|
पु. १ हात ; कर २ कोपरापासून मधल्या बोटाचे टोंकापर्यंतची लांबी ; तितक्या लांबीचे माप ; चोवीस अंगुळांचे परिमाण . ३ हत्तीची सोंड . ४ तेरावें नक्षत्र ( अव . प्रयोग ). ५ खांबाचा वरचा भाग व त्यावर पेलेले जाणारे ओझे किंवा पाखाडी यांमधील ठोकळा , लांकडी चापट तुकडा . ६ ( बुद्धिबळें ) एकदां प्याद्यास हात लावला कीं तें खेळलेच पाहिजे अशी खेळाची रीत , प्रकार . ( विशेषण , क्रियाविशेषण किंवा उद्गारवाचक प्रयोग होतात ). [ सं . ] पु. ( नृत्य ) आंगठा व तर्जनी यांचीं अग्रें जवळ आणणें व बाकीचीं बोटें उभीं पसरून तळहात खोलगट करणें . [ सं . ] ०क पु. १ हात . दोन हस्तक व तिसरें मस्तक यांनी नमस्कार करणें . एवढेच काय तें देण्यासारखे राहिलें आहे अशावेळी म्हणावयाचा प्रयोग . २ मदतनीस , हाताखालचा आज्ञाकिंत माणूस . ३ एखाद्याच्या सांगण्यावरून , चिथावणीनें काम करणारा इसम , गुमास्ता , अडत्या , एजंट ०कडे कडगे - न . हातांतील कडे . हस्तकडगे देऊनि कौळिक मागें फिरविले । - सप्र ३ . ७८ . ०कौशल कौशल्य - न . हातकसब ; हाताकामांतील नैपुण्य , हातोटी ; हाताची कारगिरी ; ( चित्रलेखन ; भरतकाम ; विणकाम इ० तील ). हस्तक्या - हस्तक अर्थ २ व ३ पहा . हस्तक्रिया - स्त्री . हातकाम ; हातानें केलेले काम ( अनुष्ठान रसायन इ० प्रसंगी ). ०गत वि. हातांत , ताब्यांत गेलेला ; स्वाधीन झालेला ; हाती आलेला ; काबेज केलेला ; स्वाधीन . ०गुण पु. हाताचा गुण ( चांगला , वाईट , कामधंदा औषध इ० प्रसंगी सुरो करतांना , देतांना ). ०चापल्य न. हाताचा चपळता , हस्तकौशल्य ०दोष पु. लेखांत , हाताचे दुर्गुणानें आलेली अशुद्धता ; असावधानतेमुळे हातून घडलेली चूक . ०पगदस्त पगदस्ता - वि . ( बुद्धिबळ ) एकदां प्याद्यास हात लाविला कीं तें खेळलेच पाहिजे किंवा एकदा एखादे प्याद्ये एखाद्या जागी नेऊन बसविले की तेथेच ठेविले पाहिजे अशा कडक नियमाने खेळावयाचा प्रकार , पद्धत ज्यांत आहे असा ( खेळ , बाज ). - क्रिवि . वरील नियमाप्रमाणें ( क्रि० खेळणें ). [ हस्त = हात + पग = पट + फा . दस्त - हात ] ०पत्रक न. थोडक्यांत माहिती देणारे पत्रक ; प्रसिद्धीपत्रक ; जाहिरात . ०परिक्षा स्त्री. हाताने स्पर्श करून , हात पाहून रोग , भविष्य इ० सांगणे . ०पाव पु. खांबाखालील व वरील भाग ; पिढें आणि तळखडा . [ हात + पाय ] ०मात्रा स्त्री. हातांतील कडी , तोडा इ० अलंकार . हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासी वोपिल्या विचित्रा । - एरुस्व १५ . १४९ . [ सं . ] ०मिलाफ पु. हस्तादोलन ; ( इं . ) शेकह्यांड . ०लाघव न. १ हस्तकौशल्य . २ हाताचा हलकेपणा ; हस्तचापल्य . ०शाखा स्त्री. अव . हाताची बोटे . महाकर्कशाकार ताराच देखा । क्षणें लागतां खंडल्या ह्स्तशाखा । - मुगयुद्ध १८० . ०संकोच पु. ( हात आखडणें ), कृपणपणा , चिक्कूपणा . ०सामुदिक न. हातांवरील रेषा पाहून भविष्य सांगण्याचे शास्त्र . हस्तागौर , हस्तागौरी - स्त्री . हस्तनक्षत्री हत्तीवर बसविलेली गौरीची मूर्ति . हिचे व्रत असतें त्यास हस्तागौरीव्रत म्हणतात . हत्ती , शंकर , पार्वती , गणपती या चार मूर्ति सोन्याच्या करून त्यांची चौदा दिवस पूजा करून समाप्तीच्या वेळी हत्तीसह त्या मूर्ती ब्राह्माणांस दान देतात . - गजगौरीव्रत हस्तांतर - न . हातांचे अंतर . ( ल . ) भिन्नपणा . तैसा मीचि अज्ञानद्वारें । दिसे परी हस्तांतरें । - ज्ञा १८ . ११२८ . हस्ताक्षर - न . १ स्वतःच्या हातचे , स्वतः लिहिलेले अक्षर . २ स्वतःची सही ; स्वाक्षरी . हस्तें - क्रिवि . १ हातानें . २ तर्फे ; मार्फत ; करवी . ( देणे ; घेणें इ० ). राघोनारायण यांजकडील जमा रुपये हजार हस्तें दाजीबा । हस्तें परहस्तें - क्रिवि . स्वतःच्या हाताने किंवा ( व ) दुसर्याकडून ; प्रत्यक्ष अथवा ( आणि ) अप्रत्यक्ष . हस्तोदक - न . १ हातावर घ्यावयाचे पाणी . २ जेवणाच्या वेळी संन्याशाच्या हातावर घालावयाचे पाणी . ३ दान देण्याच्या प्रसंगी उदक सोडण्यासाठी हातांत घ्यावयाचे , हातावर सोडावयाचे पाणी . तो तूं परब्रह्मचि असावे । मज दैवे दिधलासी हस्तोदकें । - ज्ञा १० . ३२२ . ४ हस्तनक्षत्री पडलेलां पाऊस . हस्त्य - वि . हातासंबंधी ; हातचे .
|