|
पु. १ वाघ . - राव्य ३ . २२ . २ सिंह . ३ - वि . जबरदस्त ; धृष्ट ; धीट ; शूर ; पराक्रमी ; धाडशी ; अंमल , सत्ता गाजविणारा . परंतु ऐशा बखेडियांनी दुश्मन शेर होतात . - रा १२ . ८३ . मागती गिलचे शेर झाले . - भाब १०८ . - राव्य ८ . ६० . [ फा . हिं . शेर = सिंह ] पु. १ पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण , माप . याचे माप पूर्वी निरनिराळ्या भागांत निरनिराळे असे . पुढे दिलेले आंकडे रुपये भाराचे आहेत . बेळगांव - २३ . ०९ , मद्रास - २४ . ३ , मदुरा - २४ . ९१ , मंगळूर - २३ . ८५ , म्हैसूर - २३ . ८५ , पांदिचरी - २३ . ६२ , त्रिचनापल्ली - २३ . १७ , नगर - ७६ . ५६ , सिंध - ७२ . ४६ , माळवा - ७३ . ८९ , अजमेर - ७४ . ९७ , पुणे - ७६ , रत्नागिरी - २९ , चिपळूण - ३० , वेंगुर्ले - २७॥ , मालवण , दापोली , मुंबई - २८ , राजापूर - २९ , बंगाली - ८० , फर्काबाद - ११० , लखनौ - ९५ . ८२ , मालघा - ९५ . ६६ , काशी - १०५ ,. सध्या ८० भाराचा शेर सर्वत्र करण्यांत आला आहे . २ जासूद , शिपाई , बेगारी वगैरेस पोटाकरितां जे धान्य , शिधा देतात तो . ३ रोजचे अन्न ; नित्यवृत्ति ; उदरनिर्वाहाचे साधन . ( क्रि० उठणे ; उडणे ; काढणे ; चालणे ; तुटणे ; मिळाणे ; लागणे ). ४ आलुतेबलुते . - गांव १०३ . म्ह ० शेर शिजविला आणि विस्तव विझविला = स्वतःचे थोडेसेच काम चटकन आटोपून दुसर्यास दिरंगाई बद्दल दोष देणार्यास म्हणतात . २ थोडक्यांत कारभार आटोपणाच्या घरधनिणीस म्हणतात शेरास सव्वाशेर = प्रतिपक्षापेक्षा वरचढ ; चोरावर मोर . पु. चिकाडा ; काडेहुरा ; निवली ; एक कुंपणास लावावयाचें काडयाकाडया असलेले चिकाळु झाड . [ फा . शीर = दुध ] शेरताटी , शेरताट , शेरताड - स्त्री . शेराच्या झाडांची रांग , ओळ , कुंपण . स्त्री. ( कों . ) पक्ष्याची विष्टा ; शीट ; छीट . शेरणें - अक्रि . पक्ष्याने विष्टा टाकणे ; शीट टाकणे . ०पीठ शिधा - नपु . भत्ता ; शिधा ; शिपाई , बिगारी यास दिलेले धान्य . शेरका - वि . १ शेरभर धान्य मावेल असा . २ शेरभर वजनांत भरेल असा . ३ शेरभर धान्य , तांदुळाचा भात शिजेल असे . शेरभरकोंडा - पु . एक मुलीचा खेळ . - मखेपु २५८ . ०खोर वि. उन्मत्त . तर्हेवाईक शेर खोर ... लोक हुजरातीत एकदंर ठेवूच नयेत . - मराआ १४ . ०पणा पु. सामर्थ्य ; जबरदस्ती ; जोरावरी . - रा ८ . ४ . ०बाजी , बाजू - स्त्री . सरशी ; वर्चस्व . हे आपले ठायी आपली बहुत शेरबाजी मानतात . - जोरा ११५ .
|