Dictionaries | References l Liliales Script: Latin Meaning Related Words Liliales राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पलांडु गण, लिलिएलीझईकदलित वनस्पतींतील या गणात ज्या कुलांचा समावेश केला जातो त्याबद्दल मतभेद आहेत, लिलिफ्लोरी या गणात एंग्लर यांनी जुंकेसी, लिलिएसी, ऍमारिलिडेसी, डायॉस्कोरिएसी, इरिडेसी इत्यादी नऊ कुले घातली होती, परंतु बेंथॅम व हूकर यांनी या कुलांची व इतर काहींची (गणांची)विभागणी भिन्न श्रेणीत केली. बेसी व हचिन्सन यांनी लिलिएलीझ गणातील कुलांची फेरवाटणी केलेली आढळते, काही कुले (इरिडेलीझमध्ये) केसर गणामध्ये तर काही (ऍमारिलिडेलीझमध्ये) मुसली गटात तर काही अननस गणात व कदली गणात समाविष्ट केली आहेत. पलांडु कुलाचा अंतर्भाव मात्र पलांडु गणात आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP