|
वि. पु. पसरट असा मातीचा घडा ; रांजण - स्त्री . ( कु . ) चिकण माती असलेली जागा . [ सं . मृद + घट ; मृत्तिका + घट ] पुस्त्री . एक पालेभाजी . ही सर्वत्र व सर्वकाळीं होते . तांबडा व पांढरा असे याचे दोन प्रकार आहेत . लावल्यापासून तीन आठवड्यांत खाण्याजोगी होते . [ सं . मारिश ] ०ली स्त्री. ( कु . ) मातीचें लहान भांडें . चापटसर ; खालपट ; किंचित उतरतें ( छप्पर इ० ); याच्या उलट खर किंवा पाणढाळ . टिल्लू ; खुजट ( मनुष्य , पशु ). मंदमति ; जडबुद्धि . विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट । - तुगा ३४६० . [ माठणें ] ०घोसाळें न. घोसाळ्याची एक जात . - कृषि ५९५ . माठणें अक्रि . ( जखम , क्षत इ० ) भरणें आणि बरें होणें . झिजणें ; बोथटणें ( धार , टोंक ). उग्रता कमी होणें . - सक्रि . टांकीनें सारखा व गुळगुळीत करणें ; साफ करणें ( गुंडे , चिरे ). हलके हलके ठोकून गुळगुळीत करणें ( दागिने , गोठ , कडें , जोडवीं इ० ). ( धातूच्या नव्या भांड्याचे ) पोचे काढणें ; साफ करणें . ( ल . ) ठोकून नरम , वश करणें . माठरणें - अक्रि . जड , सुस्त , मठ्ठ होणें . डागळणें ; सुकणें ; कोमेजणें ; टवटवी नाहींशी होणें ( वनस्पति इ० ची ). भरुन येणें ; बरी होणें ( जखम ); भठारणें . - सक्रि . घडणें ; आकार , रुप देणें . ( ल . ) आपल्या इच्छेप्रमाणें घडविणें , वळविणें . मठारणें या अर्थीहि योजितात . माठलें - न . ( पळी , चमचा इ० कांचें ) तोंड . समईचें टवळें . ताक करावयाच्या रवीचा माथा , बोंड . लहान मुलाचें चापट व पातळ करभूषण माठवण - न . जखम भरुन येण्यासाठीं लावलेलें औषध ; माठणारें मलम . मठारणारा ; माठणारा व्रण माठंळणें , माठाळणें - सक्रि . ( हलकें ठोकून ) नव्या भांड्याचे पोचे साफ करणें . भांडें घडणें , उतरणें . एखादी वस्तु , भांडें यांवर हलका हात फिरविण्यानें साफ व गुळगुळीत करुन त्यास आकार आणणें ; हलके हाताच्या चोपानें सारखी करणें ( जमीन इ० ). ( ल ) आज्ञाधारक करणें ; आपल्या इच्छेप्रमाणें वळविणें . - अक्रि . बरी होणें ; भरणें ; मठारणें ( जखम ). मंद , जड होणें ( बुद्धि , मन ); मठ्ठ होणें ; जड , सुस्त , मांदा होणें ( शरीर , मनुष्य ). वाढ खुंटणें ; झकाकी , तेज , दम गमावणें ( झाड , वनस्पति यांचें ). माठा , ठ्या - वि . जड ; ठोंब्या ; जडबुद्धि ; मंदमति . माठी - स्त्री . बायकांच्या हातांतील धातूची पोकळ बांगडी . माठीव - वि . टांकीनें सारखा व गुळगुळीत ; उत्तम घडलेला ( इमरतीचा दगड ). माठें - न . ( कु . ) प्रेत जाळलेल्या जागेवरील बांधकाम ( मशीद , थडगें , छत्री , वृंदावन इ० ). दोन्ही टोकांस उघडी असलेली , पडदी नसलेली शेतांतील पडवी , सोपा इ० ; दुपाखी ढेलच ; पडसाळ .
|