Dictionaries | References

नंदकी

   
Script: Devanagari
See also:  नंद , नंदी

नंदकी     

 पुस्त्री .  ( सांकेतिक ) ( नंदभाषा . ) ( व्यापारांत , दुकानदारांत रुढ ).
  1. दलाल . - शर .
  2. दलालास द्यावयाचे वेतन ; दलाली . )

०थाकणे   ठेवणे गुप्तपणे दलाली मिळविणे .
०भाषा  स्त्री. बाजारांत ( दलालाच्या ) नोकरांना , गिर्‍हाईकांना समजू नये म्हणून व्यापारी लोक एक सांकेतिक भाषा उपयोगांत आणतात , तिला नंदभाषा असे म्हणतात . या भाषेतील सांकेतिक संख्यावाचक शब्दांचे अर्थ पुढे दिल्याप्रमाणे आहेत .
  • केवली = एक ;
  • आवरु = दोन ;
  • उधानू = तीन ;
  • पोकू = चार ;
  • मुळू = पांच ;
  • शेली = सहा ;
  • पवित्र = सात ;
  • मंगी = आठ ;
  • तेवसू , लेवनू = नऊ ;
  • अंगुळू = दहा ;
  • एकडू = अकरा ;
  • रेघी = बारा ;
  • तेपरु = तेरा ;
  • चोपडू = चौदा ;
  • तळी = पंधरा .
तळी या शब्दांपूर्वी अनुक्रमे एक , दोन , तीन , चार या अर्थाचे शब्द तान या शब्दाने जोडून सोळा , सतरा , अठरा , एकोणीस हे शब्द बनतात . जसे -
  • भुरका तान तळी = सोळा ;
  • अवारु तान तळी = बावीस येणेप्रमाणे .
  • बिटी = शंभर ;
  • ढकार = हजार .

नाण्यांसंबंधी शब्द असे -
  • भुरका = एक रुपाया ;
  • फाटा = आणा ;
  • अवारु फाटे = दोन आणे ;
  • मंगी फाटे = आठ आणे ;
  • तळी फाटे = पंधरा आणे ;
  • दुकार = एक आणा ;
  • चकार = दोन आणे ;
  • पकार = चार आणे ;
  • टाली = अर्धा रुपाया , अधेली ;
  • ढोकळा = एक पैसा या संकेतात बरेच पाठभेदहि आहेत . 
वरील सांकेतिक शब्द योजून पुढील अभंग रचलेला आढळतो .
मुळू ( ५ ) वदनाचा उधानु ( ३ ) नेत्रांचा । अंगळू ( १० ) हातांचा स्वामि माझा । १ ।
मुगुट जयाचा । केवळ्या ( १ ) आगळी काठी । ( २० ) पवित्र ( ७ ) तळवटी । चरण ज्याचे ।२।
ढकार ( १००० ) वदनाचा आला वर्णावया । जिव्हा त्याच्या चिरल्या वर्णवेना ।३।
शेली (६) वेडावली पोकू (४) मौनावली। अंगुळूमंगी (१०+८=१८) थकली नकळे त्यासी ।४।
सद्भावे शरणा अवारु ( २ ) जोडून । खेचरविसा म्हणे स्वामि माझा । ५ । [ नंद + भाषा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP