|
स.क्रि. १ जोरानें आंत खुपसणें , शिरकावणें , घालणें . २ ( ग्रंथांत , लिखाणांत पदरचा भाग ) दडपून देणें . हिंदुधर्मांतील रीतीभातीनीं आमचा पुष्कळ तोटा होत आहे हें अर्जीत हलकेंच घुसडून द्यावे - टि ४ . ४० . ३ ( उपभोग्य वस्तूंची ) दुर्दशा , अव्यवस्था होईल अशा तर्हेनें वापरणें ; आडदांडपणें उपयोग करणें ; ( मनुष्य , जनावर यास ) दमेपर्यंत काम करावयास लावणें ; दामटणें ; ( मनुष्य , जनावर इ० कांचा ) भुसाड पाडणें ; ( पुस्तकें , कागद इ० ) चुरगुळून , चोळवटून जातील अशा तर्हेनें वापरणें ; अनास्था , चुथडा करणें . - अक्रि . रेंटून , जोरानें आंत शिरणें ; ( स्वत : स ) जोरानें आंत ढकलणें . [ घुसणें ; हिं . घुसेडना ]
|