Dictionaries | References

सांठ

   
Script: Devanagari
See also:  सांट , साट , साठ

सांठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hoard or store.

सांठ     

 पु. १ मावेल इतकी जागा ; पुरेशी जागा ( राहाण्यास , ठेवण्यास ). २ ( ल . ) क्षमाशीलता ; क्षमा . ३ सांठा ; संचय . ४ आश्रय ; दबा . आम्ही मलंगडचे रानांत साठ म्हणजे दबा घेऊं व तेथून कार्यसिध्दि करूं . - वसईची मोहीम . [ सं . सं + स्था ; प्रा . संठा ] सांठण - न . सांठविण्याचें पात्र . सांठणें - अक्रि . १ सांचणें ; जमणें ; गोळा होणें . २ मावणें ; राहणें . सांठवण - नस्त्री . १ सांचविण्याचें पात्र , जागा ; हौद ; बरणी इ० . व्योम सांठवे संपूर्ण । ऐसी सांठवण कोठून आणू । २ संचय ; संग्रह . सांठवणी - न . १ ( तळें , हौद , टांकें इ० त ) सांठवलेलें पाणी . २ ( खांच , खळगा , डबकें इ० त ) सांचलेलें पाणी . सांठवणी , सांठवणूक - स्त्री . सांठविणें ; संचय ; संग्रह . सांठवणें , सांठविणें - उक्रि . १ भरून ठेवणें ; सांठवण करणें . २ सांचविणें ; जमविणें . [ सं . संस्थापन ; प्रा . संठावण ] सांठवासांठव - स्त्री . १ सांठविणें ; संचय , संग्रह करणें ( अनेक वस्तूं ). २ घाईनें , कसें तरी सांठविण्याचा व्यापार . सांठा - पु . संग्रह ; संचय ; ढीग ; रास . सांठी - स्त्री . १ गोणी . २ सांठा . साठोपा - पु . संग्रह ; संचय . ओला चारा खड्डयांत दाबून त्याचा साठोपा करावा . - केसरी १८ . ९ . ३६ . सांठयाचा - वि . ठेवणीचा ( सुंदर पदार्थ , वस्त्रपात्र ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP