Dictionaries | References

आखाडी

   
Script: Devanagari

आखाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The day of full moon in आखाड. 2 The heavy or continuous rain of that month. v बस, लाग. 3 The period of it. Ex. आखाडीच्या दिवसांत दुखणें फार म्हणून जपून असावें. 4 From the great importance of the rain of आखाड in bringing forward the crops, this word is, in the time of deficiency of that rain, or in the subsequent time of deficiency of the crops in consequence, used to signify that deficiency; and so frequently and so extensively, as to lose in the apprehension of many its appropriate sense and its reference to the month आखाड, and at length it comes to signify Deficiency or scantiness, failure or exhaustedness gen. Ex. यंदा विहिरीमध्यें पा- ण्याची आ0 पडली; यंदा पावसाची आ0 म्हणून धान्या- ची आ0 5 Applied to the eleventh lunar day of the light half of आखाड. 6 A disorder attacking cattle in this month.
ākhāḍī a sometimes आखाडा a Belonging or relating to the month आखाड.

आखाडी     

वि.  
आखाड - आषाढ महिन्यासंबंधीं . - स्त्री . आषाढी पौर्णिमा .
आषाढ महिन्यांतील पावसाची एकसारखी झड . ( क्रि० बसणें , लागणें ).
अशा पावसाचा काळ ; आषाढांतील पावसाळा . आखाडीच्या दिवसांत दुखणें फार म्हणून जपून असावें .
आषाढांत पाऊस न पडल्यामुळें व त्यामुळें पुढें पिकें न आल्यामुळें पडणारा दुष्काळ . या महिन्यांतील पावसाचें फार महत्त्व असतें , कारण त्यानें मुख्यतः पिकें होतात .
( ल . ) कोणत्याहि वस्तूची उणीव , टंचाई , चणचण ; दुष्काळ . यंदा विहिरीमध्यें पाण्याची आखाडी पडली . यंदा पावसाची आखाडी म्हणून धान्याची आखाडी . ( सामा . ) दुष्काळ .
आषाढांतील शुध्द एकादशी ; या दिवशीं पंढरपूरची यात्रा भरते . आखाडी कार्तीकी भक्तजन येती । - आरती विठोबाची .
या महिन्यांत गुरांना होणारा रोग .
( नाशिक ) या महिन्यांत जत्रेंतून वगैरे होणारे खेळ ; वसंतक्रीडा . या सोमवारीं ओझर येथें आखाडी सुरु होणार आहे . [ सं . आषाढ ; म . आखाड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP