Dictionaries | References

माघार

   
Script: Devanagari

माघार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. ज्वरानें मा0 घेतली.

माघार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Drawing back. Declining. Retreating.

माघार     

 स्त्री. 
( शब्दशः व ल . ) मागें घेणें ; उलट मारणें ; कचरणें .
उतरती कळा लागणें ; मागें पडणें ( काम , नशीब इ० ). ( क्रि० घेणें ).
मागें हटणें , फिरणें ; ( क्रि०घेणें ).
परत येणें .
उलटणें ; परतणें ( ताप इ० ). ज्वरानें माघार घेतली . [ सं . मार्ग = रस्ता ; मागें ] माघारणें - अक्रि .
मागें घेणें ; फिरणें ( शब्दशः व ल . ). शड्कोनि देवऋषिवचनातें । माघारले सुर सकळ । - मुआदि ४ . १७९ .
उतरती कळा ; र्‍हास पावणें .
मागें हटणें ; मुरडणें .
परतणें ; उलटणें . इ०
मूळपदावर येणें ( माघार घेणें या शब्दापेक्षां ******** हा शब्द कमी प्रचारांत आहे ). - सक्रि . ( काव्य ) मागें ******** मागें टाकणें ; अतिक्रम करणें ; मागें पाडणें . माघारोनि मनपवनातें । सत्रसदना पातला । - मुआदि ११ . ५७ . [ माघार ] माघारपण - न .
नुकतेंच लग्न झालेल्या मुलीनें सासरहून माहेरीं कांहीं दिवस रहावयास परत येणें ; माहेरपण .
तिचें माहेराहून सासरीं परत येणें ; ( क्रि० करणें ). [ माघारा + पण ] माघारा , माघारां , माघारीं , माघारें , माघारिआ - क्रिवि . परत ; पुन्हां परत ; उलट . माघारा काढणें - मागें घेणें . माघारा भीम काढला तूर्ण । - मोस्त्री २ . ३४ . माघारी - वि .
( कों . ) नुकतेंच लग्न झालेल्या मुलाच्या अथवा मुलीच्या बरोबर माहेरीं किंवा श्वशुरगृहीं जाणारें ( मनुष्य ).
सासरच्या मुलीला माहेरीं आणण्याकरितां गेलेला , पाठविलेला ( मनुष्य ). [ माघारा ] माघारीण - स्त्री .
( कों . ) सासर्‍याहून माहेरीं किंवा माहेराहून सासरीं कांहीं दिवस रहावयास जाणारी , नुकतेंच लग्न झालेली मुलगी .
( सामा . ) तरुण पत्नी ; मालकीण ; गृहिणी . [ माघारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP