|
पुस्त्री . १ वर्ग ; भाग ; खातें ( मूळाक्षरांचें ). २ ( सामान्यतः ) प्रकार ; दर्जा ; विभाग . ३ ( किल्ला ; भाग यास ) जोडलेला , समाविष्ट केलेला भाग ; अंकित प्रदेश ; प्रांत . [ अर . विल्हा ] विल्हे करणें , विल्हे लावणें - १ निकालास लावणें ; निकालांत काढणें . २ लिहिणें ; व्यवस्थित मांडणें . दुसाला दप्तरीं विल्हे लावला . - वाडबाबा २ . ८५ . विल्हेस लागणें - व्यवस्था लागणें ; बंदोबस्त होणें . तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । - तुगा १८४५ . विल्हेस लावणें - वर्गवारीनें , प्रतवारीनें , प्रकारानुरूप लावणें ; व्यवस्था लावणें ; जम बसविणें . विल्हेस लावणें , विल्हेस देणें , विल्हेस करणें - हवालीं , स्वाधीन , ताब्यांत देणें , करणें ; सुपूर्त करणें . विल्हेवाट , विल्हय - स्त्री . १ उधळपट्टी ; वासलात ; फडशा ; निकाल ; धूळधाण . एकाची विल्हेवाट लावून दुसरी बरोबर सर्व सोहळे . - टि ४ . १३५ . २ व्यवस्था ; रचना ; मांडणी ; योग्य योजना . विल्हेवार - स्त्री . १ वर्गवारी ; खातेवारी ; वर्गीकरण ; निवड . २ वर्णानुक्रमरचना . प्रकृत कोशाची रचना , त्यांतील गुणदोष , यांतील सारी नांवें यांचे विल्हेवारीनें दिले आहेत . - नि १४४ .
|