|
स्त्री. १ ( मल्लयुद्ध , कसरत , गायन , वादन , नृत्य इ० कांविषयी गुरुपासून घ्यावयाचे ) शिक्षण . २ ( घोड्यास निरनिराळ्या चाली ) शिकवणे . ३ ( पोपट , मैना इ० कांस बोलण्याबाबत दिलेली ) शिकवण ; शिकवणूक . ४ ( नाट्य ) पात्राने नाटकांतील आपले भाषण पाठ करुन बोलून दाखविण्याची क्रिया ; अभ्यास ; पुनरुक्तिपूर्वक ग्रहण . ( इं . ) रिहर्सल . ५ तालीमखाना ; व्यायामशाला . ६ व्यायाम ; मेहनत . [ अर . तअलीम ] ०खाना पु. मल्लयुद्ध , दांडपट्टा इ० विषयी शिक्षण देण्याकरिता बांधलेले गृह ; व्यायामशाळा ; आखाडा . ह्यांत कारले , गदगा , फरी , मुद्गल , जोडी , लेजीम , छडीपट्टा इ० व्यायामाची साधने असतात . हे सर्व शब्द व कसोटा , एकलंगी , दुलंगी , घिस्सा , तबफाड , लुक्कण , लंगोट , कंबरखोडा , स्वारी इ० पेचांची नावे आहेत ती त्या शब्दांच्या जागी पहा . [ तालीम + फा . खाना = गृह ] ०बाज वि. तालीम करणारा ; आखाड्यात जाऊन व्यायाम करणारा ; मल्ल ; पेहेलवान . [ फा . ] ०बाजी स्त्री. आखाड्यातील व्यायामाची , तालमेची आवड , शोक , नाद . २ ( सामा . ) तालीम ; व्यायाम . [ तालीमबाज ]
|