|
पु. जड सृष्टीपेक्षां अत्यंत भिन्न असें आदितत्त्व ; जीवाचें मूलबिंब ; निराकार , अमर्त्य , परमात्मा ; परब्रह्म . प्रत्येक देहमात्राच्या ठिकाणीं त्या त्या देहाची अभिमानी असलेली जाणीव ; चैतन्य ; प्राण . जीव . मी , आपण , स्वत : एतद्वाचक शब्द . अंत : करण ; स्वभाव ; प्रकृति . देह . बुध्दि ; समज . ( ख्रि . ) ज्याला विचार , भावना , इच्छाशक्ति आहेत असें आध्यात्मिक व्यक्तित्त्व - योहा ३ . ५ . ८ ; ४ . २४ . माझा आत्मा जसा आरसा । पाहो जन त्यामाजि तुला । - उसं २८१ . [ सं . अत = निरंतर चालणें ] ( पिंजारी ) कापूस पिंजण्याच्या कमानीच्या पंख्याच्या कडेवर एक चामड्याची पट्टी असते , तिच्या आंत वसविलेली घोडीवजा एक कातड्याची , घडी केलेली पट्टी . हिनें कमानीस असलेली तात ताणून अधिक आवाज निघतो . ०नंद पु. विषयसुखापासून न चित्त आवरुन परमात्म्याचें ध्यान केल्यानें होणारें समाधान . ब्रह्मज्ञानापासून होणारा आनंद ; आत्म्याची जाणीव झाल्यामुळें लाभणारें सुख . भारतीय तत्त्वज्ञानांत आनंद हा आत्म्याचा एक घटक मानिला आहे . आनंद पहा . [ आत्मा + आनंद ] ०नात्मविचार विवेक - पु . देहाच्या ठायीं शुध्द निर्विषय जो ज्ञानांश तो मात्र मी , इतर देहादिक तें अनात्मा होय म्हणजे मी नव्हे असा विचार ; आत्मा आणि अनात्मा यासंबंधीं विचार . [ सं . आत्मा + अनात्मा + विचार , विवेक ] ०नुभव पु. आत्म्याचा परिचय ; आत्मज्ञान ; ब्रह्मज्ञान . तेथें आत्मानुभव बोलिजे कैसा कवण परि । [ सं . आत्मा + अनुभव ] आत्मानुसंधान न . परमार्थविषयक सत्याकडे , आत्मज्ञानाकडे लागलेलें लक्ष . ( ल . ) अप्पलपोटेपणा . [ सं . आत्मा + अनुसंधान ] ०राम पु. आत्मा ; जीव ; अंत : करण . तुम्ही जेवून आत्माराम थंड करुन घेतलात , मी मात्र उपाशी मेलों विषयपराड्मुख व ईश्वराराधनेविषयीं तत्पर ; ब्रह्मनिष्ठ ; आत्मानंद लाभलेला ; स्वसंतुष्ट . परमेश्वर ; परब्रह्म . आत्मारामाचेनि विरहें । जेयां जीवीतु न साहे - ऋ ६ . जयदेव , जयहेव जय आत्मा , रामा । परमार्थे आरती तुज पूर्णकामा ॥ [ आत्मा + राम ] आत्मार्पण - न . स्वत : ला ईश्वरास वाहून घेणें . आत्मार्पणाविण हरी वळतो कसा रे । [ आत्मा + अर्पण ] ०श्रयदोष पु. ( तर्क . ) स्वाश्रयावर अवलंबून - विसंबून असणें हा दोष ; अन्योनाश्रय दोष . उ० घट हा घटजन्य ज्ञानास कारण होय . [ आत्मा + आश्रय + दोष ] त्मोन्नति स्त्री . स्वत : चा उत्कर्ष . आधीं आत्मोन्नति , मग देशोन्नति त्मोपासना स्त्री . ध्यान करुन परमेश्वराची उपासना करणें . कर्मोपासना , ज्ञानोपासना पहा . त्मौपम्य न . परब्रह्मस्वरुपाशीं एकरुपता . आत्म्याशीं , आपल्याशीं ऐक्य . आपपरभाव नसणें . आत्मौपम्यानें सर्व जग पहावें . - त्मौपम्यबुध्दि - स्त्री . सर्वत्र आपल्यासारखी बुध्दि . सर्वांभूतीं एक आत्मा किंवा आत्मौपम्यबुध्दि या तत्त्वानें व्यावहारिक नीतिधर्माची जशी उपपत्ति लागते , तशी दुसर्या कोणत्याच तत्त्वानें लागत नाहीं . - गीर ३८२ .
|