|
पु. एक पदवी . [ इं . सर ] पु. १ लांब सरळ बांबू अथवा लांकूड ; वांसा ; तुळई ; लांब लांकडे ( खालच्यास घोडे म्हणतात ). ३ ( विणकाम ) वस्त्रांतील विरळ विणीची रेषा . [ सं . सृ ] पु. आवाज ; ध्वनि ; साद . सरींची गुंतलें चित्त । म्हणौनि मुकला जीविता । - भाए ३७२ . [ सं . स्वर ] पु. दह्याचा घट्ट व स्नेहयुक्त भाग . - योर १ . १५५ . [ सं . ] अ. अंश , किंचित् छटा , सादृश्य वगैरे दाखविणारा विशेषणांस लागणारा प्रत्यय उदा० काळसर , पिंवळसर . २ पर्यंत ; पुरेपूर ; कांठोकाठ . नदी वरसर भरली . भांडें तोंडसर भरलेलें . दिवाळयेसर वायदो करून येतों . - मसाप २ . ४ . १११ . स्त्री. १ बरोबरी ; तुल्यता ; योग्यता ; साम्य . तुम्हां नसेचि सरी . । - मोकर्ण २७ . १३ . २ रांग ; ओळ . बाबिलोनी नेला सरे धरूनु । युडेआंसवें । - ख्रिपु १ . ३० . ९६ . पु. बैलावरील कर . - बदलापूर ३६३ . स्त्री. १ एकदम जोराचा लोंढा , सोसाटा ; उदा० पावसाची सर . नगीं मेघ जेविं सर घाली । - मोकर्ण ३३ . ५७ . वर्षलि वारि हरि दयासुधांबु सरी । - मोकृष्ण ८१ . ८५ . २ आवेश ; आवेग ; उकळी ; हुंदका . उदा० रागाची सर , रडण्याची सर . ३ झटका ; झपाटा ; फेरी . उदा० तापाची सर ; हिंवाची सर ; पिशाचाची सर . वस्ती विराजू न पिशाच सर । - नव १३ . १२० . ४ उमाळा ; उकळी ; लहर . ममतेची , आनंदाची , डांग्याखोकल्याची सर . ६ वाताची , भ्रमाची , वेडाची लहर . [ सं . सृ = सरणें ] क्रि.वि. सरकण्याचा , निसरण्याचा , घसरण्याचा , सर असा आवाज करून . [ घ्व . ] पु. १ हार ; फुलें , मणि , मोत्यें वगैरे दोरांत ओवलेली माळ ; कंठा . २ अनेक पदरी हाराचा पदर ; वळलेल्या दोराचा पदर ; वादीचा पदर . ३ फटाक्यांची माळ ; लड . ४ बैलाची शिंगदोरी ; बैलाचा दोर ; शिंगाजवळ किंवा गळयांत अडकविलेली सांखळी . ५ लांकडाचा लांब सोट ; वांसा ; लांब बांबू ; मुसळाची सळई . ६ ( व . ) कणसाचा लांब देठ ; सरगुंडे वळण्याची काडी . ७ ( ना . ) पोटांतली आंतडीं . ८ ( व . ) पाठीचा कणा ; नाकाचें उभें हाड . [ सं . ] ९ भात वगैरे धान्य वारवण्यासाठीं वरून सोडतात ती लांबट रास . सर घालणें , टाकणें . [ सं . सृ ] न. सरोवर ; तळें ; तडाग . [ सं . सरस् ] पु. १ डोकें . २ ( ल . ) मुख्य ; श्रेष्ठ ; वरचढ . या सर्वांवर हरिपंत सर आहे . हुद्यापूर्वीहि मुख्य या अर्थी जोडतात . उदा० सरदेशपांडे ; सरदेशमुखी ; सर सुभेदारी इ . ३ ( ल . ) प्रमुख ; नेता ; चालक ( संस्था , मंडळ वगैरेचा ). ४ ( गाय , म्हैस वगैरे शब्दांनंतर योजल्यास ) संख्या ( डोकी ) दाखवितो . उदा० गाय सर एक , म्हैस सर तीन = एक गाय , तीन म्हैशी . बैल सर पाचशें पाठविलें . - रा १२८ . प्राण्यांची संख्या दाखविणेस सर व वस्तूंची संख्या दाखविण्यास सुमार शब्द योजीत . उदा० उंटे सर बारा , नारळ सुमार पंचवीस . सर करणें - जिंकणें ; पादाक्रांत करणें ( किल्ला , प्रदेश करणें ); फत्ते करणें ; तडीस नेणें ( काम , काज ). [ फा . सर ] स्त्री. ( गंजिफा ) तलफ ; राजाकरितां किंवा इतर हुकूम पडावा म्हणून केलेली खेळी . - वि . ( पत्त्यांच्या डावांत ) हात होईसें ; हुकूमासारखें . वि. ( महानु . ) योग्य . ऐसें काइसें वो निढाळपण । सर नव्हे तुझें कारण । - शिशु १७९ . ०कानगो कानूगो - पु . देशपांडयासारखा एक अधिकारी . - रा १२ . २१५ . [ फा . ] ०खुश वि. पूर्ण आनंदी ; सुखी ; संतुष्ट . [ फा . ] ०कानगोपण न. सरकानगोपणाचें वतन . संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सरकानगोपणाचे नवीन वतन रामचंद्र बल्लळ यास करून दिल्हे आहे . - वाडबाबा ३ . ३५ . ०गरम वि. १ कोंबट ; किंचित् उष्ण ; सोमट . २ संदिग्ध ; अनिश्चित ; मोघम . ३ उद्युक्त ; मोहीमशीर . पर्गणे मज्कुरीचे आबादानीस व मामुरीस सरगरम असणें . - वाडसनदा १४० . [ फा . ] ०गश्त स्त्री. मिरवणूक ; सरघस . सरगश्त व मेहदीहि निघाली . - रा ७ . ७८ . [ फा . ] ०कारकून पु. वरिष्ठ प्रतीचा कारकून . फक्त अष्टप्रधान सरकारकुनास पालख्या दिल्या . - शिचप्र २२ . ०खत न. १ सरकारकडे वेळोवेळी भरणा केलेल्या रकमांची क्रमानें केलेली नोंद ; पावती ; कौलनामा . २ विक्रयपत्र ; सरकारनें विकत घेतलेल्या मालांची पावती . ०धोपट वि. सरळ ; समोर ; बेधडक ; नीट ; वांकडातिकडा नसलेला ( रस्ता , नदी , भाषण , कृति , वागणूक ). - क्रिवि . सरळपणें ; उघडपणें ; बेधडकपणें ; खाडाखाड ; तडख ; न अडखळतां ; न गुंतता ( लिहिणें , वाचणें वगैरे ). ०खवास पु मुख्य नोकर ; अनुचराधिपति . सरदेशमुख म्हणून देऊन सरखवाशी व देहुडयांकडील चौकी पहारे व कारखाने यांस ... - मराचिथोशा १० . ०निखर क्रिवि . सरसगट ; गोळाबेरीज करून ; एकत्रपणें . ०पाठ वि. सारखे . ०खेल पु. १ खास पथकाधिकारी , स्वारांच्या पथकावरील अधिकारी ; ध्वजवृंदाधिकारी . २ मराठेशाहीतीक एक पदवी ; आंग्रे सरदारांची पदवी . तुळाजी आंगरे सरखेल यांजकडून अंमल दूर करून ... - वाडबाबा ३ . ५३ . ०खेली स्त्री. सरखेलाचा अधिकार हुद्दा , पदवी , काम . ०पाड स्त्री. सारखी योग्यता . तुम्हांस दोघां सरपाड आहे । - सारुह ७ . १०१ . ०खोत पु. मुख्य खोत . सर खोत व फुट खोत पुढें सुटीचा कज्या राहिला नाही . - समारो १५५ . ०बसर बासर - विक्रिवि . १ कमीजास्त ; थोडाफार फरक असलेला ; बरावाईट ; श्रेष्ठकनिष्ठ . सगळी मोती एकसारखी नाहीत सरबसर आहेत . २ मिश्र ; सळमिसळ ; एकवटलेले ; एकत्र केलेला . ही चांगली साखर वती नीरस साखर सरबसर करून वाढ . ३ सरासरी ; साधारण ; मध्यमप्रतीचा . तिजाईसूट सरबसर पाहून द्यावी . - सुमारो ४ . १५७ . ०मिसळ स्त्री. मिश्रण ; एकत्रीकरण ; मिसळणें . - वि . क्रिवि . मिश्रित ; एकत्र ; मिसळलेले ; मिश्र गुणांचे . दुराणी व हे सरमिसळ पळत येतात . - भाब ७१ . जळ विष सरमिसळ सळे ... - मोकृष्ण १६ . २ . ०गावडा पु. खेडयांतील एक कामगार , अधिकारी ; धनगरांचा मुख्य . ०गुर्होरो पु. १ किल्लावरील शिबंदीतील एक अधिकारी ; जमादार . २ पंथाचा मुख्य , महंत . [ फा . ] ०रहा क्रिवि . मोकळेपणानें ; अबाधितपणें ; सावकाश ; बिनधोक ; सरळपणें ( चाललेले काम , पद्धति ) ०चश्मा चष्मा - पु . प्रमुख ; अध्यक्ष ; चालक ; पुढारी ; धुरीण ; नायक ( सभा , मंडळ , खातें वगैरेचा ). [ फा . ] ०रास वि. निष्णांत ; निपुण ; तरबेज ; हुशार . - क्रिवि . एकंदरीने ; सरसकट ; सामान्यतः ०तपासणी स्त्री. एखाद्या साक्षीदाराची हजर करणार्या पक्षाने घेतलेली जबानी . ०शेवट पु. अखेरी ; अंतःशेवट ; टोंक ; अखेरीचा भाग . ०तरम पु. मुख्य मोजणीदार ; शिरस्तेदार . हुजुर कचेरी हेची दोनी तटा । सरतरम तेथीचिया महान् लाटा । - पैमा १ . १९ . ०शेवट शेवटी - क्रिवि . अखेरीस ; अंती ; शेवटी ; सरतेशेवटी . ०सकट सगट - क्रिवि . एकंदरीने ; गोळाबेरीज करून ; निवड न करतां ; सरासरी ; एकत्रपणें ; सगळें ; सर्वसामान्य . ०ताज पु. मुख्य ; प्रमुख [ फा . ] ०दफ्तर न. सरकारी कामकाज वतें करण्याचा अधिकार . भाइअ १८३४ . ०सट्टा क्रिवि . सरसकट ; मागे पुढें न पाहतां ; निवद न करतां . एखादा पुरुष सरपटटा म्हणजे योग्यता न पाहतां .... दान करू लागला .... - गीर ५४८० . ०सपाट वि. अगदी सरळ व एका पातळीत ; एकसारखे ; एकरूप ; अगदी सपाट . सरसपाट जें निर्घोट । कठिनत्व खोट ज्यांत नाही । . - ज्ञाप्र ३४ . त्या आत्मज्ञानादि सगट । अवघें झालें सरसपाट । - स्वादि १२ . ४ . ७५ . ०देशपांडे देशपांडया - पु . देशपांडयांवरील मुख्य ; मुख्य देशपांडे . ०सपाटी स्त्री. एकसारखा सपाटपणा ; समपातळी ; उखरवाखर , उंचसखल नसलेली स्थिति ; विस्तीर्ण सपाट मैदान . ०देशमुख पु. देशमुखांतील मुख्य ; सर्व देसमुखांहून वरिष्ठ पदवीदार . - बर्वे घराण्याचा इतिहास १७ ; - रा २१ . ५९ . ०देशमुखी स्त्री. सरदेशमुखाचा हक्क ; मोंगलांचे अंमलांतील प्रांतांवर मराठयांनी बसविलेला कर . हा उत्पन्नाच्या दशांश किंवा साडेबारा टक्के असे . ही बाब छत्रपतीची खासगीकडे खर्च होत असे . - थामारो २ . ९१ . ०सलूख पु. विजय व तह ; काबीज करून केलेला तह , शांतता वगैरे . नेमाड माळवा मुलुख , करून सरसलूख मोडिले वीर । - ऐपो ४१६ . ०देसगत स्त्री. सरदेशमुखी . तालुके नवलगुंद देखील सरदेसगत निसबत गोविंद भिकाजी . - समारो ३ . २५ . ०सहा क्रिवि . एकसारखा ; भेद न करितां ; सरसकट ; बिनधोक . ०नामा पु. पदवी ; किताब ; पत्रारंभीचा मायना ; आडनांव . २ प्रास्ताविक मजकूर . [ फा . सर्नामा ] ०साल न. चालू सर्व वर्ष ; संबंध वर्ष . ०सरसाल सरसालां सरसालीना सरसालें - क्रिवि . सर्व वर्षभर ; चालू साली , वर्षी . चौकशीनें सरसालें खर्च करणें . - थोमारो ९ . ३ . ०नोबत नौबत नोबद नौबद - पु . ज्यास स्वतंत्र नोबत , ( नगारा ) मिळाली आहे असा सैन्याधिकारी ; सेनापति ; सेनानी . जयसिंगराव निकम सरनोबत दिमत पागा हुजूर . - समारो ४ . ५१ . [ फा . ] ०सरसिधा सरशिधा - पु . कच्चाशिधा ; धान्य ; शेर . सरकारांतून शिपाई येईल त्यास खोत सरशिधा देईल . - मसाप २ . २ . ७ . ०पंत पु. मुख्यन्यायाधीश . या स्थापिलेल्या वरिष्ठ कोर्टामध्यें मुख्याधिपत्य सर पंत मोरो काशीनाथ अभ्यंकर यांजकडे दिले होते . - बडोद्यातील राजकर्ते ३३९ . ०सुमार पु. ( प्र . ) सईसुमार ; सोईसुमार ; सरासरी . ०परस्त पु. पालनकर्ता ; पालक . [ फा . ] ०परस्ती पु. पालकत्व [ फा . ] ०हद्द स्त्री. सीमा ; मर्यादा ; शेवट . ०पागा स्त्री. हुजूरपागा ; मुख्य सरकारी घोडदळ . ०पागे पाग्या - पु . राज्यांतील सर्व पागांवरील मुख्य अंमलदार . ०पाटील पु. जिल्ह्याच्या वसूलीवर देखरेख करणारा व त्याबद्दल शेंकडा कांहीं तरी रकम मिळणारा अधिकारी . ०पेच पु. शिंरपेच ; पगडींत खोवावयाचा तुरा . [ फा . ] ०पोतदार पु. सर्व पोतदारांवरील मुख्य ; मुख्य सरकारी खजिन्यावरील अधिकारी ; नाणीं पारखून घेणारा कामगार . ०पोस पु. १ आच्छादन ; झांकण ; वरून पसरलेलें कापड , रुमाल . ( अन्नाचें ताट , पगडी वगैरे वरील ) कोणी सरपोसवरुन पसरिति । - प्रला ११३ . २३२ . सरपोस जरी , वाराचा - समारो ४ . ११९ . २ ( ल . ) गुप्तपणा ; गुपित . आजपावेतो सरपोस राखिला . - ख ९ . ५०४२ . [ फा . ] ०बस्त बस्ता - वि . १ बंद ; लपविलेलें . २ कांहीं ठराविक सारा देणारा , सर्व सारा न देणारा ( जहागीरदार ). ०बागे पु. बागांवरील देखरेख कारणारा अधिकारी . ते सरदार ढमढेरे यांजकडे सरबागे म्हणून होते - ह . ना . आपटे चरित्र . ०बांध पु. मुख्य बांध . - मसाप २ . ३ . ७८ . ०बारगिरी बारगी - स्त्री . आधिपत्य ; सैन्यांतील हुद्दा . पन्नास घोडियाचे सरबारगी तुम्हांसी दिली आहे . - रा १५ . ३९८ . ०वुलंद वि. प्रमुख ; कीर्तिमान ; उच्चपदाधिष्ठित . ०मजमु स्त्री. मुजुमदारांवरील अधिकार्याचें पद , अधिकार . साल मजकुरीं कमावीस तुम्हांस सांगितली त्याची सरमजमु मशारनिल्हेकडे सांगितली असे . - वाडबाबा ३ . ७६ . ०मंडलोईपण न. परगण्यावरील एका अधिकार्याचें पद . व संस्थान मजकूर येथील सर मंडलोईपण व सर कानगोपणाचें नवीन वतन रामचंद्र बल्लाळ यास करून दिल्हें असे . - वाडबाबा ३ . ३५ . [ सर + मंडलवाही + पण ] ०मास्तर पु. हेडमास्तर ; मुख्य शिक्षक . शाळेचे सर मास्तर स्वभावानें मोठें गर्विष्ठ होते . - नि ६५८ . ०मुकादम मोकदम - पु . सुभ्यांतील एक अधिकारी ; मुकादमांवरील मुख्य . - शारो १४१ . ०मुख्य पु. संस्थानचा , प्रांताचा मुख्य ; होळकरांचा किताब . ०लष्कर पु. सेनाकर्ते ; स्वतः सैन्य जमवून सेनापतीचें काम करणारा . - शिचप्र ६ . ०सब्ज वि. १ ताजा ; हिरवा . २ ( ल . ) तेजीचा ; नशीबवान् . सब्जी - स्त्री . ( ल . ) भरभराट ; तेजी . ज्यांत पातशहाची सरसब्जी ते गोष्ट पातशहांस अर्ज करावी . - दिमरा १ . ६२ . ०वाद पु. गोंधळ ; घोंटाळा . ०सम्त पु. तरफेचा मुख्य . सम्मतचा मुख्य . ०सुभा सुभेदार - पु . सभेदारांवरील मुख्य अंमलदार ; त्याची पदवी , हुद्दा , अधिकार . ०हवलदार हवाला - पु . मुख्य हवालदार ; एक सैन्यांतील अधिकारी . तालुके अंजनवेल येथील सर हवाला . - समारो ३ . १७ .
|