Dictionaries | References

आम्ही

   
Script: Devanagari

आम्ही

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   we.

आम्ही

   सना . प्रथमपुरुषी मीचें अव . बहुमानार्थी एकवचनी अर्थानेंहि वापरतात . राजे , सरदार , मोठे लोक , संपादक , अधिकारी इ० आपल्याबद्दल बोलतांना आम्ही शब्द वापरतात . आपण पहा . आम्ही कोण म्हणून काय पुससी ? आम्ही असूं लाडके । देवाचे - केक ( आम्ही कोण ). म्ह०
   ( व . ) आम्ही तुम्ही भाऊ भाऊ तुमचे पोहे आमचा कोंडा मिळून मिसळून फुंकून फुंकून खाऊं .
   आम्ही तुम्ही भाऊ आमच्या कठाळ्यास हात नका लावू .
   आम्ही खावें आम्ही प्यावें जमाखर्च तुमच्या नांवें . या सर्व म्हणी आपलपोट्या , मतलबी माणसास लावितात . [ सं . अस्मत ; अहं ; प्रा . अहमे ; त्सीगन . आमेन किंवा आमे ; फ्रेंच - जिप्सी अमिन ; खान . आमु - आम्हू ; गोंडी अमात ; उरिया अम्हे ; हळेका . आम ; बं . आमी ; राजस्ता . हम , म्हे ; गु . अमे ; हिं . हम ; पं . असीम ; नेपा . हासी ; काश्मिरी असि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP