द्वादशोऽध्याय:
ध्यानम्
ॐ विद्युद्दामसमप्रभां मृगपतिस्कन्धस्थितां भीषणां
कन्याभि: करवालखेटविलसद्धस्ताभिरासेविताम् ।
हस्तैश्चक्रगदासिखेटविशिखांश्चापं गुणं तर्जनीं
बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे ॥
'ॐ' देव्युवाच ॥१॥
एभि: स्तवैश्च मां नित्यं स्तोष्यते य: समाहित: ।
तस्याहं सकलां बाधां नाशयिष्याम्यसंशयम् ॥२॥
मधुकैटभनाशं च महिषासुरघातनम् ।
कीर्तयिष्यन्ति ये तद्वद् वधं शुम्भनिशुम्भयो: ॥३॥
अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां चैकचेतस: ।
श्रोष्यन्ति चैव ये भक्त्या मम माहात्म्यमुत्तमम् ॥४॥
न तेषां दुष्कृतं किंचिद् दुष्कृतोत्था न चापद: ।
भविष्यति न दारिद्र्यं न चैवेष्टवियोजनम् ॥५॥
शत्रुतो न भयं तस्य दस्युतो वा न राजत: ।
न शस्त्रानलतोयौघात्कदाचित्सम्भविष्यति ॥६॥
तस्मान्ममैतन्माहात्म्यं पठितव्यं समाहितै: ।
श्रोतव्यं च सदा भक्त्या परं स्वस्त्ययनं हि तत् ॥७॥
उपसर्गानशेषांस्तु महामारीसमुद्भवान् ।
तथा त्रिविधमुत्पातं माहात्म्यं शमयेन्मम ॥८॥
यत्रैतत्पठ्यते सम्यङ्नित्यमायतने मम ।
सदा न तद्विमोक्ष्यामि सांनिध्यं तत्र मे स्थितम् ॥९॥
बलिप्रदाने पूजायामग्निकार्ये महोत्सवे ।
सर्वं ममैतच्चरितमुच्चार्यं श्राव्यमेव च ॥१०॥
जानताऽजानता वापि बलिपूजां तथा कृताम् ।
प्रतीच्छिष्याम्यहं प्रीत्या वहिनहोमं तथा कृतम् ॥११॥
शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी ।
तस्यां ममैतन्माहात्म्यं श्रुत्वा भक्तिसमन्वित: ॥१२॥
सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वित: ।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय: ॥१३॥
श्रुत्वा ममैतन्माहात्म्यं तथा चोत्पत्तय: शुभा: ।
पराक्रमं च युद्धेषु जायते निर्भय: पुमान् ॥१४॥
रिपव: संक्षयं यान्ति कल्याणं चोपपद्यते ।
नन्दते च कुलं पुंसां माहात्म्यं मम श्रृण्वताम् ॥१५॥
शान्तिकर्मणि सर्वत्र तथा दु:स्वप्नदर्शने ।
ग्रहपीडासु चोग्रासु माहात्म्यं श्रृणुयान्मम ॥१६॥
उपसर्गा: शमं यान्ति ग्रहपीडाश्च दारुणा: ।
दु:स्वप्नं च नृभिर्दृष्टं सुस्वप्नमुपजायते ॥१७॥
बालग्रहाभिभूतानां बालानां शान्तिकारकम् ।
संघातभेदे च नृणां मैत्रीकरणमुत्तमम् ॥१८॥
दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम् ।
रक्षोभूतपिशाचानां पठनादेव नाशनम् ॥१९॥
सर्वं ममैतन्माहात्म्यं मम सन्निधिकारकम् ।
पशुपुष्पार्घ्यधूपैश्र्च गन्धदीपैस्तथोत्तमै: ॥२०॥
विप्राणां भोजनैर्होमै: प्रोक्षणीयैरहर्निशम् ।
अन्यैश्च विविधैर्भोगै: प्रदानैर्वत्सरेण या ॥२१॥
प्रीतिर्मे क्रियते सास्मिन् सकृत्सुचरिते श्रुते ।
श्रुतं हरति पापानि तथाऽऽरोग्यं प्रयच्छति ॥२२॥
रक्षां करोति भूतेभ्यो जन्मनां कीर्तनं मम ।
युद्धेषु चरितं यन्मे दुष्टदैत्यनिबर्हणम् ॥२३॥
तस्मिच्छूते वैरिकृतं भयं पुंसां न जायते ।
युष्माभि: स्तुतयो याश्र्च याश्र्च ब्रह्मर्षिभि:कृता: ॥२४॥
ब्रह्मणा च कृतास्तास्तु प्रयच्छन्ति शुभां मतिम् ।
अरण्ये प्रान्तरे वापि दावाग्निपरिवारित: ॥२५॥
दस्युभिर्वा वृत: शून्ये गृहीतो वापि शत्रुभि: ।
सिंहव्याघ्रानुयातो वा वने वा वनहस्तिभि: ॥२६॥
राज्ञा क्रुद्धेन चाज्ञप्तो वध्यो बन्धगतोऽपि वा ।
आघूर्णितो वा वातेन स्थित: पोते महार्णवे ॥२७॥
पतत्सु चापि शस्त्रेषु संग्रामे भृशदारुणे ।
सर्वाबाधासु घोरासु वेदनाभ्यर्दितोऽपि वा ॥२८॥
स्मरन्ममैतच्चरितं नरो मुच्येत सड्कटात् ।
मम प्रभावात्सिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा ॥२९॥
दूरादेव पलायन्ते स्मरतश्चरितं मम ॥३०॥
ऋषिरुवाच ॥३१॥
इत्युक्त्वा सा भगवती चण्डिका चण्डविक्रमा ॥३२॥
पश्यतामेव देवानां तत्रैवान्तरधीयत ।
तेऽपि देवा निरातङ्का: स्वाधिकारान् यथा पुरा ॥३३॥
यज्ञभागभुज: सर्वे चक्रुर्विनिहतारय: ।
दैत्याश्च देव्या निहते शुम्भे देवरिपौ युधि ॥३४॥
जगद्विध्वंसिनि तस्मिन् महोग्रेऽतुलविक्रमे ।
निशुम्भे च महावीर्ये शेषा: पातालमाययु: ॥३५॥
एवं भगवती देवी सा नित्यापि पुन: पुन: ।
सम्भूय कुरुते भूप जगत: परिपालनम् ॥३६॥
तयैतन्मोह्यते विश्वं सैव विश्वं प्रसूयते ।
सा याचिता च विज्ञानं तुष्टा ऋद्धिं प्रयच्छति ॥३७॥
व्याप्तं तयैतत्सकलं ब्रह्माण्डं मनुजेश्वर ।
महाकाल्या महाकाले महामारीस्वरूपया ॥३८॥
सैव काले महामारी सैव सृष्टिर्भवत्यजा ।
स्थितिं करोति भूतानां सैव काले सनातनी ॥३९॥
भवकाले नृणां सैव लक्ष्मीर्वृद्धिप्रदा गृहे ।
सैवाभावे तथालक्ष्मीर्विनाशायोपजायते ॥४०॥
स्तुता सम्पूजिता पुष्पैर्धूपगन्धादिभिस्तथा ।
ददाति वित्तं पुत्रांश्च मतिं धर्मे गतिं शुभाम् ॥ॐ॥४१।
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे
देवीमाहात्मये
फलस्तुतिर्नाम द्वादशोऽध्याय: ॥१२॥
उवाच ३, अर्धश्लोकौ २, श्लोका: ३७,
एवम् ४१, एवमादित: ६७१ ॥
-श्री वैभवलक्ष्मीर्विजयते -
ध्यान - विजेप्रमाणे तळपणारी, सिंहावर आरुढ होऊन भीषण भासणारी, जिच्या अनेक स्वरूपी कन्या सेवेला आहेत व ज्यांच्या हाती युद्धाची आयुधे ढाल, तलवार इत्यादी आहेत अशा कन्यांनी घेरलेली, स्वत:च्या हाती चक्र, गदा, ढाल, तलवार, चाप व धनुष्य सज्ज ठेवून क्रुद्ध नजरेने पाहणारी अग्निस्वरूपा, पण शीतल चंद्र किरीटी भूषविणार्या दुर्गेला आमचे नमस्कार.
ॐ देवी म्हणाली- "हे देव-देवतांनो, स्वस्थ चित्ताने व स्थिर मनाने जे भक्त मला भजतील, माझे पूजन करतील, इतरांकडून किंवा एकत्रितपणे करतील त्यांच्या सर्व बाधा, पीडा, संकटे मी तात्काळ नष्ट करीन, याविषयी संशय बाळगू नका. ॥१।२॥
मधुकैटभनाश आणि महिषासुर-वधाची कथा जे भक्त वाचतील, इतरांना सांगतील किंवा कीर्तनात गाऊन दाखवतील, त्याचप्रमाणे शुंभ-निशुंभ-वधांचे आख्यान वाचतील, ऎकतील वा ऎकवतील त्यांनाही हे फळ मिळून मी त्यांचे रक्षण करीन. ॥३॥
जे भक्त महिन्याच्या अष्टमीला-नवमीला किंवा चतुर्दशीला माझ्या कथा वाचतील, ऎकतील, गातील व माझ्या पराक्रमाची महती सांगून भक्तांना धीर देऊन निर्भय करतील, त्यांनाही मी निश्चित रूपाने वरदायिनी होईन ! ॥४॥
त्यांच्या वाटेला कोणतेही पाप, दुराचार, दुष्कृत्य किंवा आपत्ती येणार नाहीत. दारिद्र्य, दु:ख, वियोग, कष्टही त्यांना माझी भक्ती केल्याने भोगावे लागणार नाहीत. ॥५॥
शत्रूंपासून माझ्या भक्तांना कोणतीही भीती उरणार नाही. त्यांना दास्यत्व (गुलामी) येणार नाही, राजाची (सरकारची) गैरमर्जी होणार नाही. त्याचप्रमणे चोर, डाकू, शस्त्र, अग्नी, त्याचप्रमाणे पाण्यापासून कोणतीही भीती उरणार नाही. ॥६॥
म्हणून ही माझे चरित्र-माहात्म्य-कथा भक्तांनो, तुम्ही नेहमी वाचा, इतरांना ऎकवा व अत्यंत शांत व सावध मनाने माझ्यावर विश्वास ठेवूनच या आयुष्यात कालक्रमणा करा. ॥७॥
माझ्या चरित्र, वाचनाने उत्पात, भूकंप, दुष्काळ, पीडा, व्याधी, रोगराई, महामारी, पटकी ही राष्ट्रावर वेळी अवेळी येणारी त्रिविध संकटे निश्चितपणे टळतील व भक्त संकटमुक्त होतील. ॥८॥
माझे स्मरण, भजन-पूजन ज्या ज्या ठिकाणी होईल, त्या त्या पीठावर, मंदिरात, घरात विधिपूर्वक व भक्तिपूर्वक स्थापना होईल, तेथे तेथे माझी स्नेहमय कृपादृष्टी व सान्निध्य राहील व ते ते स्थान पावनतीर्थ होईल याविषयी शंका नसावी. ॥९॥
बलिदान, पूजा, महोत्सव, होम-हवन आदी शुभ प्रसंगी माझी पराक्रम-गाथा वाचावी, ऎकावी किंवा स्तोत्र-गायनांनी माझे भजन-पूजन करावे, करवावे व ऎकावे. ॥१०॥
कळत-नकळत झालेल्या पूजेने, भक्तीने वा बलिदानप्रसंगी केलेल्या माझ्या भक्तिमय पूजा-अर्चेनेसुद्धा मी प्रसन्न होऊन भक्तांना इष्ट वांच्छित फल नक्की देईन, याचा विश्वास ठेवावा. ॥११॥
शरद्ऋतूत माझी प्रतिवर्षी पूजा, समाराधना व होम-हवनादी समारंभ भक्तिपूर्वक करून माझ्या कथांचे वाचन, श्रवण नम्रतेने, भक्तिपूर्वक व समारंभाने सामूहिकपणे करावे. ॥१२॥
अशी माझी भक्तिपूर्वक आराधना केलेल्या भक्त-गणांची संकटे, त्रास, पीडा नष्ट होऊन ते आपल्या जीवनात माझ्या प्रसादाने धनवान्, समृद्ध, धन-धान्य भरपूर मिळून सुखी होतात, त्यांना पुत्र पौत्र (नातवंडे) यांचा लाभ होतो यांत संशय नाही. ॥१३॥
माझ्या शौर्यकथांची आराधना, भजन-पूजन स्वत: केल्याने किंवा इतरांकडून भक्तिपूर्वक ऎकल्यानेही त्या श्रोतृ-गणांना शुभदायक फायदा होतो, त्यांना युद्धात, संघर्षात विजय मिळतो व उर्वरित काळात मजवरील भक्तिश्रद्देने ते निर्भय आयुष्य उपभोगतात. ॥१४॥
माझ्या महतिकथा ऎकणार्या भक्तांचे शत्रू नष्ट होऊन ते निर्वैर होतात व आपल्या कुटुंब, पुत्र-पौत्रांसह पुण्यवान होऊन सुखी होतात. ॥१५॥
मन शांत राहण्यासाठी रोजच्या आयुष्यातील कटकटी संपण्यासाठी, ग्रहपीडा जाण्यासाठी किंवा वाईट स्वप्ने पडून मन:स्वास्थ्य बिघडते ते बंद होण्यासाठी, माझे स्तोत्र पठण करणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे स्वस्थता लाभते. ॥१६॥
नेहमी संसारात येणार्या अनिवार्य अडचणी, आजार, अपघात, हे संपून सुखशांती लाभते, कलह मिटतात, वाईट स्वप्ने पडायची थांबून, मानवाच्या उत्तम मनोरथांची पूर्तता होते. ॥१७॥
लहान शिशूंचे आजार, त्यांची योग्य वाढ, त्यांचे संगोपन, सुदृढता, त्यांना लाभून ते निरोगी व स्वस्थ होतात. समाजातील कलह, वैर मिटून समाजधुरीणांना उत्तम मैत्री लाभते. मित्र -परिवार वाढून त्यांचे सहकार्य मिळते. ॥१८॥
हे माझे देवीस्तोत्र दुराचारी लोकांच्या शक्तीला एक जबरदस्त आव्हान आहे. पापी लोकांना एक उत्तम धडा आहे. राक्षस-भूत-पिशाच्च-प्रेतादी वामाचारी शक्ती या स्तोत्रपठणाने समूळ नाहीशा होतात. त्यांचा नि:पात होतो. ॥१९॥
माझ्या या माहात्म्य-स्तोत्र-पठणाने माझी, माझ्या शक्तीची व कृपेची जवळीक लाभते व लाभ होतो. पूजासामग्री, पशू (बळी), पुष्प, धूप-दीप, सुगंधी अत्तर आदी साधनांनी केलेल्या पूजेने फायदा होतो. ॥२०॥
सत्प्रवृत्त पुरोहितांमार्फत यज्ञयाग करून त्यांना उत्तम भोजन देऊन त्यांची योग्य संभावना करावी. मला नित्य अभिषेक करून प्रसन्न करून घ्यावे, तसेच विविध प्रकारे जप-तप-ध्यान-मंत्रादि साधनांनी मला प्रसन्न करावे. ॥२१॥
माझी जितकी श्रद्धेने व भक्तीने पूजा कराल त्या प्रमाणात मी आशीर्वाद व मंगल सौख्य देते. एका पाठाने भक्ताला वर्षभर साधना केल्याचे पुण्य मिळते. त्याचे पाप संपून तो पुण्यवान व निरोगी होतो. ॥२२॥
जन्मभर माझे स्तोत्र-पठण ऎकले तर तो भक्त सुखी होतो, पण माझ्या या दैत्यांशी झालेल्या युद्धांतील शौर्यकथांनी श्रोता निर्भय होतो व संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. ॥२३॥
या रणकथा, हे पुण्यवंतांनो तुम्ही स्वत: वाचा, इतरांकडून ऎका. निर्भय होण्यासाठी व वैर्याचे वैर संपुष्टात येण्यासाठी या स्तोत्राशिवाय अन्य शक्तिशाली उपाय नाही. ब्रह्मदेवाने रचलेले व तुम्ही ऋषी-मुनींनी गायिलेले व यज्ञयागात म्हटलेले पुण्यकारक स्तोत्र दुसरे नाही. ॥२४॥
ब्राह्मणांकरवी केलेली समाराधना, अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन भक्ताला निरंतर लाभ घडवितात. हे स्तोत्र कुठे म्हणावे, याला काही नियम नाही. घरी, दारी, अरण्यात किंवा हिंस्र पशूंच्या संकटात, चोरांच्या संकटात म्हटले तर संकट टळते. ॥२५॥
चोरांनी अडवून चोरी केली, लुटले, शत्रूंनी घेरले, वनात अरण्यत हिंस्र पशू, जहरी प्राणी यांच्या विळख्यात, सिंह, वाघ व हत्ती यांनी केलेल्या आक्रमणात हे स्तोत्र-पठण-भक्तांची सतत राखण करते. ॥२६॥
राजाची गैरमर्जी झाली आणि बंदिवास कपाळी आला किंवा मृत्युदंडाचा आदेश सरकारने केला तरीही स्तोत्र-पठणाने मुक्तता होते. वावटळ, तुफान, समुद्रातील वादळ, बुडणारी नाव या संकटांपासून माझ्या कृपेने सुटका होते. ॥२७॥
युद्धात झालेले शस्त्राघात, व्रण, रणांगणातील व्रण-पीडा किंवा हेर किंवा फितुरीमुळे झालेले अपघात. सूड व अन्य पीडा या स्तोत्र-पठणाने शमतात. मोठमोठी संकटे नष्ट होतात. ॥२८॥
माझ्या या चरित्र-माहात्म्याचे फक्त स्मरण केले तर महासंकट, पीडा नष्ट होते आणि माझ्या बलसामर्थ्याने आशीर्वादाने, चोर व डाकू किंवा शत्रू यांचा कधीही उपसर्ग होत नाही. ॥२९॥
फक्त उपसर्गच नव्हे तर कोणतेही संकट केवळ माझी आठवण केल्याने दूर पळून जाते. ॥३०॥
ऋषी म्हणाले, "असे सांगून ती शक्तिशाली व वरदायिनी जगन्माता चण्डिका भक्तांना आशीर्वाद देऊन, त्यांचे मंगल चिंतून अंतर्धान पावली. ॥३२॥
देवांशी बोलता बोलता देवी अंतर्धान पावल्याचे दिसताच देव पुन्ह पूर्ववत्अजिंक्य झाले व दानवांच्या बंदिवासातून मुक्त झाले. त्यांना पूर्वीचे आपले अधिकार मिळून ते निर्भय झाले. ॥३३॥
त्यांना त्यांचे पूर्वीचे अधिकार त्याच क्रमाने मिळाले. यज्ञभोगाचे अधिकार पूर्वी नियमित असल्याप्रमाणे मिळाले. हे घडले ते केवळ देवीने, देवांचा शत्रु-शुंभाचा रणात वध केला त्यामुळेच देव पूर्वीप्रमाणे बलवान झाले. ॥३४॥
महाराक्षस वीर निशुंभ याने या जगाचा विध्वंस मांडला असल्याने देवीने अतुल पराक्रमाने त्याला ठार मारल्यानंतर उरलेले दैत्य-सैन्य आपले प्राण वाचवीत पाताळात निघून गेले. ॥३५॥
याप्रमाणे ही भगवती देवी, जगदम्बा पुन:पुन्हा भक्तांच्या संकट-रक्षणाला खलनिर्दाळणाला व जगाच्या कल्याण-पोषणासाठी अवतार घेते. ॥३६॥
ती महन्मंगला देवी आपल्या शक्तिशौर्याने सर्वांना मोहित करते. तिची श्रद्धा, भक्ती केल्यास ती ज्ञान-विज्ञान साधनेत सफलता, ऋद्धिसिद्धी देऊन स्मृति सजग ठेवते. ही देवी जगाला जन्म देते, तसेच निरंतर पोषण करते. ॥३७॥
महाप्रलयात भूकंप, वादळ-तडाखा, तुफान, निसर्गाने केलेले अपघातनिवारण करते; कारण हे ब्रह्माण्ड तिने उत्पन्न केले आहे. हे राजा ! ही मंगलाच सर्व जगाची आधारदायिनी असून ती सर्वसंचारी आहे. ॥३८॥
ती अजन्मा असली तरी सृष्टीचि जननी आहे. आपत्ति काली नवनिर्माणासाठी ती संहारक महामारीप्रमाणे असली तरी या विश्वातील जीवजंतूंचे रक्षण त्यांच्या त्यांच्या कालमानाप्रमाणे ती करीत असल्याने सनातनी आहे. ॥३९।।
वैभवशाली काळात भक्तांच्या घरी ती लक्ष्मीरूपाने राहून, ती वैभव, कीर्ती व नाव वाढवते, प्रगती करते आणि सुखसमृद्धी, पैसा, वैभव, कीर्ती न मिळाल्यास ती विनाशीही होते. ॥४०॥
धूप, दीप, गंध, फुले आदी साधने व षोडषोपचारांनी देवीची स्तुती, पूजा-पाठ केल्याने धन, धान्य, पुत्र-पौत्र, धर्माचार व सदाचार देऊन शेवटी भक्ताला सद्गती मिळवून देते. ॐ ॥४१॥
असा हा मार्कंडेय पुराणातील मन्वंतरकाळी घडलेल्य देवीमाहात्म्य कथेचा फलस्तुती नावाचा बारावा अध्याय आहे.