-
स्त्री. शिंतोडा ; सडा ; पाण्याचे उडणारे बारीक थेंब ; पर्जन्यतुषार . ( क्रि० उडणें ; उडवणें ; मारणें ) पावसाची शिंट लागूं नये म्हणून पागोळीला झडी बांधली पाहिजे . [ सं . सिच् ]
-
स्त्री. पक्ष्यांचा मल , विष्टा . शीट पहा . शिटवा - पु . ( राजा . ) वाघळाची , पाखराची विष्टा ; शीट , शिटणें - क्रि . विष्ठा टाकणें . ( पक्ष्यादिकांनी ); मळ थोडा पडत असेल तेव्हां लहान मुलांसंबंधींही उपयोग करितात . २ घोडीनें उनाड सुटून हलक्या प्रतीच्या घोडयांपासून मैथून करून घेणें . शिटवा - पु . ( राजा . ) वटवाघूळ , पक्षी इ० ची विष्टा , शिट पहा . शिटाऊ , शिटाव , शिटवा - वि . ( ग्राम्य ) १ एखाद्या मरतुकडया घोडयापासून झालेलें ( शिंगरू ), शिटलेल्या घोडीपासून झालेला वाईटसाईट ( घोडा इ० ). २ ( ल . ) क्षुद्र , अकुलीन हरामी इसमाबदल वापरावयाचा अपशब्द ; छाकटा ; हलकट ; पाजी ; हीन ; नीच . ३ ( अशिष्ट ) धूर्त ; हुषार ; लबाड ; बिलंदर , सोदा अशा अर्थानें लहान मुलाबद्दल योजतात .
-
०बंदर न. लबाड , सोदे , भामटे वगैरे तर्हेच्या लोकांनीं भरलेलें बंदर . गुरुजी ह्यापरिचे । शिष्य शिटाऊ बंदरीचे .
-
f A drop of rain, &c. as sprinkled against.
Site Search
Input language: