Dictionaries | References

हात दावणें

   
Script: Devanagari
See also:  हात दाखविणें

हात दावणें

   ज्योतिषापुढें हात करणें. ( भविष्य सांगण्यासाठी )
   अहितकारक परिणाम करणें.
   सामर्थ्यं दाखविणे. ‘शक्रादि देव असते तरि त्यांसहि दावितोंच हात रणीं ’ मोभीष्म ३.४.
   वैद्यापुढे रोगनिदान करण्यासाठी हात करणें.
   हातानें वस्तु दाखविणें.
   पारिपत्य करणें
   शिक्षा देणें. ‘ अगोदर तंटयांत पडूं नये आणि एकदा पडल्यावर प्रतिपक्षाला चांगलाच हात दाखविल्याशिवाय राहूं नये ’-विकारविलसित. ‘ चांगला असतों तर एकेकाला असा हात दाखविला असता, कीं एका तोंडाचीं दोन तोंडे झाली असती.-एकच प्याला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP