|
प्रकटबीज वनस्पति उपविभाग, जिम्नोस्पर्मी ज्यांची बीजे किंजपुटात (भावी फळात) बंदिस्त नसून किंजदलावर उघडीच असतात अशा सापेक्षतः प्रारंभिक बीजधारी वनस्पतींचा उपविभाग. प्रमुख लक्षणे- काही जीवाश्मरुपात व काही विद्यमान वनश्रीत आढळतात. लघुबीजुकपर्णे व गुरुबीजुकपर्णे बहुधा स्वतंत्र शंकूवर व एकाच किंवा भिन्न झाडांवर, गंतुकधारी पिढ्या फारच ऱ्हास पावलेल्या असून अंदुककलश बहुधा आढळतो, रेतुकाशय ऱ्हसित व रेतुके क्वचितच चलनशील, परागनलिका व परागण फुलझाडांतल्याप्रमाणे, बहुधा प्रकाष्ठात वाहिन्या नसतात. फळे बनत नाहीत. पक्वावस्थेत शंकूफळ रुक्ष असते. यामध्ये सात किंवा आठ गणांचा समावेश करतात. Cycadales, coniferales, Ginkgoales, Taxales, Gnetales, Bennettitales, Cordaitales, Cycadofilicales (Pteridospermeae) उदा. सायकस, बिरमी (यू) देवद्वार, चिल, चीड, थुजा, आभाळ, गिंको, उंबळ (कोंबळ) इ.
|