-
स्त्री. ( गंजिफा ) तलफ ; राजाकरितां किंवा इतर हुकूम पडावा म्हणून केलेली खेळी . - वि . ( पत्त्यांच्या डावांत ) हात होईसें ; हुकूमासारखें .
-
पु. १ डोकें . २ ( ल . ) मुख्य ; श्रेष्ठ ; वरचढ . या सर्वांवर हरिपंत सर आहे . हुद्यापूर्वीहि मुख्य या अर्थी जोडतात . उदा० सरदेशपांडे ; सरदेशमुखी ; सर सुभेदारी इ . ३ ( ल . ) प्रमुख ; नेता ; चालक ( संस्था , मंडळ वगैरेचा ). ४ ( गाय , म्हैस वगैरे शब्दांनंतर योजल्यास ) संख्या ( डोकी ) दाखवितो . उदा० गाय सर एक , म्हैस सर तीन = एक गाय , तीन म्हैशी . बैल सर पाचशें पाठविलें . - रा १२८ . प्राण्यांची संख्या दाखविणेस सर व वस्तूंची संख्या दाखविण्यास सुमार शब्द योजीत . उदा० उंटे सर बारा , नारळ सुमार पंचवीस . सर करणें - जिंकणें ; पादाक्रांत करणें ( किल्ला , प्रदेश करणें ); फत्ते करणें ; तडीस नेणें ( काम , काज ). [ फा . सर ]
-
न. सरोवर ; तळें ; तडाग . [ सं . सरस् ]
-
क्रि.वि. सरकण्याचा , निसरण्याचा , घसरण्याचा , सर असा आवाज करून . [ घ्व . ]
Site Search
Input language: