|
पु. १ श्रोत्र ; कणेंद्रिय ; श्रवणेंद्रिय ; शरीराच्या ज्या अवयवामुळें आपणास ऐकूं येतें तो अवयव . २ ( ल .) कढईज ; मोदकपात्र किंवा या सारखय भांड्यांच्या कड्या ; सामन्यत ; कानाच्या आकाराची वस्तु . ३ दागिने घालण्यासाठीं कानाला पाडलेलें . भोक . ' माझा भिकबाळीचा कान बुजला आहे . ' ४बंदुकीचा काना किंवा रंजक ; दारु पेटविण्याचें छिद्र ; बत्तील लावावयाची जागा . ( सं . कर्ण ) ( वाप्र .) स्त्री. खाण . - आफ . ( फा .) ०उघडणें केलेल्या मुर्खपणाची कृत्यें समजणेम ( स्वतःची व दुसर्याचीं ); डोळें उघडणें ; एखादी गोष्ट स्पष्ट करुन दाखविणें ; समजूत पटविणें ; ०उघडून बजावून सांगणें ; स्पष्ट सूचना देणें . सांगणें बजावून सांगणें ; स्पष्ट सूचना देणें . ०उपटणे धरणें पिळणे पिरगळणें - शिक्षा करण्यासाठी कान धरून पिळविटणें , ओढणें ; शस्त लावणें . ' त्याला जिंकून जिंवत पकडून त्याचे कान उपटल्याशिवाय आम्हीं राहणार नाही .;- बाय २ . २ . ०कापणें कापून हातावर देणें - वरचढ करणे ; कडी करणें ; वर ताण करणें ; मात करणें ; फसविणें .' दुकानदारानें माझा चांगला कान कापला ' ०किटणें एखादी गोष्ट पुन्हां पुन्हां ऐकविण्यामुळें वीट , कंटाळा येणें . ०खडा डी लावणें - सूचना देणें ; मनावर ठसेल असें सांगणें . ०खडी घेणें - स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें . लावून घेणें - स्वतःला शिक्षा लावून घेऊन चुकी सुधारणें . ०झाडणें १ स्पष्ट नाकारणें ; ऐकून न घेणें ; कानावर येऊं न देणें ; निषेध करणे . ' स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी । ' - ज्ञा १३ . ६१७ . २ उपदेश झिडकारणें , न मानणे , ०टवकारून पसरून ऐकणें - लक्ष देणें ; पूर्ण लक्ष देऊन ऐकणे . ' भाषण करणार म्हटल्याबरोबर त्यांनी कान टवकारुन पहावें .' - के ३१ . ५३० . ०टोचणें १ कानाला भोंक पाडणें . २ ( ल .) फुस देणें ; चिथावणें ; चढविणे . ३ कानउघडणी करणें ; झाडणें ; ताशेरा झाडणें ; खरडपट्टी काढणें . ( सोनारानें ) कान टोचणें - तिर्हाइतानें कान उघडणी करणें . ०देणें लक्ष देणें . ' श्रीरामाराजा देतसे कान । ' - दावि ७८० . ०धरणें शासन करणे . ०धरून पिळून घेणें - वादाची वस्तु बळजबरीनें कब ज्यांत , ताब्यांत घेणें . ०निवणें थंड होणें - बरें वाटणें ; आवडती किंवा जिच्याबद्दल उत्कंठा लागलीली अशी गोष्ट ऐकून संतोष होणें . ०पसरून पूर्ण लक्ष देऊन ऐकणें ( पण कृति न करणें ). ऐकणें पूर्ण लक्ष देऊन ऐकणें ( पण कृति न करणें ). ०पाडणें १ धैर्य सुटणें ; निराश होणें . २ आपल्या तांठ्याला आळा बसलासें वाटणें ; गरीब बनणें ; माघार घेणें . ३ ऐकूं येत नाहीं असें सोंग करणें ; काणा डोळा करणें ; ' कान पाडूनि बसे धरणीसी । ' - किंगवि २ . २० . ' मी ह्याविषयी कान पाडणार नाही .' - बाळ २ . १५ . ०पिळून स्वतःचा मुर्खपणा कळुन आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें . घेणें स्वतःचा मुर्खपणा कळुन आल्यामुळें व त्याचे दुष्परिणाम भोगल्यानंतर पुन्हां तसें न वागण्याबद्दल दृढ निश्चय करणें . ०पूर करून बसणें - बहिर्याचें सोंग घेणें ; ऐकू येत नाहीं असं भासविणें . ओस करून बसणें - बहिर्याचें सोंग घेणें ; ऐकू येत नाहीं असं भासविणें . ०पूर पडणें - बहिरा होणें . ओस पडणें - बहिरा होणें . ०फुकंणें १ कानांत मंत्र सांगणें ; उपदेश देणें . ०फुटणें बहिरा होणें ( पूर्ण , अर्धवट ). ०भरणें भारणें - चहाडया करणें ; मनांत भरविणें ; चाहाडी , लावालावी करणें . ०फुटणें - बहिरा होणें ( पूर्ण अर्धवट ). ०भरणें - भारणें - चहाड्या करणें ; कानांत सांगणें ; चिथविणें . - ०येणें ऐकण्याची शक्ति येणें . ०लांबणे १ वयानें जसजसें मोठें होत जाईल तशतशी अक्कल कमी होत जाणें ( लहान मुलाविषयी ). २ ( गाढवाचे कान लांब असतात यावरुन ) गाढव होणें . ०होणें लक्ष देणें ; सावध होणे ; सावधानपणानें वागणें . कानाआडमागें - वरून - ऊ न जाणें - उपदेश , शिक्षा , ताकीद वगैरेचा ऐखाद्यावर उपयोग न होणें . - चा चावा घेणें - खोट्या वाट्या गोष्टी सांगून दुसर्याचें मन कलुषित करणें .- चे कानवले होणें - कान वांकडे , ( कानोल्याप्रमाणें ) पिळवटलेलेल होणें . - चें किडे झाडणें - १ परनिंदा श्रवणदोषापासुन मुक्त करणें ; किल्मिष घालविणे ; मनांतील गैरसमज , अढी दुर करणें . - त खुंट्या मारणें - १ बहिरें होणें . २ पुर्वीचा एक शिक्षेचा प्रकार . ' कानीम खुंट्या आदळिती । अपानीं मेखा मरिती । ' - दा ३ . ७ . ७३ . - त जपणें - कानांत पुटपुटणें ; गुप्त रीतीनें बोलणें , सुचविणें ; कानमंत्र देणें ; चहाडी करणें . - त तुळशी घालणें - घालून बसणें - १ ऐकूं येत नाहीं असें भासविणें , सोंग कारणें . २ मायापाश झुगारून दिल्याचा आविर्भाव आणणें ; उपरति झाल्याचें दाखविणें . विरक्तिचें सोंग आणणें . - त . तेल घालून निजणें - अति . शय दुर्लक्ष करणें ; पूर्णपणे उदासीन असणें . - त भरणें - चुगल्या करणें ; एखाद्याचें वाईट करण्याविषयीं भरी भरणें . - त भेंड घालणें -( व .) बहिरेपणाचें सोंग घेणें ; न ऐकणें . - त वारें भरणें - उच्छृंखल होणें ; एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार न करतां हुरळून जाणें . ' ही गरिब गाय कानांत वारें भरल्यामुळें उधळली आणि सैरावैरा धांवून अखेर चिखलांत रुतली .' - सु ६१ . ( या ) कानानें ऐकणें - त्या कानानें - सोडणें - मनांत मुळींच ठेवणें , राखणें . - पाठीमागें टाकणें - दुर्लक्ष करणें ' फुकटच्या उपदेशाप्रमाणें त्यांचा निरोप कानापाठीमागें टाकणार नसाल तर सांगतो ' - सु १०५ . - बाहेर - वेगळा करणें - दुर्लक्ष करणें ; उदासीन राहणें . - मध्यें - तं - मंत्र सांगणें , फुकणें - चिथविणें ; चितविणें . - मागें टाकणें - १ उपदेश शिकवण , सुचना इ० कडे लक्ष न देणें . २ दुर्लक्ष करणे . ' शत्रुचा समाचार अगोदर घेतला पाहिजे . घरची भांडणें र्तत कानामागें टाकलीं पाहिजेत .' - बाजीराव . - ला खडा लावणें - मुर्खपणाचें दुष्टपणाचे काम पुन्हां न करण्याविषयीं निश्चय करणें ( कानाचय पाळीच्या मागें खडा लावून दाबण्याचा पूर्वी शिक्षेचा एक प्रकार होता .) - वर ( उजव्या डाव्या ) पडणें - निजणें - लटणें - एका कुशीवर ( डाव्या उजव्या ) निजणें . - वर मान ठेवणें - आळशीपणानें किंवा निष्काळजीपणानें बसणें . - वर येणें - ऐकणें ; श्रुत होणें ; ' येणार पुढें पुष्कळ आलें आतांचि काय काना तें । ' - मोप्भीष्म ७ . ६ . - वर हात ठेवणें - त बोटें घालणें , कान - झांकणें - १ एखादी गोष्ट मुळींच माहीत नाहीं अगर तींत आपला बिलकुल संबंध नाहीं असे दाखविणें ; नाकारणें ; नाकबुल जाणें . २ एखादी मनाविरुद्ध गोष्ट ऐकवत नाहीं म्हणुनक कानांत बोटें घालणें . ' तो हा वधिला केलें कर्म अमित साधु घातसें मोठें । खोटें हें म्हणतील शिव शिव कर्णी घालतील बुध बोटें । ' - मोस्त्री ४ . ३६ . - वरुन जाणें - १ कान चाटून जाणें ; २ ( ल .) थोडासातोटा होणें . ३ ऐकलेलें असणें . - शीं कान लावणें , कानीम लागणें - कानांत सांगणें ; हळूच बोलणें ; गुप्त रीतीनें सुचविणें - स कोन न कळूं - न लागुं देणें - अतिशय गुप्तपणा राखणें , ' आणि झाल्यावर सुद्धां कानांस कोन लागुं नये ही तर खबर दारी घेतलीच पाहिजे .' - सु १० . ८ - स दट्टे - दडे बसणें - बहिरा होणें . कानीं कपाळी रडणे - ओरडणें - सदोदित , नेहमीं बुद्धिवाद करीत असणें ; नेहमीं , पुन्हां पुन्हां सांगणें . - नीं कोचीं बसणें - लागणें -( चोरून ऐकण्यासाठीं ) कानाकोपर्यात अडचणींत बसणें , कानोसा घेणें . - नीं मनीं नसणें - एखाद्याची कल्पना नसणें ; कधींच न ऐकलेलें , मनांत नसलेलें ऐकलें . - नीं सात बाळ्या असणें -( लहान मुलांच्या भाषेंत ) ( ऐकावयाचेंच नाहीं असा निश्चय दाखवावयाचा असतां ) ह्या कानाचे ह्या कानास कळूं न देणें ; अतिशय गुप्त ठेवणें . म्ह० ( व .) १ कानाची कोण झाली नाहीं = कुणालाहि कळलें नाही . २ कानामागून आलें महालिंग ( तिखट ) झालें ; मागून आलेला किंवा वयानें लहान असा माणुस जेव्हां वरचढ होतो तेव्हां योजतात . ३ मुढ्या कानाची पण अभिमानाची = अंगांत दोष असुन अभिमानयुक्त कानाची पण अभिमानाची - अंगांत दोष असुन अभिमानयुक्त ४ ( गो .) कान मान हालवत = एखादी गोष्ट कारण्यासाठीं उत्सुकता दाखविणें . ५ ( गो .) कान फुंक म्हळयांत व्हान फुंकता - एक सांगितल्यावर दुसरेंच करणें . ६ ( गो .) कानाचा पोळा आनी पोटाची चिरी वोढता तितली वाढता = सांवयीनें संवय वाढते . ७ कान आणि डोळें यांच्यांत चार बोटाचें अंतर = पाहिलेलें व ऐकिलेलें यांत केव्हा अंतर असतें . ऐकलेलें तितकें विश्वसनीय नसतें . पुढें खोटें ठरण्याचा संभव असतो . ८ कानामागून आलें शिंगट ते झाले अति तिखट ( कानाच्या नंतर शिंगे उद्भवतात म्हणुन ) एखाद्या उपटसंभु मागुन येऊन एकाएकीं मोठ्या पदाला चढला व पहिल्या लोकांना शिकवूं लागला - त्रास देऊं लागला तर त्यास म्हणतात . यावरुन कानामागून येणें व तिखट होणें . सामाशब्द - ०आढा पु. ( बैलगाडी ) गाडी उतरणीवर असतां किंवा बैल बेफाम अप्तला तर तो तांब्यांत रहावा म्हणुन कासर्यानें बैलाच्या कानाला टाकलेला वेढा . ०कडी स्त्री. ( लोंखडी काम ) कानाच्या आकारात पत्रा कापून त्याला जें एक लांबट तोंड ठेवतात तें वळवून त्यांत बसविलेली कडी . अशा दोन बाजुस दोन कड्या असतात . ०कवडा पु. कानखवडा पहा . ०कळाशी सी - स्त्री . ( घोडा , बैल इ०च्या ) कानाची व डोक्याचीं ठेवण , आकार . ' अस्सल जरदी घोडी भिरवरथडी वर बसली चांदणी । कानकळाशी फिरफटक्यामध्यें कोणी तरी दिली आंदणी । ' - पला ४ . २१ . ०कात्रा पु. ( गो .) पाण्यावर तंरंगाणा एक लहान मासा . - मसाप . ३ . ३ . १५७ . - वि . कान कापलेला ; कानफाड्या . ०कारी स्त्री. ( विणकाम ) ताणा ताणुन धरणारी एक धनुकली . ०करळी कीडा कुरकुटी कुरटी - स्त्री . ( कों .) कानास होनारा एक रोग ; कानाची कीड . ०कुडें - न . कांनांतील कुडें ; एक अलंकार . ( कर्ण + कुंडल ; कण्णकुड्डल - कानकुडें ) ०कुलाय स्त्री. ( गो .) कान झाकेपर्यंतचा डोक्यावर घालण्याचा निमुळता टोप . ( सं . कर्ण + कुलाय = घर झांकण ) ०कूण स्त्री. १ गुणगुण ; बाजारगप्प . २ कुजबुज ; कुरकूर . ३ तक्रार ; कां कूं ; अनिश्चित वर्तन . ( कान + कुणकुण ) ०क्रुस अनिश्चितता ; कां कूं चालढकल ; कानकूण अर्थ ३ पहा . ( कान + ध्व . कुस ) ०केस पुअव . ( नुकत्याच विधवा झालेल्या स्त्रीचें ) केशवपन करणें व अलंकार काढून घेणें . ( क्रि० करणें ) ०कोंडा वि. १ ( आश्रयदाता , उपकारकर्ता , ज्याला आपलों अंडीपिल्लीं , दोष माहीत आहेत अशा माणसासमोर ) लज्जित ; मुग्ध ; खजिल ; कुंठित ; ओशाळा ; भयचकित झालेला ; भिंधा . ' गुरुज्ञानानें अंजन नसतां कानकोडा प्रपंच फोल । ' अमृत १९ . ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब कावाडी । ' - दा ३ . ४ . ४७ . ' मी कानकोडा जाहलों दुर्मती । ' - भवि ५५ . १०६ . २ ऐकूं येत नाहीं . असें ढोल करणारा . - पु . दुर्लक्ष्य ; ऐकूं येत नसल्याचें सांग . ' तुजविषयीं कानकोंडा कर्म काय मी आतां । ' - दावि ८२ . ( कान + कोड्मणें ) ०कोंडा पु. कानांतील भुसकट , मळ . ०कोंडीं भांड , कानागाडा - स्त्रीपु . बहिरे पणाचें सोंग घेणें ; दुर्लक्ष करणें ; कां कु करणें ; अळटळेम करणें ऐकण्या न ऐकण्याबद्दल अनिश्चितता . ( क्रि . करणें .) कान + कोंडा ०कोंडा डीं वाटणें - शरमिंधे होणें . वाटणें . ०कोंडे - वि . लाजिरवाणें . कानकोंडा - डी पहा ' ऐसी परस्त्रीची संगत । घडतां जनांत कानकोंडे । - महिकथा २८ . १०० - न . १ दुर्लक्ष ' केली नाहीं चिंता नामीं कानकोंडे । अंती कोण्या तोंडें जात असें । ' - रामदास ( नवनीत पृ १५२ .) २ भिडस्तपणा . ' कानकोंडे साहो नये । ' - दा . १४ . १ . ६ . ०कोपरा पु. वेडावांकडा भाग ; कान किंवा कोपरा ; पुडें आलेला भाग ( शेत , घन पदार्थ इ०चा ) चतुरस्त्र वर्तुल इ० आकारविरहित जो क्षेत्रादिकांचे अंश असतात तो ०कोरणी णें - कानांतील मळ काढण्याची , पुढें वाटी असलेली धातुची लहानशी काडी ; कानमळ काढण्याचे हत्यार . ०खडी स्त्री. सुचन्फ़ा ; ताकीद . ' मी त्यास कानखडी लावली . खवडा - पु . वासरांच्या कानाला होणारा एकरोग ; तो नाहीसा होण्यासाठीं वासराच्या कानांत एककथलाची बाळी घालतात . ०खीळ स्त्री. १ ( बैलगाडी ) चाक पडूं नये किंवा जागेवरुन मागेंपुढें सरकूं नये म्हणुन आंसास घातलेली कडी , कुणी . २ ( औत ) जेथें दोन शिवळा जोखडास असतात त्यांतील बाहेरील शिवळ . ०खोरणें ( ना .) कानकोरणी - णें पहा . ०गच्ची स्त्री. १ पट्टा अगर वस्त्र यांनी कान झांकणें , बांधणें . ( क्रि०करनें ; बांधणें .) २ खोट्या , अनिष्ट गोष्ती ऐकूम नये , म्हणुन कानावर हात ठेवणें ; आपल्या कानीं सातबाळ्या करणें . ( क्रि०करणें ).( कान + गच्च ) ०गोष्ट स्त्री. १ कानगोष्ट पहा ., २ कुजबुज ; आळ ' जाणोनि कान घसणी हरि चालियेला ' - अकक . कृष्ण कौतुक ५४ . ०घुशीं घुसणी - स्त्री . ( गोट्यांचा खेळ ) हाताच्या वोटांनी आपला कान धरुन त्यात हाताच्या कोपरानें गोटी उडविण्याचा प्रकार . ०घोण स्त्री. गोमनांवाचा सरपटणारा क्रिडा ; घोण ; कर्णजूलिका ; कर्णकोटी . हा कानांत शिरतो . ०चा पु. क्रिवि . कानाच्या कोपर्यांत ; अगदी जवळ कोठेंही किंचित ( ऐकूं न येणें , परिस्फुटता न करणे .) म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिले नाही .' ' कानाचाकोन समजला नाही .' कोन पु. क्रिवि . कानाच्या कोपर्यांत ; अगदी जवळ कोठेंही किंचित ( ऐकूं न येणें , परिस्फुटता न करणे .) म्या त्याची लबाडी कानाच्याकोनाला कळूं दिले नाही .' ' कानाचाकोन समजला नाही .' ०चिट् पु. खेळांतील समाईक गडी ; राहाट्या . ०चिपी स्त्री १ कानाचा वरचा भाग पिरगळणें कानपिचकी . ( शाळेंतील पंतोजीच्या शिक्षेचा अथवा मुलांच्या खेळांतील शिक्षेचा एक प्रकार ).( क्रि०घेणें ) २ खेळांत लबाडी केल्याबद्दल शिक्षा म्हणुन स्वतःचा कान पिरगळुन घेंणे . ( क्रि०घालणें .) ०चिंबळी ( कों .) कानचिपी पहा . ( क्रि० घेणे . ०चोर वि. ( गो .) ऐकुन न ऐकलेंसें करणारा . ०टाळ ठाळ ळी ळें ठळ्या ठाळ्या टाळीं ळें -( अव .) ( बसणें क्रियापदास जोडून ) बधिर होणें ; दंडे बसणें ; कानाचे पडदें बंद होणें . ऐकूं न येणें ( थंडी , वारा , मोठा आवाज इ . मुळें ) - गलि ३ . १७ २ ( उघडणें क्रियापदाला जोडून ) बहिरेपणा जाणें ; ऐकूं येऊंलागणें . ३ समजण्याला , शिकविण्याला योग्य होणें ; डोळे उघडणें ताळ्यावर येणें . ४ ताळ्यावर आणणें ( कर्ण + स्थळ ) ०टोपी पु. कान , कपाळ झांकणारी टोपी ; माकडटोपी ; कानपट्टीची टोपी . ०पट स्त्री. ( व .) कानशील ; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग . ०पट्टी स्त्री. १ कानगच्ची अर्थ १ पहा . कान झांकतील अशा तर्हेनें डोक्याला गुंडाळणें . २ कानपट्टीची टोपी . ०पट स्त्री. ( व .) कानशील ; कानाजवळील ; कानाजवळील गाल व कपाळ यांमधील भाग . ०पट्टी स्त्री. १ कानगच्छी अर्थ १ पहा . कान झांकतील अशा तर्हेनें डोक्याला गुंडाळणें . २ कानपट ; कान शील ' भाल्याची जखम कानपटीस लागली .' - भाव ५७ . ०पिसा वि. ( कों .) कानाल हलका ; भोळसर ; खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा . ०पिळा ळ्यां - पु . ( लग्नांत ) नवर्यामुलीचा भाऊ . नवरीच्या हातांत लाजाहोमाच्या वेळेस लाह्या घालतो व नवरामुलगा त्याचा कान पिळतो , त्याबद्दल त्याला नवर्यामुलाकडुण कानपिळ्याचें अगर कानपिळणीचें मागोटें मिळतेंतो मान . ०फट ड - स्त्रीन . कानशील ; गालफड ; कानाच्या पुढिल गालाचा प्रदेश ( विशेषत ; थोबाडीत मारतांना ह्या शब्दाचा उपयोग करतात . जसें मी तुझें कानफड सुजवीन , फोडीन ; कानफडांत मारीन . ( सं . कर्ण + फलक ) ०फटा फाटा टी ट्या टी पु . नाथपंथ व त्या पंथातील गोसावी ह्यांची परं परा आदिनाथापासुन आहे . यांच्यांत प्रख्यांत असे नऊ नाथ होऊन गेलें . हे श्वैवमतानुयायी आहेत . हे कानाच्या पाळीस मोठें भोंक पाडून त्यांत काचेच्या किंवा लाकडाच्या गोल चकत्या घालतात . ह्यांच्या गल्यांत शिंगी , पुंगी असते . हेकिनरीबर गोपीचंदराजांची गाणीं म्हणतात . ' व्यांघ्रांबर गजचर्मांबर परिधान शुद्ध कानफटा । ' - प्रला ५ . ( कान + फाट ) कानफटा ( इ .) नांव पडणें - क्रि . दुलौकिक होणें ; नांव बद्द होणें . कानफाट्यांच्या वर्तनाबद्दल लोक सांशंक असतात त्यावरुन लोकांत एकदां शंका उप्तन्न झाली कीं ती जात नाहीं . उदा ०म्ह० एकदां कानफाट्या नांव पडलें म्हणजे जन्मभर तें तसेंच राहातें , त्यावरुन एकदां दुष्कृत्य केलें म्हणजे त्याचा कलंक जन्मभर राहतो . ०फुटी स्त्री. १ एक औषधी वेल . २ ( हेट .) कडधान्यांतील एक गवताचें बीं . ०फुशीं - स्त्री . कानगोष्ट ; कानांत पुटपुटणें ; कुज बूज . ०फोडी स्त्री अजगंधा वनस्पती ; तिळवळ . ०मेरा भोयरा - वि . बहिरट ०मंत्र मंत्रीं - पुस्त्री कानांत सांगितलेली गोष्ट ; गुप्त मसलत . ०वडा वि. १ एका कुशीवर , बाजुवर निजलेला ; आडवा झालेला . ( क्रि०निजणें ; पडणें ; होणें ). ' ना येणेसी सुख वांकडें । करूनि ठाकाल कान वडे । ' - ज्ञा . अ १८ १६९३ . ' परि ते कानवडि परांमुख निजेली होती । ' - पंच ३ . १५ . ' कोणी कानवडे निजती - दा १८ . ९ . ७ . २ पराड्मुख . ' दुर दुर जासी निघून बघून लगबगुन होसि कां कानवडा । ' प्रला १६२ . - पु . दाराचें झांकण , वस्त्राचा आडपडदा । ' - शर ०वडें क्रिवि . कानवडा पहा , एका कुशीवर , बाजूवर ' तिएं धारेचेनि दडवादडें । नावेकु मुखचंद्र कानवाडें । ' - शिशु ७१२ . ' नये अळसे मोडूं अंग । कथे कानवडे ढूंग । ' - तुगा २४१३ . ०वसा पु. कानोसा ; दूरचा शब्दकान देऊन एकाग्रतेने ऐकण्याची कृति . ( क्रि० घेणें ; लागणें ; लावणें ;). ०वळा पु. कानामागें होणारा एक रोग . ०वळा - विल . कानवडा पहा . ( क्रि०असणें ; निजणें ; पडणें ). - पु . ( पशुच्या ) डाव्या कानाखाली दिलेल्या डागाची रेघ . ०वळे पुअव . गालावर आलेले कानाच्या बाह्य अंगावरील केंस कानवा - व्ह - ळा - पु . कानोसा . ( क्रि० घेणें ; लावणें .) ०विळे - न . ( कु .) कानंतील मळ ०वेणी कानशीलवेणी - स्त्री . लहान मुलांच्या कानावरील केसांची घातलेली वेणी . ०वेरी क्रिवि . कानापर्यत कानावरील केसांची घातलेली वेणी . ०वेरी - क्रिवि . कानापर्यंत ; कानाविरी ; ' जे अनर्थाचें कानवेरी । ' - ज्ञा ९ . १८२ . ०शिरा स्त्रीअव . कानाजवळच्या शिरा . ' कानशिरा दुखतात , धमकतात , उठल्या .' ०शील सल सूल , कनाड - न . १ कानाच्या जवळचा , गाल व कपाळ यांमधील भाग ' कानसुलां भाली । आंगे कूट जालीं । ' - शिशु ९७० ' घोर जालले हातफळी । हाणिताती कानसुली । एकमेकां । ' - कथा ५ . १७ . १४१ . ' याच कानसुलीं मारीतसे हाका । ' - तुगा १८०५ . २ गालफड ; चेहर्याची एक बाजू ; कानठाड ; कानफट . ( कर्णशिरस् ) ०सर पु. बैलाच्या कान व शिंगाभोंवती बांधावयाची रंगीत सुती दोरी . ०साक्षी पु. ऐकींव माहिती सांगणारा साक्षीदार . काना - नें आरंभ होणारे सामाशब्द - कानाकोचा - वि . कानाला कटु , कर्द्कश , वाईट लागणारें कर्णकुट ( भाषण , इ० ) ' आणि कां कानेकाचें बोलें । ' - तुगा २७३५ . ०कोचा कोपरा - १ उंचवटे व भेगा . पृष्ठभागीं विष मता ( जागा , वस्तू इ०ची ). २ ( ल .) एकून एक भाग . ' मी घराचा भाग उंचासखल भाग ; गट्टू व खड्ड . कानाकोपर्याचें भाषण - न . गुपचुपीचें भाषण ; कुजबुज ; गुप्तपणाचें बोलणें ; खाजगी , घरगुती बोलणें . - चा आदळ - वि . ज्याच्या पोटांत कोणतीहि गोष्ट राहत नाहीं असा ; बहकणारा ; बडबड करणारा . चा जड - वि . १ अर्धवट बहिरा ; बहिरट . २ ( ल .) ज्याला सांगून लवकर समजत नाहीं असा . - चा ट्प्पा पु . हांकेचें ; अंतर . - चा तिखट - वि . तीक्ष्ण श्रवणें द्रियाचा . - चा पडदा - पु . ध्वनीचा आघात होऊन नाद उप्तन्न होणारें कानांतील तंबूर ; ध्वनिलहरी ज्यावर आदळमुळें कंप उप्तन्न होऊन ऐकूं येतें तो पातळ पापुदरा . - वर लेखणी ठेवणारा . बाळगणारा - वि . हुषार ; वाकबगार कारकून , लेखक यास म्हणतात . - चा हलका - खरी खोटी गोष्ट सांगितली असतां तीवर सहज विभाग ठेवणारा ; चहाडखोरांचें खरें मानणारा .
|