|
स्त्री. शेपूट ; पुच्छ ; शेपटी . [ सं . ] सामाशब्द - स्त्री. बडीशोप ; बाळंतशोप ; एक ओव्यासरखे धान्य , बी . शेपट - वि . बडीशोपेसारखा वास येत असलेले . शेपा , शेप्या - वि . १ शोप्या ; बडीशेपेसारखा वास येत असलेला . ( आंबा वगैरे . ) २ एक जातीचा तांदूळ . शेपू - स्त्री . बाळंतशोपेचे झाड ; याची भाजी करतात . [ सं . शतपुष्पा ] शेप्याघुडा , शेप्याघुडया - वि . एका जातीचा तांदूळ . न. शिस्न . [ वैसं . अपयामि शेपम् - ऋ १ न. एक फळ . शेपे शिताफळेही खरबुज खिरणी सुंदरें तूत बोरें । - सारुह ३ . ४९ . [ फा . सेब = सफरचंद ] ०किडा पु. शेपटासारखा भाग असणारा किडा . यास पाय नसून हा सरपटत चालतो . ०शेपाळा शेपाळ्या - वि . स्त्रीलंपट ; कामी ; विषयी ; छंदी . शेपाळू - स्त्री . छिनाल , विषयी , कामुक स्त्री . ०खळी स्त्री. विण्याच्या सुमारास जनावराच्या शेपटीजवळ खळगी पडते ती . ०चौरी वि. शेपेचा चौरीसारखा गोंडा असलेली ( मेंढी ). ०कल्याणी वि. स्त्रीलंपट ; कामातुर ; विषयी . ( स्त्री . ) ०मोडया वि. १ केवळ शेपूट पिळवटली असतांच चालणारा . २ ( ल . ) मठठ ; आळशी ; नालयक ; कामचुकार . ०रूट न. एक जातीचे गवत . ०ळा पु. १ एक किडा . २ मोठी ऊ . शेपट - स्त्री . अतिशय जोराने हाकणें , पाठीस लागणें , दामटणे ; धावडवणे . ( क्रि० काढणे . ) शेपटणे - उक्रि . शेपट काढणे दमविणे . शेपटणे - उक्रि . शेपूट पिळणे . शेपटाशेंपडा - पु . १ लांब शेपटी ; लांबलचक पुच्छ . २ ( ल . ) पाठीवर मोकळी सोडलेली वेणी . शेपटी , शेंपटी , शेंपडी , शेंपुडी - स्त्री . १ पुच्छ ; शेंपूट . २ ( ल . ) जनावर ; गाय ; म्हैस वगैरे . शेपटी - स्त्री . ( ल . ) फोकाटी ; छडी ; शिरपुटी ; शिपटी . शेपाटणी - स्त्री . शेपट ; शक्तीपेक्षां जास्त श्रम देणे . ( क्रि . काढणे . ) शेपाटणे - उक्रि . शेपटी पिळणे ; धावडवणे ; दमविणे ; फोकलणे ; शिरपटणे ; चमकाविणे . शेपडावणे - उक्रि . ( मा . ) झोडपणे .
|