|
न. १ रोजकीर्दीवरुन तयार केलेला . खतावणीवर दिसणारा किंवा खतावणीवरुन काढलेला आणि केलेला हिशेब ( व्यक्तिचा किंव काम , धंदा यांत घातलेल्या भांडवलाचा ). जमाखर्चाची नोंद . २ असा स्वतंत्र हिशेब दाखविणारा कागद , वही , खतावणी ; हिशेबाची वही . ३ ( ल .) टप्पा ; पोहोंच ; आटोका ; आवांका , प्रांत ; हद्द ( सत्ता , अंमल , शासन , अंतर्भाव , यांची ). ' किल्लाचें खात्यांत मुलुक आहे .' ह गांव मुंबईखात्याखाली मोडतो .' ४ प्रांत ; कार्यक्षेत्र ; कचेरी ; काम ; प्रकरण ; कामाचाविशिष्ट भाग . जसे - बिगार - खैरात - खर्च - गांव - मुलकी - लष्करी - पैमाश - न्याय - खातें . ५ किनखाप . किंवा इतर रेशमी कापडाच्या तुकड्याभोंवती गुंडाळवयाची दोरी नाडी . ६ खतेदारांनी धारणकेलेला जमीनीचा तुकडा . ७ उदारीचा जमाखर्च ; देणें ; घेणें .' ' त्यांचें आमचें खातें आहे .' ( अर . खत्त = ओळ ; लिहिणें ; किंवा अर . खित्ता = मर्यादा ; क्षेत्र .) ( वाप्र .) ०ठेवणें देण्याघेण्याचा व्यवहार चालु ठेवणें . सामशब्द - ०दार पु. १ कुळ खेरीज करुन दुमाला नसणार्या जमीनीचा प्रत्यक्ष कबजा धारण करणारा . यांचे दोन भेद - पहिला जुन्या शतींचा म्हणजे गहाण खरेदी देणें वगैरे हक्क असणारा , दुसरा नव्या शतींचा म्हनजे सरदहु हक्क ; नसाणरा . - गांगा १३ . २ व्यापाराकडे . वाण्याकडे खातें असणारा ; व्यापार्याचें कूळ . ०पोतें न. ( विकत देण्याघेण्याचा ) व्यवहार ; काम ; जमा खर्च . ( खातें = हिशेब + पोतें = पैशांची पिशवी . खजिना .) ०पोतें होणें - १ जमा व खर्च नफा व तोटा बरोबर होणें ; तोंड मिळवणी होणें ; रमारमी होणेम ; २ मालमतीपासुन किंवा मुलांबाळांपासुन मुक्त होणें . नागवलें जाणें ( चोरांनी मालमत्ता चोरल्यानें व मृत्युनें मुलेंबाले हरण केल्यानें ). बरोबर होणें - १ जमा व खर्च नफा व तोटा बरोबर होणें ; तोंड मिळवणी होणें ; रमारमी होणेम ; २ मालमतीपासुन किंवा मुलांबाळांपासुन मुक्त होणें . नागवलें जाणें ( चोरांनी मालमत्ता चोरल्यानें व मृत्युनें मुलेंबाले हरण केल्यानें ). ०बाकी स्त्री. परस्परांच्या खात्यांवरुन हिशेब होऊन देण्याघेण्याचा राहिला शेषांश ; हिशेबाच्या वहींतील अखेरची शिल्लक ( जमेकडील किंवा नांवेंकडील ). ०मिळवणी स्त्री. ( ताळेबंद काढतांना केलेली ) खात्यांची मिळवणी ; सदर मिलवणी करण्यासाठी दाखल केलेली बाब . ०वही स्त्री. निरनिराल्या माणसांची खाती जींत लिहुन ठेवलेलीं असतात ती वही . ०वाईक वि. दुकानदाराकडे ज्याचें खातें आहे असा खातेदार .
|