|
स्त्री. माती . एखाद्या विवक्षित जागेची माती ; कांहीं अनुष्ठानांत किंवा शांतिकर्मांत सात प्रकारच्या मृत्तिका सांगितल्या आहेत . त्या :- अश्व , गज , रथ , चतुष्पथ , गोष्ठ , वल्मीक , र्हद अगर संगममृत्तिका . कांहीं लोक गोष्ठ , वेदिका , कितबस्थान , र्हद , कर्षितक्षेत्र , चतुष्पथ , स्मशानमृत्तिका या सप्तमृत्तिका मानतात . रसायनशास्त्रांत नऊ प्रकारच्या मृत्तिका सांगितल्या आहेत . [ सं . ] ०होणें माती होणें ; नाश होणें ; धुळीस मिकणें . ०बुद्धि स्त्री. मातीप्रमाणें मानणें ; दुर्मिळ मृत्तिका स्त्री . ( रसा . ) कांहीं खनिज पदार्थांत सांपडणारे प्राणिद . या प्राणिदांमध्यें सेरियम , टर्नियम व इटर्नियम हे तीन धातु असतात . मृत्पिंड पु . मातीचा गोळा . [ सं . ] मृदावरणशास्त्र न . भूगर्भशास्त्र ; भूस्तरशास्त्र . [ सं . मृद + आवरण + शास्त्र ] मृदघटवत क्रिवि . मातीच्या भांड्याप्रमाणें , मडक्याप्रमाणें . धरणीवरि आपटिला । चूर्ण झाला मृदघटवत । [ सं . मृद = माती + घट + वत ] मृन्मय , मृण्मय वि . मातीचा बनविलेला .
|