Dictionaries | References

घोकणें

   
Script: Devanagari

घोकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To repeat frequently in order to commit to memory; to con. 2 To dwell or harp upon; to be ever mentioning.

घोकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To repeat frequently in order to commit to memory. To dwell or harp upon.

घोकणें     

स.क्रि.  १ पुन : पुन : म्हणून पाठ करणें ; घोष करणें ; पाठ म्हणणें . आम्ही अहर्निशीं नाम घोकूं । - रामदास स्फुट अभंग ४७ ( नवनीत पृ . १५४ . ) गोरक्ष घोकितां सद्विद्येसी । - नव १०४० . २ ( एखाद्या गोष्टीची ) जपमाळ घेणें ; घोष लावणें ; वारंवार सांगणें , उच्चारणें . [ सं . घुष - घोषणा ; हिं . घोकना ] म्ह० ( व . ) घोकंति विद्या खोदंति पाणी = घोकल्यानें विद्या व खोदल्यानें पाणी मिळतें . ( पर्यायानें ) कोणतीहि गोष्ट श्रमानें साध्य होते . घोककाम्या - वि . अर्थाकडे लक्ष न देतां , संदर्भ लक्षांत न घेतां घोकंपट्टी करणारा ( विद्यार्थी ); दुसर्‍याच्या सांगण्याचा हेतु , मर्म लक्षांत न घेतां सांगण्याप्रमाणें अक्षरश : चालणारा . [ घोकणें + काम ] घोकणी - स्त्री . १ ( एखादी गोष्ट लक्ष्यांत रहावी म्हणून ) पुन : पुन : घोकण्याची क्रिया ; आवृत्ति . ( क्रि० करणें ; घेणें ). अजुनि तरि करि ही घोकणी । - राला ८८ . शको . ३ . २४ . २ त्याच त्याच गोष्टीचा पुन : पुन : उच्चार , निदिध्यास ; एकच गोष्ट धरून बसणें ; आपली इच्छा , हेतु पुन्हां पुन्हां सांगणें . ( क्रि० घेणें ; लावणें ; करणें ; लागणें ; मांडणें ; धरणें ). सुख असल्यावर दिनासारिखे कां भौति फिरते । घोकण्या करिते । - सला २० . त्या मुलानें आईची घोकणी घेतली आहे . [ घोकणें ] घोकंपट्टी - स्त्री . घोकण्याची क्रिया ; घोकणी अर्थ १ पहा . ( क्रि० करणें ). दुसर्‍या इयत्तेंत फळयावरील शब्द मुलांनी आपल्या वहींत उतरून घेऊं नयेत , कारण या योगानें घोकंपट्टी करण्याची संवय मुलांना लागते . - अध्यापन ७४ . [ घोकणें + पट्टी ] घोकीव - वि . १ पाठ केलेला ; घोकलेला ( धडा इ० ). याचें घोकीव पांडित्य आहे . २ स्मरणांत , ध्यानांत पक्का ठेवलेला ; मनांत पक्का ठसलेला . घोकीव , घोक्या - वि . १ समजूत न घेतां , ध्यानांत न ठेवतां निव्वळ घोकंपट्टी करणारा ; मंद ( विद्यार्थी ). २ पोपटपंची करणारा ; घोकूनच फक्त ध्यानांत ठेवणारा ; ( क्क . ) कोणत्या वेळीं काय बोलावयाचें हें पढविलेला ; लांच घेऊन बनावट साक्ष देणारा ( साक्षीदार इ० ). [ घोकणें ] घोक्या - वि . घोकणारा ; घोकंपट्टीनें अभ्यास करणारा ; घोककाम्या अर्थ १ पहा . [ घोकणें ]

घोकणें     

घोकंति विद्या, खोदंत पाणी
घोकल्‍याशिवाय विद्या येत नाही (पाठ होत नाही-पूर्वी सर्व विद्या पाठ करून शिकत असत) व खोदल्‍याशिवाय पाणी लागत नाही. श्रम केल्‍याशिवाय फळ मिळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP