न. ( अप .) आंग
- शरीर ; देह .' पै जयाचेनि अंगसंगें । ' - ज्ञा ९ . २६९ . ' अंगाला वारा लागेल , आंत जा । '
- अवयव ; इंद्रिय ; गात्र . ' अति क्षीणता पावलीं सर्व आंगें . ' - दावि २४२ .
- ( ल .) कोणत्याहि गोष्टीचा घटक , विभाग ' हत्ती , रथ घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगे समजलीं जात असत .'
- बाजू ; दिशा . दारा अंग =( व .) दरवाज्यामागें किंवा जवळ . ' आठै आंगें पोळती । वसृधरेंचीं । ' - शिशु ७४८ . ' किल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा . ' - ऐपो १८३ . ' तुमचें पागोंटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें .' ४ वेदांग ; वैदिक वाडमयापैकी विशिष्ट ग्रंथ समुहास संज्ञा . उदा० शिक्शा , ज्योतिष , निरुक्त , इ .
- एखाद्या कामांत असलेला हात , घेतलेला भाग किंवा संबंध . ' त्या मसलतीत रामाजींपतांचें अंग आहे .'
- चोरून मदत किंवा मिलाफ ; आश्रय ; फुस . ' ह्मा चोराला कोतवालाचें अंग आहे .' ' ही सासुबरोबर भांडते , हिला नवर्य़ाचें अंग आहे .'
- अधिष्ठान ; ठिकाण ; शरीर ; देह ( एखाद्या गुणदोषाचा कर्ता , पात्र ). ' ही चोरी ज्याचें अंगीं लागेल त्यास मी शासन करीन ,' ' त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे .'
- ( एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा ) गौण , अप्रधान ; भाग . उ०विवाहामध्यें होम हा प्रधान आहे . अवशिष्ट कर्में अंगें होत .
- खुण . ' अंनुभवाचीं आंगें जाणें । ' - दा ५ . ९ . २२ .
- आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येनारा भाग , किंवा पसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग . ( सामा .) गुदद्वार . ' आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला ' - विक्षिप्त १ . १३५ .
- विशिष्ट काम करण्याची पात्रता , ताकद , क्षमता , बुद्धि .
- आपल्या बाजूचा माणुस ( मोठ्या अधिकावरील ); पुरस्कर्ता , तरफदारी करणारा ; वशिला ' दरबारांत अंग असल्यावांचुन कार्य सिद्धिस जात नाही .'
- ( ज्यो .) पूर्वक्षतिजावरील क्रांतिवृत्तावरचा बिंदु , अंश . ( अस्तलग्नाच्या उलट ).
- ( संगीत ) प्रबंधाचा पोटीविभाग ; रागवाचक स्वरसमुदाय ; हे विभाग सहा आहेत ;- स्वर , विरुद्ध पद , तेनक , पाट , ताल .
- ( ताल ) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगे सात आहेत ;- अणु , द्रुत , द्रुताविराम , लघु , लघुविराम , गुरु व प्लुत .
- कौशल्य ; चातुर्य ; कल . ' त्याला गाण्याचें अंग आहे .'
- मधधाच्या पूर्वेचाजुना जुना बंगला देश ; सध्याचें मोघीर , भागलपूर , पुर्णिया इ० . जिल्हे यांत येतात . याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे . पुढील काळी शोण , गंगा या नद्यांच्या आसपासच्या प्रदेश ; कर्णाचें राज्य .
- आचारांग सुत्रापैंकीं एक जैन आगम ग्रंथ .
- स्वतः खुद्द . आंगें असाहि प्रयोग आढळतो . ' दीप वांचुनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं। ' - अमृ ३ . २० . ' राहोनि गुप्त धृष्टद्युम्नें तच्छोध लाविला आंगें । ' - मोपादि ३४ . १८ . २० घालाघालींचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें । ' - शिशु १००६ . ' कारभाराचें सांगावें अंग कैसें । ' - दा ११ . ५ . २३ . - शअ . ( व .) कडे . उ० ' भिंतीअंग ' ( वाप्र .)
०ओढविणें आपल्या आंगावर घेणें ; स्वतः पुढें होणें ; ( एखाद्या कार्यातकडे ). ' आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्यांचें निवारिलें महादुःख । '
०काढणें , काढून घेणें - स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणे ; संबंध तोडणें ( एखाद्या कामांतून ). ' मी त्या कामांतून आपले अंग काढून घेतले आहे .'
- ( कु . गो .) दचकणें . ' आंग काडप .'
०घालणें - हात घालणें ; मदत करणें ; मन घालणें . ' या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल .'
- दुःखामुळें ( जमिनीवर पडणें ) ' ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी । ' - दा ३ . ५ . ३० .
०घासणें झीज सोसणें . ' परांजप्यांनीं प्रांमाणिकपणानें अंग घासून ... स्वतःची स्कीम करून कार्यास लागावें ' - केले १ . २६३ .
०घेणें, भरणें - लठ्ठ होणें .
- ( गो . ' आंग घेवप .') ( कामांत ) भाग घेणें .
०न पुढें न सरसावणें ; भाग न घेणें .
घेणें पुढें न सरसावणें ; भाग न घेणें .
०चढणें सदरांत पडणें ; वर्गींत येणें . ' जें विधीसी नातुडे । तें निषेधाचें अंग चढे । ' - एभा ७ . ६९ .
०चढून येणें, ( व ) ताप भरणें , चढणें , ०चोरानें - जोगावणें - अंग राखून काम करणें ; टंगळमंगळ करणें ; चुकारपणा करणें . ' संत सेवेसी अंग चोरी । वृष्टी न पडो तयावरी । '
- शरीराचा भाग आंकुचित करणें ( मार चुकविण्यासाठीं ). ' असा अंग चोरतोस म्हणुन नीट लागत नाही .'
०जड करणें ( गो० ' अंग जड करप ') एखाद्या कामांत भाग घेण्याचें टाळूं पहाणें .
०जड जाणें ( गो . ' आंग जड जावप .') अंगावर कांटा उभा राहणें .
०झांकणें, लपविणें स्वतःची बाजू किंवा भाग ( कामांतील ) दाबून गुप्त ठेवणें .
०झाडणें साफ नाहीं म्हणुन सांगणें ; नाकबूक करणें . ' आंग झाडिती न मर्मे । येणें बोलें । ' - ज्ञा १७ . ३७२ .
०टाकणें - आश्रय करणें . ' योगें आंग टेकिलें योगीं । ' - अमृ ९ . २६ .
- अशक्त होणें ; वाळणें . ' आई गेल्यापासून बाळानें अंग टाकलें आहे .'
- जोरानें देह जमिनीवर टाकणें . ३ विश्रांतीसाठीं आडवें होणें ; कसेंतरी
अस्ताव्यस्त पसरणें . ' घरी जाऊन केव्हा अंग टाकीन असें मला होतें .'
०दर्शविणें एखाद्या गोष्टीत किंवा व्यवहारांत हात किंवा संबंध आहे असें भासविणें .
०दाखविणें एखाद्या कामांत कौशल्य दाखविणे ; फड जिंकणे .
०न दाखविणें अंग असल्याचें लपविणें ; मागें रहाणें , जबाबदारी टाळणें . ( गो . आंग दाखैना जावप .')
०देणें - मदत करणे ; हातभार लावणें .
- प्रवृत्त होणें ; वळणे . ' सुखा अंग देऊं नये । '
०दोडपणें, दुडपणें, दुमडणें ( गो . आंग दोडप .') अंग चोरणें .
०धरणें - ताठरणें ; संधिवातानें शरीर आंखडणें .
- लठ्ठ होणें ; ताकद येणें .
०मरणें अर्धीगवायूनें शरीर अथवा एखादा अवयव बधिर होणें .
०मारणें - अंग चोरणें पहा .
- जोरानें अंग आंत घुसविणे . ' मीं दाटींतून अंग मारलें .'
०मुरडणें मुरडणें ; मागें पहात दिमाखानें जाणें ; ठमक्यानें जाणें ; ' नवी साडी नेसून पोर पहाकशी अंग मुरडीत चालली आहे .'
०मोडून काम करणें खंपणें ; श्रम करणें ; अतिशय मेहनत करणें ; जिवाकडे न पाहतां काम करणें ; जीव पाखडुन काम करणें .
०मोडून येणें तापानें अंगावरकांटा येणें ; कणकणणें ; कसकसणें . ' तदुपरि अविलंबें आंग मोडून आलें । ' - सारुह ३ . ५७ .
०येणें ( गो . ' आंग यॅवप .') १ लठ्ठ होणें . २ प्रसूति समयीं गुह्मांग बाहेर येणें .
०रक्षण करणें, राखणें - वांचविणें अंग चोरणें ; आपला बचाव करणे . ' यश रक्षावें न आंग लेकांहीं । ' - मोउद्योग १० . ६१ . ' वत्से भीमें एकें काय कारावें ? न अंग राखावें । ' - मोभीष्म ३ . ४
०सोडणें ( गो . ' आंग सोडप ') खंगत जाणें .
०हलकें होणें ( गो . आंग . ल्हवु जावप .') हायसे वाटणें ; ( जबाबदारींतून ) मोकळें झाल्याबद्दल समाधान वाटणें ;
- स लावणें - लादणें चिकटविणें ; शाबीत करणें ( गुन्हा , अपराध ). अंगीं - याने आरंभ होंणारे वाप्र .
- चे चकदे काढणें ( मासांचे तुकडे करून काढणें ) जोरानें बेदम मारणे ; अंगाची सालडी काढणें .
- वर घेणें - मुलास प्यावयास घेणें . देणें ; यान देणे .
- स्वतःवर जबाबदारी घेणें .
- आपला म्हणणें , अतिशय प्रीति दाखविणें .
- स - आंगीं - लागणें - पुष्टिकारक होणें ; लठ्ठ होणें .
- एखादा दोष किंवा गुन्हा अंगावर
शाबीत होणे , लागु होणें ' तेथें न करितां चोरी । आंगी लागें । ' - दा ६ .
१ . ७२ .
- तोटा सोसावा लागणे ; ठोकर बसणे ; अंगावर शेकणें .
- वर कोसळणें - कोसळून पडणें - ओघळणें - रागानें एखाद्याच्या अंगावर चालून जाणें . पडणें
- संकट अपत्ति वगैरे गुदरणें ; जबाबदारी येणें ; आपत्तीत सांपडणे .
-खाली पडणें - सवयींचें होणें .
- भोग देणें . रतिसुख देणें घेणें .
- स मुंग्या येणें वातादि विकारांमुले अंगाला एक प्रकारची बधिरतां येणे .
वर कांटा उभा राहणें भीतीनें किंवा आनंदानें अंग रोमांचित होणें . ' वृत्तश्रवणें आला सर्वांगीं आमुच्या पहा कांटा । ' - मोकर्ण १८ . १ .
- वर देणें जामिनकी किंवा गहाण न घेतां वैयक्तिक जबाबदारीवर कर्ज वगरे देणें .
- स लावणें - ( बायकी ) स्नानाच्या अगोदर तेल व हळद अंगाला लावणें , चोळणें .
- बाळंतिणीच्या अंगाला तेल लावणें .
- त शीळकळा येणें ( माण .) अंगांत देव येनें , वारें येंणें .
- असणें - जवळ , पदरीं असणें ; ठायीं असणें . ' हा दोष माझ्या अंगी नाहीं .'
- निराळा - बाजेर टाकणें - झोंकणें - सोडणें - झिडकाविणें ( कामधंदा , जबाबदारी ) सोडुन देणें ; माथ्यावर , अंगावर न घेंणे . '
पेशव्यांनी आम्हाला आंगाबाहेर टाकले आहे .' - अस्तभा २४ .
- वरचें तोडणें तान्ह्या मुलाचें अंगावर पिनें बंद करणें.
- स येणें - होणे अंगाबरोबर होणें .
- ची आग - लाहकी - होळी रागानें संतापानें अंगाची आग होणें .
-चा हुरपळा - भडका अंग अतिशय तापणें ( तापानें , संतापाणें ); लाही होणे ; आग होणे .
- त्वरचें जाणें ( बायकी ) महिन्याच्य अमहिन्यास तरून स्त्रीच्या शरीरांतुन जसें दुषित
रक्त बाहेर जातें तासें अवेळीं जाऊं लागलें ; धुपणी रोग होणें .
- वर गोण किंवा गोणी येणें ( व .) अंगावर जोखीम किंवा जबाबदारी येणें .
- स बसतें येणें अंगाला बरोबर बसेल असे होणे . ( कापड इ० ) नोकरलोकांच्य अंगास बसते
येतील असे पोषाख करण्यात यावेत .' - खानगींतील नोकरांचे पोषाख ( बडोदें ) ७
.
- चा आळापिळा करणें - अंग पिळवटणें ; आळेपिळे देणें .
- अतिशय श्रम करणें .
- चा खुर्दा ( श्रमानें ) अतिशय श्रमानें अंग ठणकणें ; गलितगात्रें होणे : मणकें ढिले होणे .
- ची चौघडी करणें - शरीराच्या चार घड्या करणें ( डोंबार्याच्या कसरतींत ).
- सर्व अंग पोटाशी घेऊन निजणें ( थंडी , ताप इ० मुळें )
- वर घेऊन स्वतःवर जबाबदारी घेऊन आपलें म्हणुन ; कैवार घेऊन ( क्रि०करणें ; बोलणे ; सांगणें ; पुसणें ; विचारणें ; )
- स - अंगीं - येणें - व्यापारांत बूड येणे ; नुकसान होणें ; ठोकर बसणें . ' मिरच्यांचा व्यापार
अंगास आला .'
- अंगात बाणणे . ' मराठीच्या अंगीं आलेली क्षीणता
क्षणमात्रहि झांकली जाणार नाही .' - नि
- चा आंकडा होनें आंकडीनें पेटके येणें ; अंग वांकडें होणें .
- वरून वारा जाणें अर्धोगवायु होणें . ' भूतपिशाच्य लागलें । अंगावरुन वारें गेलें । ' - दा ३ . ७ . ५५ .
- बरोबर - त बसणें एखादा कपडा अंगास बरोबर बसणें , ठिक होणें , बेताचा होनें ; - ला
लावणें - अंगास तेल वगैरे चोपडणें . ' नवी नवरी म्हणुन अंगाला लावीन
म्हटलें नाही !' -' झांमु . २ बाळंतिणीचें अंग रगडणें , चोळणें .
- च्या चिंध्या करणें - ( व .) अंग ओरखडणे .
- त्रास देणें .
- चें पाणी करणें अतिशय श्रम करणें ( त्यामुळें अंगास पाणी , घाम येणें ). ' अंगांचें
पाणी करूनच या हतभाग्या आयुष्याचें दिवस मला लोटले पाहिजेत .' - पाव्ह ९९
.
( एका ) - वर असणें एका कुशीवर निजणें ; पडुन राहणें . -
- त येणें - वारें शिरणें - भुतसंचार होणें .
- अतिउत्कंठेनें काम करणें .
- वर पडणें - येणें - शिरावर पडणें ; विक्रीत नफा होईल म्हणुन जो मला खरीदी केला तो
अडीअडचनीमुले भाव उतरल्यामुळें आपल्याजव्ळ पडुन राहणें ; तोटा भरुन
देण्याची जोखीमदारी अंगावर येणे .
- गळ्यांत येणें ; एखादा धंदा अगर काम
करण्यास भाग पडणें .
- रागानें चालून जाणे : वसकन अंगावर येणें .
- हल्ला करणे ; चालून येणे .
- खालीं घालणें स्वतःच्या चैनीसाठीं अथवा उपभोगासाठीं राखणें ( वेश्या , परस्त्री , इ० )
- वर पिणें , खाणें ( मुलानें ) स्तनप्रासन करणे ; स्तनप्राशन करण्याइतके लहान असणें .
- चे धुडके उडविणें ( शरिराच्या ) लकतर्या काढणें ; चेंदामेंदा करणें ; फार झोडपणें . त्या बदमाषानें त्याच्या अंगांचेनुसते धुडके उडविले .'
- आणणें - आपल्या वर घेणे ; ताबा घेंणे .
- आपल्या ठिकाणी असूं देणें ; स्वाधीन राखणे . ' हा गुण अंगीं आणण्याचा प्रयत्न कर '
- चें आंथरूण करणें स्वतःबद्दलची काळजी सोडुन सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें ;
एखाद्याचें काम करण्यासाठी स्वतःच्या जीविताची पर्वा न करणे . ' त्याचें
लग्न व्हावें म्हणुन म्या अंगाचेम अंथरुण केलें तरी त्याने त्याचें लग्न
व्हावें म्हणुन म्या अंगाचें अंथरून केलें तरी त्याने त्याचा कांही उपकार
मानला नाही .' - चें आंथरूण होणें -( तापामुळें ) अशक्तता येणे ; उठवणीस
येणें ; मरगळीस येणें .
- वर देणें - बांधणें - भरणें - पोसणें - करणें इ० - स्वतःच्या जबाबदारी - साधन - संचयावर देणें , बांधणें वगैरे .
- वर काढणें आजार वगैरे सोसणें .
- स झोंबणें ( व .) अंगास स्पर्श करणे ; धरणे .
चें कातडें काढून जोडा शिवणें ( एखाद्याविषयीं ) अतिशय कृतज्ञता , आदरबुद्धि दाखविणें .
- ची लाही - अंगाचा हुरपळा होणे पहा .
- उन्हानें अतिशय अंग तापणे ; काहिली होणें
; भडका होणें .
- अतिशय संताप येणें ( जोंधळा इ० धान्याची भाजून लाही
होते त्याप्रमाणें ); तें तिजला खपले नाहीं । अंगाची झाली लाही । ; - विक
१७ .
अंगांत मांग शिरणें शरिरांत अतिशय क्रोधाचा संचार होणें . ( मांग हा फार क्रूर समजला जातो यावरून ).
- चे - चा तिळपापड रागानें शरीराची लाही होणें . ' मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या
अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाही . ' - मोर १५ .
- स कुयला लागणें मत्सरानें किंवा संतापानें हिरवा - निळा होणें ; मिरच्या लागणें ; अतिशय राग येणे .
- वर शेकणें तोटा होणें ( व्यापारांत ); बुड येणें ( रुपयें व्यवहार , इ०ची ); कुमांड येणें . - वरचें - वि . दूध पिणारें ( मूल ).
- वर तुटणें - तुटून पडणें हल्ला करणें ; धांवून जाणें ; एकदम चालून जाणें .
- ची लाही करणें संतापविणे ; खिजविणें ; भाजणें ; जाचणें .
- निराळें करणें - अंगाबाहेर टाकणें पहा .
- चाखकाणा करणें -( व .) संताप करून घेणें .
०आद्ळणें अंगास चिकटणें , कोसळणें , ' अंगी आदळतो शोक .' - दावि ४२३ .
अंगीं ( एका अंगीं )- अगे - उणा - वि . १ आईबाप मेलेला ; पोरका ; विधवा ; विधूर २व्यंगी ; लुळा ; कमीपणा असलेला ; एका पायांने लंगडा ; ३ ( ल .) सरळ , ताठ नसलेला ; उणेपणा असलेला ; कमजोर बाजू असलेला ; लुच्चा ; जाणुन उणेपणा असलेला कमजोर बाजू असलेला लुच्चा ; जाणुन बुजुन अपराधी .
म्ह० अंगीं उणा तरजाणे खाणाखुणा = ज्याला आपला कमीपणा ठाऊक आहे तो लोकांची टीका आपल्याला चिकटवून घेतो .
०खिळणें शरीरांत भिनणें .
०घुमारणें भूत लागणे ; अवसर येणे . ' आणि आंगीं घुमारिलें .' - दावि १५६ . -
चा उतारा - वि . अंगावरून ओवाळून दिलेला , काढून टाकलेला जिन्नस ( वस्त्र , अलंकार इ० ) ' तुझें अगीचा उतारा । तो मज देई गा दातारा। ' - भज ४२ . -
ची सावली करणें -( स्वतःचा ) आश्रय देणें ; ' आपुलिये आंगीची सावली । अहोरात्र कऋनि तया रक्षी । ' -
जिरणें - सरावाचें होणें ; मुरणें . -
ताठा भरणें - गर्विष्ठ होणें . ' अंगीं भरलासें ताठा । वळणीं न यें जैसा । खुंटा । ' -
तुटणें - अशक्त होणे ; वोळणें ; रोड होणें ( मुल ). -
नसणें - १ जातीनें अनुभव , माहिती नसणे . २ स्वतःचा नसणें ; मुळचा नसणें . ' इतका उद्धटपणा त्याच्या अंगीं नाहीं .' -
पडणें - १ सहाय , पक्षपात करणें . ' हा अविद्येचा अंगीं पडे .' - अमृ ६ . ६ . २ सवय होणें . अंगीं मुरणें पहा . -
फुटणें - १ लठ्ठ होणें ; गुबगुबीत होणें . २ एखादा रोग अंगावर स्पष्ट दिसणें . वाहणे . ( रक्तपिती इ० ) -
बसणें - सुगम असणें ; सेवय होणें . -
बिर्हाड देणें - करणें - शरीरांत थारा देणें ; हृदयांत , अंतःकरणांत बाळगणें ; आस्त्रा देणें ( दुर्गुण , पापवासना इ० ना ). -
माशा मारणें - आळशी बनणें . -
( माशीं ) भरणें - लठ्ठ होणें . -
मिरच्या , कुयले , लागणें - झोंबणें -( एखाद्यानें मर्म काढलें असतां ) रागानें जळफळणें . -
मुरणें - १ संवयीचा होणें . २ हाडीं शिरणें ; शरीरांत ( ताप ) भिनणें . ३ जिरणें ; बाहेर न येणें . ( देवी , गोवर ). -
येणें - अंगात भुताचा संचार होणें ; अवसर येणें ; भूतबाधा होणें . ' शुद्र येक त्याचें आंगीं आला बोले । ' - रामदासी २ . ११ . -
लागणें - अन्न पचणें ; लठ्ठ होणें . ' त्याच्या अंगीं अन्न लागलें .' -
वाजणें -( वाजणें ) अंगांत शिरणें ; शोभणें . ' थोरपण अंगीं वाजे नाना ' - दावि ६५ . अंगीं - गें - १ स्वतः , जातीनें .
म्ह० ' अंगें केलें तें काम । पदरीं असे तो दाम । ' ' अंगे करिताती आपण । दोघें जण मिळोनी । ' - एभा ७ . ५७८ . ' अंगे धावे कार्यासमान । ' - नव १६ . १७५ . २ च्या वतीनें मार्फत ( प्रतिनिधि .) दादा अंगें वयनी सोयरी .
अंगें , आंगें - शा , जवळ ; बाजूस . ' पाण्याचा तांब्या बापुचें आंगें होता .' - बाळ २ . ६८ .
म्ह० १ अंगी ( माझ्या इ० ) का माशा मेल्या आहेत = काय ( मी ) आळशी आहें , का माझा धंदा काय माझा मारीत बसण्याचा आहे ? २ आली अंगावर तर घेतली शिंगावर = सहजासहजीं , आगाऊ न ठरवितां एखादी गोष्ट अंगावर येऊन पडली असतां , आडवी आली असतां ती करणे ( बैलाच्या शिंगाच्या टप्प्यांत कोणी आला तर तो त्याला शिंगावर घेण्याला कमी करीत नाहीं . यावरून आयता मिळालेला फायदा करून घेणें हा अर्थ ). ३ अंगापेक्षां बोंगा मोठा ; अंगापेक्षां बोंगा , कोठें जासी सोंगा =( शरिरापेक्षां धोतराचा अथवा लुगड्याचा पुढचा भाग मोठा ) खर्यापेक्षां जास्त योग्यतेची ऐट मारणें . सामाशब्द ;
०अंग आंगप्रत - क्रिवि . पृथक् पृंथक अलग अलग ; इसमवार ; प्रत्येकीं
०उद्धार पु ( प्र .) अंगोद्वार . १ ( काव्य ) शरीराची , देहाची मुक्तता . २ तीर्थात स्नान करणें ; तीर्थस्नान ; देहशुद्धी . ३ ( योग ) पोटांतील आंतडीं तोंडतून बाहेर काढून स्वच्छ करणें ; धौती ; धुतीपुतीं . ( अंग + उद्धार )
०उधार वि. अंगावर दिलेलें , केलेलें ( कर्ज , उधारी ); स्वतःच्या पतीवर केलेली उधारी .
०ओलाचें न. ( कों .) जिच्यांत पाणी सांठविण्याची शक्ति आहे असें शेत जमीन ; उन्हाळ्यांत पाणी न देतां हिच्यांतून पीक काढतात .
०कंप पु शरीरास कंप सुटणें ; थर . कांप होणें . ( सं )
०कल पु शरीराचा तोल , वांक , ( सं .)
०कवळी स्त्री. ( काव्य ) आलिंगन ; मिठी ; पक्कड . ' पास्परें अंगकवळी होतां । आनंदिलीं उभयतां । ' - मोल . ( अंग + कवळणें )
०कष्ट पु. शारीरिक श्रम . ( सं .) ०कळा - स्त्री . शरीराचें तेज , कांति ; भुसमुशीतपणा ( निरोगावस्थेंत ).
०काठी स्त्री. अंगबांधा ; अंगयष्टि ; शरीराचा बांधा , ठेवण . ( अंगलट - लोट - ठेवण - वट - वठा - वळण हें शब्द शरीराचें स्वरूप , कांति भरदारपणा इ० दाखवितात तर अंगकाठी - बाधा - यष्टी हे रचना , बांधणी दाखवितात ).
०काडु ढू ढ्या - वि . अंग काढणारा ; पळपुट्या ; जबाबदारी टालून निसटुं पाहणारा ( संकट , अडचणी असतांना ); काम चुकारू ; माघार घेणारा . ( अंग + काढणें )
०कार्श्य न. शरीराचा लुकडेपणा ; सडपातळपणा ; कृशता . ( सं .)
०गडा पु. पोटीतील भिडू ; पित्या ; ( सोंगट्या , पत्ते इ० खेळांत ) भिंडूचा तोटा असतां आपणच त्यांच्या वाटचें खेळणें , म्हणजे आपणच एक कल्पित भिडु आहों असें मानणें .
०ग्रह पु. आचके , पेटका , गोळा येणें . ( सं .)
०चपळाई चापल्य - स्त्रीन . अंगांतील चपळपणा ; स्वतःसिद्ध चापल्य .
०चुकाऊ र - रू , - चोर - वि . कामांत कुचराई करणारा ; मनापासून नेटानें काम न करणारा . ' अंगचोर वाग्वीर - पटूंचें पेव कसें फुटलें । ' - सन्मित्र समाज मेळा पृ . १३ . १९२९ .
०च्छाया स्त्री१ . अंगाची सावली . २ ( ल .) आश्रय . ' तंव वैकुंठपिठीचें लिंग । जो निगमपणाचा पराग । जिये जयाचेनि हेंजग । अंगच्छाया । ' ज्ञा १७ . ४६ .
०छेद विच्छेद - स्त्री , शरीराचा एखादा अवयव कापणें . ( सं .)
०ज वि. अंगापासुन झालेला . - पु . स्वतःचा पुत्र ; मुलगा ; औरस .
०जा स्त्री. स्वपुत्री .
०जड वि. जड शरीराचा ; लठ्ठ ; फोपसा ; अगडबंब ; मंद ; आळशी .
०जूठ स्त्री. मल्लुयुद्ध ; कुस्ती ; झटापट . ( सं . अंग + युद्ध - जुद्ध - जुट्ठ )
०जोर पु अंगबळ ; शरीराची ताकद , शक्ति . ( असे घेडगुजरी समास मराठी भाषेंत पुष्कळ झाले आहेत ). ( सं . अंग + फा . जोर )
०झाप स्त्री. पेंढार्यापैंकी कोणी एखादा पंढारी झटापटींत मारला गेल्यास त्याला तात्पुरती मुठमाती देण्याची जी चाल होती तीस म्हणत . थप लोकांत , त्यांनी मारलेल्याला तात्पुरती मुठमाती देण्याची पद्धत ; पुढें त्या सॄताला सवडीनें नीट लपवून ठेवीत . ( अंग + झापणें - झांकणें )
०झोल पु. शरीराचातोल . कल . ( अंग + झोक )
०झोल ( काव्य ) छातीवरील बंदांचा लांब अंगरखा .
०ठसा ठाण ठेवण - पुनस्त्री . अंगाची ठेवण ; अंगकाठी .' भीमा ऐसा अंगठसा । माझिये दृष्टी दिसतसे । ' मुसभा ६ . १५३ . २ ( ल .) बळ ; सैन्य . - होकै १ .
०ठोळ ठोळी - पु . स्त्री . हातांच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें एक वेंढें , वेढणें . ( मराठ्यांत स्त्रिया व मुलें बहुधा वापरतात ). ( अंगुष्ठ )
०तुक न. अंगाचें वजन . ' तरी लोहाचें आंगतुक . । न तोडितांचि कनक । केले जैसें देख । परिसें तेणें । ' - ज्ञा १७ . २१६ .( अंग + तुक ) ०तोल - पु . अंगझोंक पहा .
०त्नाण न. शरीरासंरक्षण साधन ; चिलखत ; बख्तर ; कवच . ' गोंधागुळें घालिती हस्तीं । अंगत्राणें बांधिलीं । ' - पांप्र ३२ . ६५ .
०त्वानें त्वे -- क्रिवि . ( अंगत्व याची तृतीया ) प्रतिनिधि म्हणुन ; एखाद्या करितां ; एखाद्याच्या नांवानें - तर्फें - आश्रयानें , मार्गदर्शकत्वाखालीं ; वतीनें . ' मला न फावल्यास मी आपल्या अंगत्वानें दुसरा कोणी पाठवीन . '
०दट वि. १ अंगास घट्ट बसणारें , दाटणारें . २ दृढ ; बळकट . ' आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ॥ ' - ज्ञा १६ . ४५ . - पु ( कर्ना ) अंगरख्याच्या आम्त घालावयाची कोपरी . ( सं . अंग + दृढ )
०देण्या वि प्रत्यक्ष शेत कसणारा शेतकरी ; शारीरिक श्रम करणारा पक्ष .
०देवता स्त्री उपदेवता ( कर्मातील जी मुख्य देवता तिच्या अंगभूत असणारी ). ( ल .) सेवक ; चाकर ; भोंवतालची मंडळी . ( सं .)
०घट वि. उद्धट ; असभ्य ; शिरजोर . ( अंग + धृष्ट )
ध० ( धि ) टाई - स्त्री . १ केवळ शारीरीक बळ ; पाशवी बळ . मदी . ०धार - आंगाधार पहा .
०धुणें न. १ ( बायकीं ) स्नान ; अंघोळ . २ ( व .) न्हाणीघर .
०न्यास पु. देवतास्थापनेच्या वेळी धर्मविधि करतांना निरनिराळें मंत्र म्हणुन देवतेच्या प्रतिमेला ६ किंवा १६ स्थानीं स्पर्श करावयाचा विधि ; संध्या वगैरे करतांना स्वतःच्या शरेराच्या निरनिराळ्या स्थानीं स्पर्श वगैरे करतांना स्वतःच्या शरीराच्या निरनिराळ्या स्थानी स्पर्श करावयाचें कर्म . ( सं .)
परिवर्तन - न उलटें करणें ( शरीर इ० ); एका बाजूवरून दुसर्या बाजूला वळणें . ' आषाढमासीं शयन । भाद्रपदमासीं अंगपरिवर्तन । कार्तिकीं उदबोधन । ' ( सं )
०पात पुत . १ शरीराचा र्हास ; लुकडेपणा क्षीणता .. २ ( कड्यावरून ) स्वतःस खालीं लोटुन घेणें . ३ शरीरास किंवा एखाद्या अवयवास पक्षघात होणें . ४ अंग बाहेर येणें ( गुह्मेंद्रियांचा भाग ). ( सं .)
०पांथी स्त्री. खासगत वांटा ; सरकतीच्या व्यवहारांत सावकरानें आपली सरकत ठेवली असतां सावकतीच्या व्यवहारांत सावकारानें आपली सरकत ठेवली असतां सावकरीचे पांथीहून निराळी सरकतीसंबधें जी त्याची नफ्याची पांथी असते ती . २ अंगवांता . ( अंग + पक्ती )
०पिळा मोड - पु . अंगादिक पिळणें ; आळस आला असतां किंवा भूतसंचारामुळें अंगास दिले जाणारे आळेपिळे ; ओळोखेपिळोखे ; तापानें अंग कसकसणें .
०पीडा बाधा - स्त्री . नैसर्गिक विकार ; शरीरास जडलेली व्याधि किंवा रोग ( भूतपीडेच्या उलट ). ( सं .)
०प्रत्यंग न. अवयवांसकट शरीर ; पूर्ण शरीर . ( सं .)
प्रस्थान - न प्रत्यक्ष प्रवासा निघण्यापूर्वी एखादा शुभ मुहुर्त साधण्यासाठी आपलें घर सोडुन जवळपास दुसर्याच्या घरीं स्वतः रहावयास जाणें . ( सं .)
०बल न. शारीरिक शक्ति ; ताकद ; अंगधटाई . ' अवनीतीनें वर्तो नये । आंग - बळें । - दा २ . २ . २२ . ( सं .) ०बांधा - पु . शरीराची ठेवण .
०भंग पु. १ अंगाचें सांधे धरणें ; अशक्तपणा वाटणें . २ अंगविक्षेप ; शरीराचे निरनिराळें चाळे ; हावभाव , चेष्टा . ' अंगभंग बहु दाविती रंगी । रामरंग सुखसिंधु तरंगीं । '
०भंगवात पु. अंगभंग रोग ; ज्यामुळें हा रोग होतो तो वांतदोष .
०भर भार - क्रिवि शरीराच्छादनापुरतें ( वस्त्र ). ' अंगभर वस्त्र , पोटभर अन्न .' - पु . ( ल .) शक्ति ; जोर . ' एर्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें । ' ज्ञा १३ . ३१८ .
०भर ( ना .) १ फजिती उडणें . २ भार होणें .
होणें ( ना .) १ फजिती उडणें . २ भार होणें .
०भा स्त्री अंगकांति . ' अंगभा विलोकितां तटस्थ जाहली सभा । ' -( अनंत ) सीतास्वयंवर ८९ .
०भूत वि. एखाद्या वस्तूचा भाग , अंश ; अवलंबी ; समाविष्ट तदंतर्गत ; संबंधी ; आश्रयी . ' सीमंतपूजन हें विवाहाचें अंगभूत होय .' ' ज्वराच्या अंगभुत अरुचि असतेच . ' ( सं .)
०मर्दन न. अंग रगडणें ; चंपी ; मालिश . ( सं .)
०मर्दाई मर्दी - स्त्री . पौरुष ; शक्ति ; केवळ शारीरिक बळ ; अंगधटाई . ( सं . अंग + फा . मर्दी = पौरुष )
०मस्ती पाशवी शक्ति ; दांडगाई ; उद्धटपणा . ( सं . अंग + फा . मस्ती = दांडगाई )
०मार्दव न शरीराचा नाजुकपणा . ( सं .)
०मास न ( व्यापकपणें ) शरीर या अर्थी ' माझें अंगमास दुखतें .' ' तिचे अंगमास शेकलें पाहिजे .'
०मेहनत स्त्री शारीरिक श्रम ; प्रत्यक्ष कष्ट . ( अं . अंग + अर . मिहनत् = श्रम , कष्ट )
०मेहनती त्या - वि . शारीरिक कष्ट करुन पोट भरणारा ; कष्टाळु ; पोषाखीच्या उलट . २ स्वतः शेत कसणारा ; शेतकरी .
०मेळ पु अंगसंग ; संबंध . ' तियेचेनि अंगमेळें । ' - विपु १ . १०३ . ( अंग + मिळणें )
०मोड स्त्री. अतिशय मेहनत करणे ; कष्ट करणें ; सक्त मेहनत .
०मोड पु , १ आळेपिळे ( आळस घालविण्यासाठीं ). ( क्रि . देणें ) ' निद्रेनें व्यापिली काया । आळस आंगमोडे जांभया । ' - दा १८ . ९ . २ २ ताप भरण्यापूर्वी अंग कसकसणें ; अंग मोडून येणें . ( अव .) अंगमोडे . ' अंगमोडे येऊं लागले .' ( अंग + मोडणें ; बं , अंगमोडे .)
०यष्टी रचना - स्त्री . शरीराचा बांधा , ठेवण . ( सं .)
०रस पु. वनस्पतींच्या पानांचा , पाणी न घालतां काढलेला रस ; आपरस पहा . ( सं .)
०राख्या वि अंग राखून काम करणारा ( आळसामुलें , अप्रामाणिकपणानें ); अंगचोर ; चुकार .
०राग पु. १ सुंगधी उटणें ; उटी ; लेप ; चोपडण . ' श्रमधर्मानें रर्णि वीरांचा अंगराग पसरला । ' - सुसु नाटक २१ . २ उटीचें द्रव्य ( अरगजा , केशर , इ० ). ( सं .)
०रेटा पु अंगानें दिलेला शरीरानें दिलेला धक्का , ठोसा . ' गाड्यास अंगरेटा दे म्हणजे चालता होईल .' ( अंग + रेटणें )
०रेटाई स्त्री अंगाची धक्का बुकी ; मस्ती ; ठोसेठोशी अंगधटाई ,
०रोग पु शरीरास होणारा स्वाभाविक रोग ( पिशाच्चबाधेनें किंवा देवतापराधानें न होणारा ).
०लग वि. १ ( जात , मैत्री , निकरी इ० संबधांनें ) जडलेला ; संबंधी ; संबंध असलेला . २ जिव्हाळ्याचा ; जवळचा ; पु -. १ नातेवाईक ; स्नेहीं . ' तुझा पिता तरी विरोचन । तो आमुचा अगंलग जाण । ' - कथा २ . ६ . ८८ . ' अवघे अंगलग तुझेवधियेले वीर । ' - तिगा ३९२ . २ समागम . ' संतोचेनि अंगलंगे । पापातें जिणणें गगे । ' - ज्ञा १२ . १७७ . ३ आश्रय ; साहाय्य . ' परब्रह्मींचेंनि अंगलंगे । सृष्टादि कार्य माया करू लागे । ' - विउ ११ . १६ . ' देवा मंदराचेनि अंगलंगे । ' - ज्ञा ११ . २५७ .
०लट लोट वटा वठा - स्त्री . पु . शरीराची ठेवण्फ़ . कांति तेज , अंगकाठी पहा . ' तेची अंगलट गोरी असा . ' माझी आंगलट त्यावेळी कांहींशी पातळ होती .' - विवि ११ . ८ . २०४ . ( सं . अंगयष्टि ;; प्रा . अंगलठ्ठी - अंग लट ; किंवा अंग + लोष्ठ )
०लट स्वत ; होऊन जबाबदारी पत्करणे .
घेणें स्वत ; होऊन जबाबदारी पत्करणे .
०लट १ अंगास चिकटणें ; तोट्यांत येणें . २ अंगाला चिकटें ; धक्काबुक्की करणें ; खोडी काढणें ; ( अंगलट जाणे असाहि प्रयोग आढळतो ).
येणें १ अंगास चिकटणें ; तोट्यांत येणें . २ अंगाला चिकटें ; धक्काबुक्की करणें ; खोडी काढणें ; ( अंगलट जाणे असाहि प्रयोग आढळतो ).
०लीन वि. अंगांत मुरलेलें ; शरीरांत गुप्त असलेलें . ' सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना । ' - ज्ञा १६ . ४२ .
०लेणें न अंगावरचा दागिना ; अलंकार , ' नाना अळंकार अंगलेणीं । ' - सप्र २ . ५ .
०लोट १ अंगलट पहा . २ अंगभार ; अंगाचें वजन . पतन . ' मस्तकी वाहती करूनि मोट । भूमी टाकिती जैसा घट । तळीं पाषाण होती पिष्ट । आंगलोटें दोघांच्या । ' - मुसभा ७ . ३२ .
०वख पु. अंगप्रदेश . ' जलतेया गिरिचेया आंगवखां । - राज्ञा ११ . ४२० . ( अंग + वक्ष ?)
०वटा क्रिवि . स्वाधीन . ( अंग + वत् )
०व वा ) टा - शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन ( शेतमालक , बैल - नांगर मालक शेत कसणारा ) वांट्यापैकीं शेत करणार्याच्या वांटा . ( अंग + वाटा )
( वा ) टा - शेतांत उत्पन्न झालेल्या मालाच्या तीन ( शेतमालक , बैल - नांगर मालक शेत कसणारा ) वांट्यापैकीं शेत करणार्याच्या वांटा . ( अंग + वाटा )
०वण स्त्री. १ सरावाच्या योगाने आलेली योग्यता ; संपादन केलीली कार्यक्षमता ; वाकबगारी . ' ऐसी अंगवण नाहीं मज देवा । '- तुगा ४४९५ . ' आतात्मजासि म्हणे यदुनंदन । जरी तुज असेल आंगवण । यांतून एक स्त्रीरत्न । तुवां घ्यावें स्वेच्छेंनें ॥ ' - जै ११ . ६ २ पराक्रम ; शौर्य ; जोर ; उत्साह . ( व .) खटपट प्रयत्न . आंगवन असाहि प्रयोग . ' जळॊ तुमचें दादुलेपण । नपूसंकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां । ' - एरुस्व ८ . ६ . ' नीलजां कैचा आंगवणा ॥ ' - उषा १४२३ . ३ शरीरावस्था . ' तंवभीम सेनाची आंगावण । कृष्णधर्म पाहाती । ' - जै ६ . ७० . ४ देवीचा वण ; तीळ ; चट्ट . ( क्रि०पडणें , उठणें , येणें , जाणें .) ५ उपासना ; भक्ति ; ( गो .) ( देवाला केलेला ) नवस . ' कीं वरिश्रीची धरितां अंगवण । प्रताप विशेष वोढे पैं । ' - रवि ११ . ६ . ६ सराव ; नित्यक्रम ; वहिवात . ' ऐसें करिता पापाचरण । तयासी आलें वृद्धपण । पुत्र जाहालें अतिदारुण । तरी आंगवण न सांडी ॥ ' - रवि १ . १११ . ७ ( ल .) साहाय्य ; मदत . ' या परी चतुरंगसेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती ' - एभा ३० . ११७ . ८ द्वंद युद्ध ; झुंज . ' तेआं भीड भीमसेना । जुंझतां बहुती आंगवणा । परतिजे ऐसी हांव कह्णणा । उपजेचिना ॥ ' शिशु ८७८ . ( अंगवलन किंवा अंगापण - अंगा - वण )
०वणा वि. शूर . ' तोर अकुर आंगवण पुढां चालें । ' - शिशु ५४५ .
०वत सामर्थ्य ; अभिमान . ' आतां हा जळता वारा के वेंटाळे । कोणाही विषा भरलें गगन गिळें । महाकालेंसि खेंळे । आंगवत असे .' - ज्ञा ११ . ४०५ .
०वला वि. जवळचा ; अनुकुल स्वाधीन .
०वसा ( झाडांचें ) साल , पाला शेंडा ' अशोकांचे अंगवसे । चघळिले कार्होनिजैसे । ; ज्ञा ११ . ४१४ .
०वसें न. रूप ? - मनको .
०वस्त्र न. १ उपरणें ; उत्तरीय ; उपवस्त्र . नुसत्या अंगवस्त्रानिशीं तो घराबाहेर पडला .' २ लंगोटी ( गौरवार्थी ). ( सं .) ३ ( ल ) प्रेममात्र ; ठेवलेली ; स्त्री ; रखेली ; उपस्त्री . ( अंगना + उपस्त्री = आंगोवस्त्री - आंगोवस्त्र असा हा शब्द बनला आहे . वस्त्र ( कपडा ) याशीं याचा कांही संबंध नाहीं असें राजावाडे म्हणतात - भाअ १८३२ ) ' मला तर असं आठवतें आहे कीं , त्या वेळेच्या खाजगी शाळेच्या एक मास्तरास सकाळचीं शाळा असतां शाळेंतील विद्यार्थी त्याच्या आंगवस्त्राच्या घरांतून कित्येकदां बोलावून आणत असत !'- टि ४ . २९१ . वाप्र . एका अंगवस्त्रानें निघणें - भाऊबंदीशीं बेबनाव होऊनएका उपरण्यानिशींकांहीं एक तनसडी न घेतां घराबाहेर निघणें .
०वळ पु. आगवळ , आगूळ . अगवळ पहा . - नागा १२८ (- शर )
०वळण [ उ अंगलत ; अंगाची , शरीराचीठेवण .
०वळणीं सरावाचें होणें ( हा शब्द प्रथमा विभक्तित क्वचित योजितात ). ' जी भाषा आम्ही ... बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चारं आमच्या आंगवळणीं पडले असल्यामुळें ...' - टि४ . ४०१ .
पडणें सरावाचें होणें ( हा शब्द प्रथमा विभक्तित क्वचित योजितात ). ' जी भाषा आम्ही ... बोलतो त्यांतील शब्दांचे उच्चारं आमच्या आंगवळणीं पडले असल्यामुळें ...' - टि४ . ४०१ .
०वळा पु. १ अंगाचें आळेपिळे ; आळसामुळें येणारी जांभई . अंगापिळा पहा . २ मुलांची चळवळ . ३ सांगती , सोबती ; संबंधी ; सहवासी . ' नित्य त्या सेवकाजवळ । अंगें अंग वळा तूं होशी । ' एभा ६३९४ . ४ अंगकठी .
०वळेकार वि. भारी ; शक्तिमान . ' सेजवळ सहवासी । आंगवळे - करुं विश्र्वासी । ' - शिशु ५०५ .
०वाटा पु. १ अंगवटा पहा . २ ( व्यापारधंदा ) भांडवल उभारल्याखेरीज प्रत्यक्ष काम करणारांचा वांटा . ३ अंगपांथी पहा .
वाटेकरी - पु . अंगवाटा घेणारा .
०वाण पु. ( कु .) नवस . ' देवाक आंगवाण केली हा .' ( अंग + वाणी .)
०वात पु. चालतांना वेगानें उप्तन्न होणारी वारा ; अंगवारा ; गतिमान वस्तूपासून उप्तन्न होणारा वायु .
०वाला वि. ( गो .) अंगात घालण्याचा ; अंगाचें .
०विकार विकृत्ति - पु . स्त्री . शारीरिक रोग
०विक्षेप पु. हावभाव ; अभिनय ; चाळा ; अंगचेष्टा ; हातवारे . ( सं .)
०वृद्धि स्त्री शरीराची वाढ ( रोगामुळें झालेलीं - अंतर्गळ , अंडवृद्धि ; इ० ) . सं
०वेग पु. १ शरीराचा वेग ; चालण्याचा जोर अंगवात . २ शरीर वाढत असतांना त्याला आंतून मिळणारा जोर .
०वैकल्य न. शरीराचा अधूपणा ; लुळेपणा ; व्यंग . २ ( ल .) ( धार्मिक विधींतील महत्वाचा भाग गाळल्यामुळें ) येणारी न्यूनता ; अपुर्णता ; दोष ; वैग्ण्य .
०शः क्रिवि . एकेक भाग घेऊन ; भागश ; खंडश ;
०शैथिल्य न शरीराचा ढिलेपणा ; थलथलीपणा ; मांद्य ( अम्ग दाढ्य यांच्या उलट ).
०संकोच पु. १ शरीराचें आंकुचन ; अंग चोराणें . ' किं अंगसंकोचें पारधी । टपोनि तत्काळ मृग साधी । ' २ आंकुचनाची स्थिति ; आंकुचन ; संकुचितपणा . ( सं .)
०संग पु. १ शरीराचा संयोग , मीलन ; अंगस्पर्श . ' दिपाचिया अंगसंगा । कोण सुखा आहे पतंगा । ' - एभा ८ . ७४ . ' दुरून बोल , अंगसंग कामाचा नाहीं , २ संभोग ; मैथुन ; रतिसुख . ' घडे भक्ति जैसी मनाच्या प्रसंगें । न साधे तसी माझ्या अंगसंगें । ' ३ हातघाई ; अंगलट ; लट्ठलठ्ठी ; कुस्ती . ( सं .)
०सफाई स्त्री. शरीराची अथवा कामाची चपळाई ; अंगचापल्य . ( सं . अंग + फा . सफाई )
०सरकती पु. अंगवांटेकरी पहा .
०संस्कार पु. १ अभ्यंयस्नान वगैरे ; शरीराव संस्कार . २ अंगस्पर्श ; शरीरसंयोग . ( सं )
०सामर्थ्य न. शरीरिक बळ ; अंगजोर . ( सं .)
०साळ्या वि. नाणें पाडण्याचें काम न करतां इतर कामें करणारा सोनार ( टंकसाळ्याच्या विरुद्ध ). अकसाळ्या पहा .
०सिक न अंगावरील वस्त्र . ' आंगसिकें वेढुं भणौनि । सर्वज्ञांचीं ॥ '- ऋ ७० . ' आंगसीकें दीह्नली उदारें । भणे कवी भास्करु ॥ ' - शिशु २३२ .
०सुख न रतिसुख ; संभोगसुख . ' द्यावा निजांगसुख लाभ वधूजनांतें । ' ( सं .)
०सुटका स्त्री १ एखाद्या संकटांतून किंवा अडचणीतून कांही नुकसान किंवा इजा न होतां सुटणें . २ मुक्तता . ' हे काम मी पतकरलें आहे यांतुन माझी अंगसुटका झाल्याशिवाय तुम्हांकडे कसा येऊं ?
०सुस्ती स्त्री. शरीरमांद्य ; जाड्य .
०सुट वि. चपळ ; हलक्या अंगाचा ; सुटसुटीत ; मोकळा .
०सौष्ठव न. शरीराचा बांधे - सुदपणा ; सौंदर्य . ( सं .)
०स्तनें न. लेंकरूं . - शर ?
०स्वभाव पु जन्मजात अथवा उपजत स्वभाव ; नसर्गिक वृत्ति . ( सं .)
०हार पु. ( नृत्य ) सहा किंवा सहापेक्षां जास्त करणांचा समुदाय . हें अंगहार ३२ . आहेत ; - स्थिरहस्त ; पर्यस्तक ; सुचीविद्ध ; अपविद्ध ; आक्षिप्त ; उद्धट्टित ; विष्कंभ ; अपराचित ; विष्कंभापसृत ; मत्ताक्रीड ; स्वस्तिकरेचित ; पार्श्वस्वस्तिक ; वृच्छ्कापसृत ; भ्रमर ; मत्तस्खलित ; मदाद्विलसित ; गतिमंडल ; परिच्छिन्न ; परिवृत्त ; वैशास्त्ररेचित ; परावृत ; अलातक ; पार्श्वच्छेद ; विद्युद्भांत ; उद्वृत्तक ; आलीढ ; रेचित ; आच्छुरित ; आक्षिप्तरेचित ; संभ्रांत ; अपसर्प व अर्धनिकुट्टक .
०हीन वि. व्यंग ; न्युन ; अपूर्ण ; अवयवरहित ( शरीर ). ' कां अंगहीन भांडावें । रथाची गति ॥ ' - ज्ञा १७ . ३८९ . - पु . मदन . - स्त्री . वेश्या ; पुण्यागंना . ' अंगहीन पडपे । जियापरी । ' - ज्ञा १७ . २५६ .