , मग शेरभर देऊं कुठली ? शास्त्रास स्नान झालें खरें , मुलशुध्दी ती निराळी शास्त्रांत - वि . शास्त्रांप्रमाणें ; शास्त्र धरून , अनुसरून . [ सं . ] ०दर्शि वेत्ता विद ०प्रविण प्रविज्ञ अभिज्ञ संपन्न - वि . शास्त्रांत निपुण , कुशल ; चांगला शास्त्री . [ सं . ] ०निंदा स्त्री. शास्त्राची धिक्कारणी , अवमानणी , शास्त्राचा अपमान . [ सं . ] ०पाखंड न. शास्त्राचा भलता अर्थ ; अशास्त्रीय विधान . पोट भरावया भांड । सैरा वाजविती तोंड । तैसे विषयालागीं वितंड । शास्त्रपाखंड बोलती । - एभा ९ . ३५५ . ०पारंगत सकलशास्त्रपारंगत - वि . सर्व शास्त्रविशारद ; सर्व शास्त्रांत निपुण . [ सं . ] ०बाहे वि. शास्त्रबाह्य ; निषिध्द . आशंकेचा उपक्रम । दिवसा नाहीं लाजाहोम । शास्त्रबाहे विषम । कां पा कवि बोलिला । - सीख १० . १०८ . [ सं . शास्त्रबाह्य ] ०मर्यादा स्त्री. शास्त्रानें घालून दिलेली , आंखून दिलेली , मर्यादा , सीमा . ( क्रि० राखणें पाळणें , धरणें , पाळणें ) [ सं . ] ०वत् वि. शास्त्राप्रमाणें ; शास्त्रानुसार ; सशास्त्र [ सं . ] वि. शास्त्राप्रमाणें ; शास्त्रानुसार ; सशास्त्र [ सं . ] ०व्युत्पत्ति स्त्री. न्यायादि शास्त्रांत गति ; शास्त्र ग्रंथांतील निपुणता . पुराण सांगण्यास केवळ शास्त्रव्युत्पत्ति नको , काव्यव्युत्पत्ति असली म्हणजे झालें . [ सं . ] ०संख्याक वि. सहा . षट्शास्त्रें यावरून सांकेतिक . खदिर वृक्षांचे शास्त्रसंख्याक । पळसांचे ऋषि संख्याक । ऐसियापरी सम्यक । यज्ञक्रिया अवलंबिली । - जैअ ९२ . ४९ . शास्त्रर्थ - पु . शास्त्रांतील किंवा विधिनिषेधरूप वचन , अभिप्राय , शास्त्राची सांगणी . शास्त्रांतलें वचन ; शास्त्रज्ञा . विशिष्ट बाबतींत शास्त्रानें घालून दिलेला नियम , वा दाखविलेला मार्ग . शास्त्रार्थ करणें - १ ( एखादी गोष्ट ) किंचित् नांवाला करणें ; केली न केली याप्रमाणें वागणें . शास्त्रार्थास असणें - शास्त्रास असणें पहा . शास्त्री - पु . १ शास्त्रांचा अभ्यास केलेला ; गृहस्थ ; शास्त्रवेत्ता ; पंडित . २ ज्या शास्त्राचें अध्ययन ज्यानें केलें आहे तो तच्छास्त्री . उदा० न्यायशास्त्री , धर्मशास्त्री . ३ कोणत्याहि एखाद्या शास्त्रविद्येंत निपुण असलेल्या ब्राह्मणाच्या नांवापुढील बहुमानार्थी पदवी . उदा० बाळशास्त्री , गंगाधरशास्त्री , वासुदेवशास्त्री . ०बाणा पु. विशिष्ट धंदा किंवा व्यासंग म्हणून केल्या जाणार्या पुढील सहा शास्त्रीय विद्यांना योजला जाणारा शब्द , आलंकारिक , ज्योतिषी , धर्मशास्त्री , नैय्यायिक , वैद्यकी , वैय्याकरणी - बाणा . शास्त्रीय - वि . १ शास्त्रासंबंधीं ( विषय , परिभाषा , व्यवहार , ज्ञान , इ० ). २ यथाशास्त्र ; शास्त्रोक्त ; [ सं . ]
|