Dictionaries | References श शपथे Script: Devanagari See also: शपथ , शपथी Meaning Related Words शपथे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ प्रतिज्ञेवर सांगणें - बोलणें ; आण ; भाक ; वचन ( क्रि० घेणें ; वहाणें ; खाणें ; करणें ; देणें ). सुगळ म्हणे रामा ! म्यां शोधावी जानकी , शपथ करितो । - मोवन ११ . ९९ . जर तर हे शब्द पूर्वी घालून जोराचा नकार किंवा दुजोरा देण्यांत येतो . उदा० करील तर शपथ . हालिवल्या अंगावर अगर काडीवर पडेल तर शपथ . २ दिव्य . [ सं . शप् शपथ घेणें ] म्ह० शपथ केली वहायला , भाकरी केली खायला . - मसाप ४ . ३ .०वाहायाला शपथेला मोकळा होणें - एखादें काम मुळींच केलें नाहीं असा दोष ठेवितां येऊं नये म्हणून कसें तरी ( हलगर्जीपणानें किंवा थोडें फार ) करणें ; शपथ घेण्यास सदसदविवेकबुध्दि आड येणार नाहीं अशा स्थितींत असणें .०सोडणें ( मुलींच्या खेळांत ) शपथेंतून मोकळें करणें . खालील वाक्य म्हणत शपथ सोडतात - शपथ सुटली ; कुंभाराची घागर फुटली ; हत्तीवरून साखर वाटली .०पूर्वक क्रिवि . शपथ घेऊन .०पत्र न. शपथपूर्वक लेखी जबानी ; प्रतिज्ञालेख ; शपथलेख ; क्रियापत्र . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP