-
स.क्रि. १ रेटणे ; सारणे ; लोटणे ( पुढे , दूर , बाजूस इ० ). धरतिल , हय भय जरि तरि मम रथ तदभिमुख बा ढकल हाते । - मोभीष्म ८ . ३९ . २ ( ल . ) घाईने , निष्काळजीपणाने धाडणे ; उरकणे ; लोटणे ; चालढकल करणे ( काम , धंदा यांची ). २ मोठ्या संकटांत , अडचणीत असता कसे तरी ( वर्ष , दिवस ) काढणे ; काळ कंठणे ; संसारादिक खटले चालविणे . ४ विवक्षित पदार्थ समुदायांत एखादा अविवक्षित पदार्थ घालणे , घुसडून देणे . पुणे चलनी शंभर रुपयात दोन अलीबागी ढकलून द्या . ५ अधिकारच्युत करणे ; काढून टाकणे . ६ ( करावयाचे काम ) एकमेकांवर लोटणे ; टोलवाटोलवी करणे ; कोलणे . - अक्रि . १ वाळणे ; खंगणे ( शरीर ). २ खलास होणे ; ( प्लेग , मरी इ० रोगाने ) मरणे . ३ तोलणे ; कोसलणे ; ढांसळणे ( इमारत , रास ). [ सं . ढौक ? हिं ढकेलना ] ढकल - गुजर - गुजरण - गुजराण - गुजारा - गुजारी - स्त्रीपु . १ कसा तरी उदरनिर्वाह करणे ; ( संकटात , अडचणीत ) दिवस कंठणे . २ चालढकल . [ ढकलणे + फा . गुझरान : भ . गुजराण ]
-
क्रि. कशीतरी कालक्रमणा करणे , कसेतरी दिवस काढणे , काळ कंठणे ;
-
क्रि. एकमेकांवर टाकणे , चुकवाचुकवी , टाळाटाळी ( करणे );
-
क्रि. रेटणे , लोटणे , सारणे ,
Site Search
Input language: