|
पुस्त्रीन . एक वनस्पति . याचे झाड कांद्याप्रमाणे असते . लसूण स्वादाकरितां मसाल्यांत , चटणीत वगैरे घालतात . याचे अनेक औषधी उपयोग आहेत . या वनस्पतीचा कांदा किंवा कांद्याची पाकळी . [ सं . लशुन ; प्रा . लसुण , लसण ] लसणा , लसण्या - पु . एक रत्न ; दुध्या कांचमणि . ( सं . ) लशुन . ह्यास बहिर्वक्र आकार दिला असतां त्याचे बिडालाक्ष किंवा मार्जारनेत्री हे रत्न होते . ह्याचे रंग धूम्र , पिवळट , पांढरट वगैरे . ( कों . ) फणसाचा प्रकार . ( बारीक गरे असलेला ) [ लसूण ] लसणी - स्त्री . लसणाची पाकळी , कुडी . तिच्या आकाराचा स्त्रियांचा एक अलंकार ( जवा , तोडा इ० ). वैदूर्यमणि . - वि . लसणीच्या पाकळीच्या आकाराचा ( मणि इ० ). लसणासंबंधीचा . [ लसूण ] ०जवा पु. जव्याचा एक प्रकार . याच्या कड्या लसणीच्या कुडीच्या सारख्या असतात . लसूण जव्याप्रमाणे जोडणी . ०बिंब न. वेताची एक लहान जात . याला पिंगट फूल येते . ०सालंमिश्री स्त्री. सालंमिश्रीची लहान जात . याच्या उलट पंजाबी सालंमिश्री . लसूणबी स्त्री . लसुणाची पाकळी , कुडी .
|