Dictionaries | References

राबणें

   
Script: Devanagari
See also:  रांबणें

राबणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rābaṇē or ṃrāmbaṇēṃ v i To become accustomed, habituated, inured, familiarized--a cow &c. with a strange herd, a boy just placed at school, a wild cat to the house, the back or shoulder to a load. 2 To be well trodden or beaten--a road: to be seasoned--a vessel.
. Descriptive of an authoritative or a formidable, or of a prosperous personage. Pr. राबेल तो चाबेल He that works shall eat.
.

राबणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Become accustomed; be well trodden.

राबणें     

क्रि.  मेहनत , श्रम करणें . म्ह० १ राव राबतात देव कांपतात . २ राबेल तो चाबेल . राबता - पु . महारांकडून हक्कानें घेण्यांत येणारें सरकारी काम किंवा त्या कामाच्या मोबदला त्यांजकडून घेण्यांत येणारा पैसा . - वि . मेहनत करणारा . जया प्राणाचे घरीं । अंगें राबते भाऊ चारी । - ज्ञा १३ . २८ . राबता महार - पु . गांवचें सरकारी काम करणारा महार ; पाळीचा महार . व राबता महार वगैरे मशारनिल्हे यांजकडे देत जाणें . - थोमारो २ . ४७ . राबती - वि . चालू ; लागवडीची ( जमीन ). इनाम पडजमीन बिघे ५ देवविली ती राबती जमीन होती . - बाडबाबा २ . ८३ . राबतीण - स्त्री . ( व . ) मालकाच्या शेतांत काम करणार्‍या नोकराची बायंको . राबत्या - पु . सार्वजनिक काम करणारा महार ; पाळीचा महार ; वतनीमहार . [ राबता ]
अ.क्रि.  नित्य येणें जाणें असणें ; राबता असणें ( रस्ता , मैदान , जमीनीचा तुकडा यावरून ); वारंवार जाणें येणें असणें ( एखाद्याच्या घरीं , एखाद्या जागेंत ); राहणें ; असणें ; जन्म घालविणें ( एखाद्या घरांत , जागेंत ); विशिष्ट रीतीनें , संवयीनें जन्म घालविणें ; वापरणें ; परिचित होणें . राबता - पु . १ वारंवार जाणें येणें ; येणार्‍या जाणार्‍यांची गर्दी , दाटी , वर्दळ ; वापर ; परिपाठी ; अभ्यास ; संवय ; पौनःपुन्य ( एखाद्या कृत्याचें ). आज माणसांचा राबता दिसत नाहीं . - मदरु १ . ५५ . २ ऋणानुबंध ; स्नेह ; दळणवळण . आपला व खानाचा स्नेह व राबता बराच आहे . [ अर . रफ्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP