-
पुन . १ प्रयत्न ; श्रम ; यत्न ; बल . मनुष्याने किती नेट केला तरी काय पर्वत लोटेल ? २ जोर ; ताण ; दाब ; भार . तुळइवर नेट पडला म्हणून वांकली . ३ ( ल . ) निकड ; तगादा ( सावकार , भिकारी , खाष्ट मालक इ० चा ). दमाजी गायकवाड यांजवर गिलचांनी येऊन नेट बसविला . - भाब ११५ . माझे पाठीशी रुपयाविषयी सावकाराचा फार नेट लागला आहे . ४ ( ल . ) खंबीरपणाचा निश्चय ; दम ; हिंमत ; कार्याचा मोठा उत्साह ; चिकाटी . ( क्रि० देणे ). नेट दिल्यांवाचून पंचाईत शेवटास जाणार नाही . ५ मोट - विहिरीच्या उभ्या खांबाखालचे कुसुवाचे दगड . ६ सुताराचा अथवा लोहाराचा कारखाना . ७ ज्यावर तासकाम , कापणे इ० करावयाचे असते तो ठोकळा ; खाटकाचा ठोकळा . ८ ( सामा . ) आधार ; मदत . ९ जोर ; वेग . १० ( कु . ) ताठा ; अभिमान . त्याका काय नेट आसा पण ? ११ ( कु . ) ताठपणा . तुझ्या कामरेक नेट नाय काय ? १२ ( महानु . ) धडक ; भिडणे . नावेक घे पां नेटु । येणे आचारविरेसी । - भाए २१९ . [ ? का . नेट्टगे = सरळ , नेट्टी ] ३ उत्सुक ; तत्पर . मुमुक्षू माजी अति नेटक । - एभा १३ . ७३८ . २ नेटाचा ; नेटदार .
-
०दार वि. १ धट्टाकट्टा ; मजबूत ; कार्यक्षम ; सहनशील ( माणूस , जनावर ). २ वजन , दाब इ० सहन करण्यास योग्य ( तुळई , खांब इ० ).
-
०पाट पु. १ जोराचा प्रयत्न ; दृढ निश्चय . ( क्रि० देणे ; लावणे ; करणे ). दृढ मांडिला नेटपाटू । जाला गहिवरांचा वोहटू । - कृमुरा ६६ . ४१ . २ तगादा ; निकड ; जुलूम . ( क्रि० लावणे ; लागणे ; बसणे ). [ नेट द्वि . ] नेटापाटाचा वि . १ कठिण व अवजड कामास योग्य ; ताण , ओढ सहन करणारा ( माणूस , इंजिन इ० ). २ धीराचा ; नेटाचा ; निर्भय . ३ ( व्यापक ) जड ; वजनदार ; जंगी ( पीक , पाऊस , वादळ , कामाचा धबडगा ). नेटबाजीचा वि . १ आग्रहाचा ; तगाद्याचा ; निकडीचा ; नेटपाटाचा . २ लवकरचा ; जवळचा ; येऊन ठेपणारा , ठेपलेला . नेटाचा , नेटक --- वि . १ निश्चयी ; दृढ ; धीराचा ; स्थिर ; नेटदार पहा . सेनापती तो सत्विक । भारी बलराम नेटक । - एरुस्व ५ . ४० . २ मजबूत ; जोरकस ; ताकदवान ; दमदार ( जनावर इ० ).
-
०नेटणे अक्रि . १ यत्न करणे ; झटणे ; जोर करणे ; श्रम करणे ; मुख्यतः नेटून या रुपांत दुसर्या क्रियापदाशी जोडतात . जसेः - नेटून चालणे - बोलणे - जेवणे इ० . २ भिडणे ; खेटणे ; हाताशी असणे ; अगदी पाठीशी येऊन ठेपणे . लग्न उद्यावर येऊन नेटले तथापि कशास अद्यापि ठिकाण नाही . ३ खणपटीस बसणे ; निकड लावणे . ४ पलीकडे ढकलणे . रेटणे पहा . नेटावणे अक्रि . जोराने , तडफेने कामास लागणे . नेटावा पु . १ नेट ; टेका ; धिरा . ( क्रि० देणे ; लावणे ). असे म्हणून जोराचा नेटावा दरवाजाला लावून पुढील संभाषण ऐकण्यासाठी ती तत्पर होऊन राहिली . - स्फूर्ती २ . ३७२ . २ जोराचा प्रयत्न . ( क्रि० देणे ). नेटी वि . ( व . ) नेट करणारा ; पिच्छा पुरवणारा . नेटे क्रिवि . ( अशिष्ट ) जलदीने ; तडाख्याने ; लवकर ; त्वरित . कांगा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटे । - तुगा १६१७ . नेटपाटे , नेटेपाटे क्रिवि . १ निश्चयेकरुन . तेथे काळाचेनि हटतटे । वृत्ति ब्रह्माचिये वाटे । लावूनिया नेटेपाटे । चिन्मात्र पेठे विकिली । - एभा ११ . ९९९ . २ हातोहाती ; नेटेबोटे पहा . ३ त्वरेने . पितर नेटेपाटे धांवती । - एभा १९ . २३३ .
Site Search
Input language: