श्रीदुर्गासप्तशती - प्रथमोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - प्रथमोऽध्याय:
Durga Saptashati

अथ श्रीदुर्गासप्तशती
प्रथमोऽध्याय:
प्रथमचरित्र
ॐ प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषि: महाकाली देवता गायत्री छंद: नंदाशक्ति: रक्तदन्तिकाबीजम् अग्नितत्त्वतम् ऋग्वेद:स्वरूपम् श्री महाकालीप्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग: ।
ध्यानम्
खड्‌गं चक्रगदेषुचापपरिघाच्छूलं भुशुण्डीं शिर:
शङ्खं संदधतीं करौस्त्रिनयनां सर्वाड्गभूषावृताम् ।
नीलाश्मद्युतिमास्यपाददशकां सेवे महाकालिकां
यामस्तौत्स्वपिते हरौ कमलजो हन्‍तुं मधुं कैटभम् ॥
ॐ नमश्चण्डिकायै ॥
ॐ नम: चण्डिकायै
ॐ ऎं' मार्कण्डेय उवाच ॥१॥
सावर्णि: सूर्यतनयो यो मनु: कथ्यतेऽष्टम: ।
निशामय तदुत्पत्तिं विस्तराद् गदतो मम ॥२॥
महामायानुभावेन यथा मन्वन्‍तराधिप: ।
स बभूव महाभाग: सावर्णिस्तनयो रवे: ॥३॥
स्वारोचिषेऽन्‍तरे पूर्वं चैत्रवंशसमुद्‌भव: ।
सुरथो नाम राजाभूत्समस्ते क्षितिमण्डले ॥४॥
तस्य पालयत: सम्यक् प्रजा: पुत्रानिवौरसान्।
बभूवु: शत्रवो भूपा: कोलाविध्वंसिनस्तदा ॥५॥
तस्य तैरभवद् युद्धमतिप्रबलदण्डिन: ।
न्यूनैरपि स तैर्युद्धे कोलाविध्वंसिभिर्जित: ॥६॥
तत: स्वपुरमायातो निजदेशाधिपोऽभवत् ।
आक्रान्‍त: स महाभागस्तैस्तदा प्रबलारिभि: ॥७॥
अमात्यैर्बलिभिर्दुर्बलस्य दुरात्मभि: ।
कोशे बलं चापह्रतं तत्रापि स्वपुरे तत: ॥८॥
ततो मृगयाव्याजेन ह्रतस्वाम्य: स भूपति: ।
एकाकी हयमारुह्य जगाम गहनं वनम् ॥९॥
स तत्राश्रममद्राक्षीद् द्बिजवर्यस्य मेधस: ।
प्रशान्‍तश्‍वापदाकीर्णं मुनिशिष्योपशोभितम् ॥१०॥
तस्थौ कंचित्स कालं च मुनिना तेन सत्कृत; ।
इतश्‍चेतश्‍च विचरंस्तस्मिन्मुनिवराश्रमे ॥११॥
सोऽचिन्‍तयत्तदा तत्र ममत्वाकृष्टचेतन: ।
मत्पूर्वै: पालितं पूर्वं मया हीनं पुरं हि तत् ॥१२॥
मद्‌भृत्यैस्तैरसद्‌वृत्तैर्धर्मत: पाल्यते न वा ।
न जाने स प्रधानो मे शूरहस्ती सदामद: ॥१३॥
मम वैरिवशं यात: कान् भॊगानुपलप्स्यते ।
ये ममानुगता नित्यं प्रसादधनभोजनै: ॥१४॥
अनुवृत्तिं ध्रुवं तेऽद्य कुर्वन्त्यन्यमहीभृताम् ।
असम्यग्व्यशीलैस्तै: कुर्वद्‌भि: सततं व्ययम् ॥१५॥
संचित: सोऽतिदु:खेन क्षयं कोशो गमिष्यति ।
एतच्चान्यच्च सततं चिन्तयामास पार्थिव: ॥१६॥
तत्र विप्राश्रमाभ्याशे वैश्यमेकं ददर्श स:।
स पृष्टस्तेन कस्त्वं भो हेतुश्‍चागमनेऽत्र क: ॥१७॥
सशोक इव कस्मात्त्वं दुर्मना इव लक्ष्यसे ।
इत्याकर्ण्य वचस्तस्य भूपते: प्रणयोदितम् ॥१८॥
प्रत्युवाच स तं वैश्य: प्रश्रयावनतो नृपम् ॥१९॥
वैश्‍य उवाच ॥२०॥
समाधिर्नाम वैश्‍योऽहमुत्पन्नो धनिनां कुले ॥२१॥
पुत्रदारैर्निरस्तश्‍च धनलोभादसाधुभि: ।
विहीनश्‍च धनैर्दारै: पुत्रैरादाय मे धनम् ॥२२॥
वनमभ्यागतो दु:खी निरस्तश्र्चाप्तबन्धुभि: ।
सोऽहं न वेद्मि पुत्राणां कुशलकुशलात्मि-काम् ॥२३॥
प्रवृत्तिं स्वजनानां च दाराणां चात्र संस्थित: ।
किं नु तेषां गृहे क्षेममक्षेमं किं नु साम्प्रतम् ॥२४॥
कथं ते किं न सद्‌वृत्ता दुर्वृत्ता: किं नु मे सुता: ॥२५॥
राजोवाच ॥२६॥
यैर्निरस्तो भवाँल्लुब्धै: पुत्रदारादिभिर्धनै: ॥२७॥
तेषु किं भवतु: स्नेहमनुबघ्नाति मानसम् ॥२८॥
वैश्य उवाच ॥२९॥
एवमेतद्यथा प्राह भवानस्मद्‌गतं वच: ॥३०॥
किं करोमि न बध्नाति मम निष्ठुरतां मन: ।
यै: संत्यज्य पितृस्नेहं धनलुब्धैर्निराकृत: ॥३१॥
पतिस्वजनहार्दं च हार्दि तेष्वेव मे मन: ।
किमेतन्नाभिजानामि जानन्नपि महामते ॥३२॥
यत्प्रेमप्रवणं चित्तं विगुणेष्वपि बन्धुषु ।
तेषां कृते मे नि:श्‍वासो दौर्मनस्यं च जायते ॥३३॥
करोमि किं यन्न मनस्तेष्वप्रीतिषु निष्ठुरम् ॥३४॥
मार्कण्डेय उवाच ॥३५॥
ततस्तौ सहितौ विप्र तं मुनिं समुपस्थितौ ॥३६॥
समाधिर्नाम वैश्योऽसौ स च पार्थिवसत्तम: ।
कृत्वा तु तौ यथान्यायं यथार्हं तेन संविदम् ॥३७॥
उपविष्टौ कथा: काश्र्चिच्चक्रतुर्वैश्‍यपार्थिवौ ॥३८॥
राजोवाच ॥३९॥
भगवंस्त्वामहं प्रष्टुमिच्छाम्येकं वदस्व तत् ॥४०॥
दु:खाय यन्मे मनस: स्वचित्तायत्ततां विना ।
ममत्वं गतराज्यस्य राज्याङ्गेष्वखिलेष्वपि ॥४१॥
जानतोऽपि यथाज्ञस्य किमेतन्मुनिसत्तम ।
अयं च निकृत: पुत्रैर्दारैर्भृत्यैस्तथोज्झित: ॥४२॥
स्वजनेन च संत्यक्तस्तेषु हार्दी तथाप्यति ।
एवमेष तथाहं च द्वावप्यत्यन्तदु:खितौ ॥४३॥
दृष्टदोषेऽपि विषये ममत्वाकृष्टमानसौ ।
तत्किमेतन्महाभाग यन्मोहो ज्ञानिनोरपि ॥४४॥
ममास्य च भवत्येषा विवेकान्धस्य मूढता ॥४५॥
ऋषिरुवाच ॥४६॥
ज्ञानमस्ति समस्तस्य जन्तोर्विषयगोचरे ॥४७॥
विषयश्च महाभाग याति चैवं पृथक् पृथक् ।
दिवान्धा: प्राणिन: केचिद्रात्रावन्धास्तथापरे ॥४८॥
केचिद्दिवा तथा रात्रौ प्राणिनस्तुल्यदृष्टय: ।
ज्ञानिनो मनुजा: सत्यं किं तु ते नहि केवलम् ॥४९॥
यतो हि ज्ञानिन: सर्वे पशुपक्षिमृगादय: ।
ज्ञानं च तन्मनुष्याणां यत्तेषां मृगपक्षिणाम् ॥५०॥
मनष्याणां च यत्तेषां तुल्यमन्यत्तथोभयो: ।
ज्ञानेऽपि सति पश्यैतान् पतङ्गात्र्छावचञ्चुषु ॥५१॥
कणमोक्षादृतान्मोहात्पीड्यमानानपि क्षुधा ।
मानुषा मनुजव्याघ्र साभिलाषा: सुतान् प्रति ॥५२॥
लोभात्प्रत्युपकाराय नन्वेतान् किं न पश्‍यसि ।
तथापि ममतावर्ते मोहगर्ते निपातिता: ॥५३॥
महामायाप्रभवेण संसारस्थितिकारिणा ।
तन्नात्र विस्मय: कार्यो योगनिद्रा जगत्पते: ॥५४॥
महामाया हरेश्‍चैषा तया संमोह्यते जगत् ।
ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा ॥५५॥
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।
तया विसृज्यते विश्‍वं जगदेतच्चराचरम् ॥५६॥
सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्‍तये ।
सा विद्या परमा मुक्‍तेर्हेतुभूता सनातनी ॥५७॥
संसारबन्धहेतुश्‍च सैव सर्वेश्‍वरेश्‍वरी ॥५८॥
राजोवाच ॥५९॥
भगवन् का हि सा देवी महामायेति यां भवान् ॥६०॥
ब्रवीति कथमुत्पन्ना सा कर्मास्याश्च किं द्विज ।
यत्प्रभावा च सा देवी यत्स्वरूपा यदुद्‌भवा ॥६१॥
तत्सर्वं श्रोतुमिच्छामि त्वतो ब्रह्मविदां वर ॥६२॥
ऋषिरुवाच ॥६३॥
नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम् ॥६४॥
तथापि तत्समुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम ।
देवानां कार्यसिद्ध्यर्थंमाविर्भवति सा यदा ॥६५॥
उत्पन्नेति यदा लोके सा नित्याप्यभिधीयते ।
योगनिद्रां तदा विष्णुर्जगत्येकार्णवीकृते ॥६६॥
आस्तीर्य शेषमभजत्कल्पान्‍ते भगवान् प्रभु: ।
तदा द्वावसुरौ घोरौ विख्यातौ मधुकैटभौ ॥६७ ॥
विष्णुकर्णमलोद्‌भूतौ हन्‍तुं ब्रह्माणमुद्यतौ ।
स नाभिकमले विष्णो: स्थितो ब्रह्मा प्रजापति: ॥६८॥
दृष्ट्वा तावसुरौ चोग्रौ प्रसुप्तं च जनार्दनम् ।
तुष्टाव योगनिद्रां तामेकाग्रह्रदयस्थित: ॥६९॥
विबोधनार्थाय हरेर्हरिनेत्रकृतालयाम् ।
विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकरिणीम् ॥७०॥
निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजस: प्रभु: ॥७१॥
ब्रह्मोवाच ॥७२॥
त्वं स्वाहा त्वं स्वधां त्वं हि वषट्कार: स्वरात्मिका ॥७३॥
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ।
अर्धमात्रास्थिता नित्या यानुच्चार्या विशेषत: ॥७४॥
त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा ।
त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् ॥७५॥
त्वयैतत्पाल्यते देवि त्वमत्स्यन्‍ते च सर्वदा ।
विसृष्टौ सृष्टिरूपां त्वं स्थितिरूपा च पालने ॥७६॥
तथा संह्रतिरूपान्‍ते जगतोऽस्य जगन्मये ।
महाविद्या महामाया महामेधा महास्मृति: ॥७७॥
महामोहा च भवती महादेवी महासुरी ।
प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रयविभाविनी ॥७८॥
कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्‍च दारुणा ।
त्वं श्रीस्त्वमीश्‍वरी त्वं र्‍हीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा ॥७९॥
लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्ति: क्षान्तिरेव च ।
खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा ॥८०॥
शड्‌खिनी चापिनी बाणभुशुण्डीपरिघायुधा ।
सौम्या सौम्यतराशेषसौम्यभ्यस्त्वतिसुन्दरी ॥८१॥
परपराणां परमा त्वमेव परमेश्‍वरी ।
यच्च किंचित्क्वचिद्वस्तु सदसद्वाखिलात्मिके ॥८२॥
तस्य सर्वस्य या शक्ति: सा त्वं किं स्तूयसे तदा ।
यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् ॥८३॥
सोऽपि निद्रावशं नीत: कस्त्वां स्तोतुमिहेश्‍वर: ।
विष्णु शरीरग्रहणमहमीशान एव च ॥८४॥
कारितास्ते यतोऽतस्त्वां क: स्तोतुं शक्तिमान् भवेत् ।
सा त्वमित्थं प्रभावै: स्वैरुदारैर्देवि संस्तुता ॥८५॥
मोहयैतौ दुराधर्षावसुरौ मधुकैटभौ ।
प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु ॥८६॥
बोधश्‍च क्रियतामस्य हन्‍तुमेतौ महासुरौ ॥८७॥
ऋषिरुवाच ॥८८॥
एवं स्तुता तदा देवी तामसी तत्र वेधसा ॥८९॥
विष्णो: प्रबोधनार्थाय निहन्तुं मधुकैटभौ ।
नेत्रास्यनासिकाबाहुह्रदयेभ्यस्तथोरस: ॥९०॥
निर्गम्य दर्शने तस्थौ ब्रह्मणोऽव्यक्तजन्मन:।
उत्तस्थौ च जगन्नाथस्तया मुक्‍तो जनार्दन: ॥९१॥
एकार्णवेऽहिशयनात्तत: स ददृशे च तौ ।
मधुकैटभो दुरात्मानावतिवीर्यपराक्रमौ ॥९२॥
क्रोधरक्‍तेक्षणावत्तुं ब्रह्माणं जनितोद्यमौ ।
समुत्थाय ततस्ताभ्यां युयुधे भगवान् हरि: ॥९३॥
पंचवर्षसहस्त्राणि बाहुप्रहरणो विभु: ।
तावप्यतिबलोन्मत्तौ महामायाविमोहितौ ॥९४॥
उक्तवन्तौ वरोऽस्मत्तो व्रियतामिति केशवम् ॥९५॥
श्रीभगवानुवाच ॥९६॥
भवेतामद्य मे तुष्टौ मम वध्यावुभावपि ॥९७॥
किमन्येन वरेणात्र एतावद्धि वृतं मम॥९८॥
ऋषिरुवाच ॥९९॥
वंचिताभ्यामिति तदा सर्वमापोमयं जगत् ॥१००॥
विलोक्य ताभ्यां गदितो भगवान् कमलेक्षण: ।
आवां जहि न यत्रौर्वी सलिलेन परिप्लुता ॥१०१॥
ऋषिरुवाच ॥१०२॥
तथेत्युक्त्वा भगवता शड्खचक्रगदाभृता ।
कृत्वा चक्रेण वै च्छिनै जघने शिरसी तयो: ॥१०३॥
एवमेषा समुत्पन्ना ब्राह्मणा संस्तुता स्वयम् ।
प्रभावमस्या देव्यास्तु भूय: श्रृणु वदामि ते ॥ ऎं ॐ ॥१०४॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये
मधुकैटभवधो नाम प्रथमोऽध्याय: ॥१॥
उवाच १४, अर्धश्लोका: २४, श्लोका: ६६, एवमादित: १०४ ॥
श्री महामाया विजयते

ॐ प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषि: महाकाली देवता गायत्री छंद: नंदाशक्ति: रक्तदन्तिकाबीजम् अग्नितत्तवम् ऋग्वेद:स्वरूपम् श्री महाकलीप्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग: ।
खड्‍ग (तलवार), चक्र, गदा, चाप, परिघ, शूळ, भूशुंडी, रुंडमाळ आणि शंख इत्यादी आयुधे धारण करणारी देवी सर्व रत्‍नालंकारांनीही सुसज्जित आणि सुशोभित आहे. या महाकालीच्या देहाचे तेज नीलमण्यासारखे तेजस्वी व प्रभावी असून तिची दहा मुखे व दहा पाय असे आश्चर्यकारक रूप दिसते. ही पद्‍मजा अशी रणभूमीत सज्ज झाली व देवांना तिने मधु आणि कैटभ या राक्षसांना ठार मारण्याची प्रेरणा दिली.
श्री मार्कण्डेय म्हणाले -
सावर्णि-कुलातील सूर्यपुत्र जो आठवा मनू म्हणूनही ओळखला जाई त्याचा जन्म व चरित्र मी विस्ताराने सांगतो. ॥१॥२॥
महामायेच्या प्रभावाने व आशिर्वादाने हा सावर्णि कुलदीपक अत्यंत श्रेष्ठ पदाला पोहचून तो मन्वन्तराचा स्वामी झाला तो प्रसंग असा- ॥३॥
स्वारोचिष मन्वन्तरकाली पूर्वी चैत्रवंशात या पृथ्वीचा सम्राट सुरथ नावाचा राजा राज्य करीत असे. ॥४॥
तो सुरथ राजा दयामय, सर्वभूत समान मानणारा असल्याने त्याचे आपल्या प्रजेवर अपत्यव्रत प्रेम होते. पुत्र, सेवक, दासांना तो पुत्रांचे प्रेमे देई. त्या राजाला कोल नगरीच्या कोलविध्वंसी समूहाचे राजे शत्रू होते. ॥५॥
राजा सुरथ युद्धनिपुण व शूर असूनही संख्येने कमी असलेल्या कोलाविध्वंसींकडून युद्धात पराभूत झाला. ॥६॥
पराजित पावलेला सुरथ राजा आपल्या राजधानीला परत आला. तेथेही त्याच्यावर तेथील प्रबळ झालेल्या शत्रूंनी राजाचा पराभव केला. ॥७॥
पराभूत आणि बलहीन झालेल्या सुरथ राजाला त्याच्या स्वत:च्या राज्यातील मंत्रीगणांनी आणि दुष्टबुद्धी अधिकार्‍यांनी राजाचे धन आणि अधिकार हिसकावून घेऊन राज्याबाहेर हाकून दिले. ॥८॥
स्वत:च्या राज्यातील आपले प्रभुत्व नष्ट झाल्याने सुरथ राजा एका निबिड अरण्यात घोड्यावर बसून मृगयेसाठी गेला.  ॥९॥
वनात हिंडताना विप्रवर मेधाऋषींचा आश्रम राजाने पाहिला, जेथे आपल्या स्वाभाविक हिंस्त्र वृत्ती सोडून वाघ सिंहादी क्रूर समजले जाणारे पशू शांत, अहिंसक भावनेने वावरत होते व मुनींचे शिष्यगण त्यांच्यात स्नेहभावाने वागून त्या अरण्याची शोभा वाढवीत होते. ॥१०॥
आश्रमात पोहोचल्यावर सुमेधा ऋषींनी राजाचे आदरपूर्वक आगत-स्वागत केले. राजा तेथे काही काळ आपले दिवस शांततेत घालवू लागला. ॥११॥
आश्रमातील काळ जरी शांततेत आज असला तरी सुरथ राजा आपल्या पूर्वायुष्यातील आठवणींनी बेचैन होई. माझ्या पूर्वजांनी ज्या माझ्या नगराचे, नगरवासियांचे पालन पोषण पूर्वी केले त्या नगरीला मी आता पारखा झालो आहे. ॥१२॥
माझे भाईबंद, आप्तगण, प्रजानन सद्‌वृत्तीने व सद्धर्माने आचरण करतात की नाही? मी सतत अंबारीत असताना मला पाठीवरून दूर दूर नेणारा माझा मदोन्मत्त प्रमुख हत्ती शत्रूच्या तावडीत सापडल्यावर त्याची काय अवदशा झाली असेल हे समजत नाही. ॥१३॥
जे लोक माझ्या आश्रयाखाली सुखेनैव भोग व आनंद लुटण्यासाठी माझी, पाठीस लागून आर्जवं करीत होते, माझ्या कृपाकटाक्षासाठी धन भोजनादी सामग्रीसाठी माझा अनुनय करीत, ते आता शत्रूच्या हाती सापडून कोणत्या गतीला गेले असतील? ॥१४॥
त्या निरुद्योगी व लालची लोकांनी नेहमी केलेल्या उपद्‌व्यापांमुळे विनाकारण खर्च वाढून उधळेपणाला ऊत येत असेल आणि माझ्या त्या पुर्वीच्या राज्याचा कोष (खजिना) मुक्‍तपणे केलेल्या खर्चाने रिकामा झाला असेल. ॥१५॥
हे आपले दुर्भाग्य वाट्याला आलेले, राज्यातील रिता कोष, आप्त जनांची, प्रजेची काळजी या विचारांनी राजा अस्वस्थ होई; व शरीराने खंगुन जाई. ॥१६॥
त्या ब्रह्मर्षीच्या आश्रमाजवळ घोटाळताना एक वाणी राजाला दिसला व राजाने आपण कोण, कोठून आलात, येण्याचा हेतू काय? असे प्रश्न विचारले. ॥१७॥
आपण शोकाकुल दिसता आहात, आपले मनही स्वस्थ दिसत नाही असे भाव चेहेर्‍यावर दिसतात असेही राजाने वाणीबुवांना प्रेमाने व आपुलकीने विचारले. ॥१८॥
राजाच्या या प्रश्नावर तो वैश्य राजाला म्हणाला ॥१९॥
वैश्य म्हणाला, "महाराज मी समाधी नावाचा वाणी असून धनवान कुळात मी उत्पन्न झालो आहे. ॥२०॥२१॥
पत्‍नी आणि मुलांनी धनलोभाने माझा त्याग केल्याने मी घरदार, धन, संपत्तीला वंचित होऊन त्यांना सोडून आलो आहे. ॥२२॥
अशा प्रकारे मनात अत्यंत दु:खी होऊन आप्तबांधवादिकांना सॊडून मी आलो, तरी त्यांची खुशाली व ते माझ्याशिवाय कसे राहात असतील या विचारांनी अस्वस्थ आहे. ॥२३॥
माझी पत्‍नी, माझे स्वजन या वेळी माझ्याशिवाय रहावे लागल्याने त्यांचे क्षेम आहे किंवा त्यांना त्रास आहे या कल्पनांनी माझ्या मनावर चिंतेचे पटल येत आहे. ॥२४॥
ते सदाचाराने वागत असतील किंवा दुराचाराने याबद्दल मला माझ्या मुलांविषयी फार काळजी वाटते. ॥२५॥
राजा म्हणाला, "हे वाणीवरा, आपण आपल्या नगरीचा, पुत्र-पत्‍नीचा त्याग करून इथे आलात तरी त्यांच्याविषयी तुमचे प्रेम, जिव्हाळा संपत नाही, त्यांचे तुमच्यामागे कसे होईल या विचारांनी तुमचे मन व्याकुळ झालेले आहे आणि त्या प्रेमाने तुम्ही बांधलेले आहात." ॥२६॥२७॥२८॥
वैश्य म्हणाला, "राजन्, आपण आमच्याबद्दल जे विचारले ते ठीक आहे. ॥२९॥३०॥
पण माझे मन त्या प्रेमापासून निष्ठुर होऊ शकत नाही याला मी काय करू. धनाच्या अभिलाषेने त्यांनी पिता असूनही माझा त्याग करून गृहहीन केले. ते पित्याबद्दलची माया विसरले. ॥३१॥
महोदय, पत्‍नी आणि स्वजनांनी माझा त्याग करून सुद्धा त्यांच्या विषयीचा माझ्या मनातील जिव्हाळा आणि प्रेम संपत नाही. हे इष्ट नव्हे हे माहीत असूनही माझे मन पुन्हा पुन्हा त्यांचेकडे त्यांचेकडे धावत आहे. ॥३२॥
त्यांच्यावरील अतीव प्रेमाने मी आंधळा होऊन त्यांच्या या अविचारी कृतींवर मी दु:खाने वारंवार उदासपणे नि:श्वास टाकतो आहे. माझे मन त्यांचेविषयी अनाठायी व्याकूळ होत आहे. ॥३३॥
आणि काय करावे, निष्ठुरपणाने त्यांना विसरावे किंवा कसे याविषयी माझ्या मनी द्बिधा भाव निर्माण झाला आहे. त्यांचेवरील प्रेमाने मी निष्ठूर होऊ शकत नाही. ॥३४॥
मार्कंडेय म्हणाले, "अशा परस्पर विरोधी विचारांनी व्यथित झाल्याने दोघेही ब्रह्मर्षी सुमेधाऋषींकडे उपस्थित झाले." ॥३५॥३६॥
त्यानंतर समाधी वाण्यासह तो राजा, दोघांच्याही मनात आलेल्या संदेहाबद्दलची न्याय्य भूमिका काय आहे हे विचारण्यासाठी सुमेधाऋषींकडे आला. ॥३७॥
ब्रह्मर्षि सुमेधा ऋषींसमोर बसून उभयतांनी आपली कहाणी आणि मनातील व्यथा त्यांना सांगितली. ॥३८॥
राजा म्हणाला, "भगवान, आमच्या मनात आलेल्या शंकांचे निरसन करावे. आम्ही विचारतो ते योग्य की अयोग्य याची नक्की दिशा दाखवावी." ॥३९॥४०॥
माझे राज्य, राजवैभव मला सोडून गेले असले तरी त्या विषयीचे माझे प्रेम आणि जिव्हाळा माझ्या मनातून जात नाही, हे माझ्या मनाला मोठे दु:ख आहे.  ॥४१॥
मला राज्यातून हाकून दिलेले आहे. ते आता माझे नाही हे कळत असूनसुद्धा केवळ प्रेमाच्या आंधळेपणाने आणि मनाच्या दुबळेपणाने मी दु:ख करावे हे का? मुनिश्रेष्ठा ते आम्हाला सांगावे. ॥४२॥
आप्तगण, बंधू, पुत्र, भार्या यांनी या समाधी वाण्याचा त्याग करून त्याला नगराबाहेर हाकलल्याने तोही असाच त्यांच्याविषयीच्या प्रेमाने अनाठायी व्याकूळ होऊन दु:खी झाला आहे. आम्ही दोघेही या व्यर्थ विचारांनी त्रस्त होऊन आपणाकडे आलो आहोत. ॥४३॥
हा दुर्बळ मनाचा अविवेकी दृष्टिकोन, की अनाठायी मायेने आकृष्ट होऊन मनावर आलेली मोहाची झापड याविषयी आमच्या मनातील शंका निरसन कराव्यात. ॥४४॥
याला अविवेकी वेडेपणा किंवा माझ्या या भावनेला काय म्हणावे?" ॥४५॥
राजाचे हे बोलणे ऎकून ऋषी म्हणाले, "सर्व चराचर प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या परीने ज्ञान असते. अगदी जीवजंतूंनाही समज असते. ॥४६॥४७॥
हे महाशय नृपवरा, परन्तु त्या सर्वांचे विषय आणि कारणे निरनिराळी आहेत. त्यांच्यापैकी कुणी दिवाभीत असतात तर कुणी रातांधळे असतात. अशा प्राण्यांची समज भिन्न असते.  ॥४८॥
कुणी रात्री आणि दिवसाही सारख्याच समतोल दृष्टीने पाहू शकतात. त्या प्राण्यांपेक्षा माणसाचे ज्ञान, विचार आणि समज वेगळी आहे हे बरोबर पण ते काही सर्वस्वी खरे नव्हे. ॥४९॥
सर्व चराचरांना त्या त्या प्रमाणात ज्ञान आणि समज असते तशी माणसांनाही असते. माणसांची आणि प्राणी-पक्ष्यांची समज आणि ज्ञान त्यांच्यापुरती निराळी असते. ॥५०॥
तुलनेने मनुष्यप्राण्यांचे ज्ञान आणि पशु-पक्ष्यांचे ज्ञान यांत फरक असला तरी असे पहा, आपल्या चोचींनीं पक्षीगण खाद्य गोळा करतात. ॥५१॥
असे चोचींनी वेचलेले कण कण खाद्य स्वत: भुकेने पीडित असले तरीही आपल्या चिमण्या शिशूंना आधी भरवितात, तसेच वाघसिंहादी वनचरांचे आपल्या बछड्यांवर प्रेम असते. ॥५२॥
माणसांचे तसे नाही. मुलगा मोठा होऊन म्हातारपणी सांभाळील, आधार देईल या भावनेने मुलांचा प्रतिपाळ होतो. आणि या मोहाच्या लोभाच्या अभिलाषेनेच मानवांचे व्यवहार होतात. ॥ ५३॥
महामायेच्या प्रभावाने या जगाची उत्पत्ती, स्थिती, चराचरांचे कार्य व त्यांच्या वृत्ती ठरलेल्या आहेत, यात शंका नाही. भगवान विष्णूही एकदा अशाच घोर निद्रेत असता- ॥५४॥
महामाया देवीने त्यांना निद्रासंमोहिनीचे पटल काढून टाकून जागे-केले, कारण ज्ञानी लोकांची चेतना-ज्योत ही स्वयं भगवती देवीच आहे. ॥५५॥
ती ज्ञानी जनांना बलपूर्वक मायाजाळात घेरते. तीच या जगाची जननी आहे. जीवसृष्टीचे चालकत्व आणि नियंत्रण तिच्याकडेच असते. ॥५६॥
आणि प्रसन्न झाल्यावर वरदायिनी होऊन मोक्षाचाही लाभ करून देते. ती आदिम सनातन परम विद्यांची अधिष्ठात्री आहे आणि भक्तांचे परम कल्याण करणारी जगदंबा आहे. ॥५७॥
संसारबंधनातून उत्तम रीतीने तरून नेण्यास समर्थ असणारी सर्वसर्वेश्वरी आहे." ॥५८॥
राजा म्हणाला, "हे भगवान मुनीराज, ही महामाया कोण आणि तिचा अवतार मूळ स्वरूपात कुठे झाला? ॥५९॥६०॥
तिच्या उगमाची कथा, तिचे कार्य, तिचा जीवसृष्टीवरील प्रभाव, तिचे स्वरूप आणि ती देवी संरक्षक कशी झाली याची सर्व माहिती, हे विप्रवर आम्हास सांगावी.  ॥६१॥
ही सर्व माहिती तुमच्याकडून ऎकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." ॥६२॥
ऋषी म्हणाले, "जनमानसात या देवीची जी नेहमी मंगलदायिनी म्हणून प्रतिमा आहे त्याच गुणस्वरूपाची ती आहे. ॥६३॥६४॥
परन्तु तिचे अवतारकार्याचा उगम अनेक प्रकारांनी आहे तो ऎका. खरे तर देवांच्या कार्यसिद्धीसाठी या देवीचा आविर्भाग (प्रकटीकरण) झाला हे खरे. ॥६५॥
ज्यावेळी तिचे प्रकटीकरण झाले त्या वेळी संपूर्ण जगाला उत्पन्न करून भगवान् विष्णू योग निद्रेत निमग्न झाले होते आणि जग त्या वेळी बाल्यावस्थेत निद्रामय होते. ॥६६॥
भगवान् विष्णू शेषनागावर बिछायत करून कल्पांत- समयी घोर निद्रेत असता त्यांच्या कानांच्या मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस उत्पन्न झाले. ॥६७॥
भगवान् विष्णूंच्या कानातील मळापासून उत्पन्न झालेले हे दोन राक्षस ब्रह्मदेवाला उपद्रव देऊन मारण्यास उद्युक्त झाले. विष्णुच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या वेळी भगवान् विष्णूच्या सृष्टि-निर्माण-कार्यातून मुक्त झाल्याने प्रभूंच्या जवळच होते. ॥६८॥
मधु आणि कैटभ हे दोन क्रूर राक्षस चाल करून येत असलेले पाहून ब्रह्मदेवाने भगवान् विष्णूवर निद्रापटल घातलेल्या भगवती योगनिद्रेला श्री विष्णूंना उठविण्याची विनंती केली आणि करुण स्वराने तिची प्रार्थना केली. ॥६९॥
हे योगनिद्रामाये प्रभूंचे तिन्ही नेत्र उघडण्यासाठी तू त्यांना जागे कर. तू विश्वाची ईश्वरी आहेअ. जगाची पालनकर्ती अंबा आहेस. तुझ्यामुळे जगाला स्थिरता लाभते आणि अखेरीस लय आणी संहार करणे तुझ्याच हाती आहे. ॥७०॥
म्हणून हे भगवती निद्रामाये, तुझ्याकडील अतुल तेजाचा प्रभाव तू प्रभूंवर पाडून त्यांना जागे कर." ॥७१॥
भगवती निद्रामायेला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेवांनी तिची अत्यंत करुण भावनेने प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाले, "हे देवी तू स्वाहा, स्वधा आणि वषट्‌कार तूच आहेस. तू स्वरांची उद्‌गाती आहेस. ॥७२॥७३॥
तू जीवनामृतदायिनी सुधा आहेस. प्रणवाक्षर अ उ व म या स्वरांची उद्‌गाती आहेस. या त्रिमात्रा व अर्धमात्रा त्यात अनुच्चाराने मिळविली की त्यांचा उच्चार विशेष रूपाने ॐ ह्या मंत्राने होतो. ॥७४॥
परिश्रमांनंतर थकलेल्या जीवांना विश्रांती देऊन निद्रावस्था प्राप्त करून देणारी तू माता आहेस. तू सावित्री आहेस. तू ह्या विश्वाचा भार स्वत:वर घेतलेला आहेस, कारण या विश्वाची सृजनशक्ती तूच आहेस. ॥७५॥
या जगाची पालनकर्ती देवी जगदम्बा तू आहेस आणि जन्म स्थिरता समयी पालन आणि अन्ती या सृष्टि-संहाराचे कार्य तुझ्याकडूनच होते. आकारहीन जगाला तूच आकार देतेस.॥७६॥
तू संहारक शक्ती असलीस तरीही या जगाची माता आहेस. तू सर्व विद्यांची आदिम ज्ञानशक्ती आहेस. जगाची माता म्हणून महामाया आहेस. ज्ञानवंताच्या बुद्धीला चालना देणारी महामेधा आहेस. चांगले-वाईटाचा तर तम भाव जाणून घेण्यासाठी पूर्व घटनांची स्मृती देणारी महास्मृती आहेस. ॥७७॥
य जगात प्रलोभन, मोह उत्पन्न करणारी तू महामोहा अशी महादेवी व देवांमधे श्रेष्ठ असणारी महासुरी आहेस. या निसर्गाची तू प्रेरणा आहेस व सर्वांचे ठायी असणार्‍या सत्त्व, रज तम या त्रिगुणांची तू प्रेरक शक्ती आहेस. ॥७८॥
संहारक शक्‍ती असल्याने तु कालरात्री आहेस, क्लांत जनासाठी महारात्री आहेस आणि दारुण अशी मोहरात्रीही आहेस. तू लक्ष्मी, ईश्वरी, र्‍ही आणि बुद्धीला वळण देणारी बोधलक्षणा आहेस. ॥७९॥
सज्जनांसाठी विनयवती लज्जादेवी तू आहेस. संतोषाने जनकल्याण व्रत चालविणारी तू तुष्टी आहेस, मनाला शांती देणारी शांती आहेस आणि मार्ग चुकलेल्यांना तु क्षमादेवीरूपाने तारतेस. तुझ्या हातात खड्‌ग, शूळ असून तू रणकंदनात क्रूर आहेस. गदा आणि चक्र हाती असल्याने गदिनी, चक्रिणी हे सुद्धा तुझे स्वरूप आहे. ॥८०॥
रणभुमीवर भयंकर नाद करण्यासाठी तुझे हाती शंख आहे. लढण्यासाठी चाप, बाण, भुशुण्डी, परिघ आदी आयुधे आहेत. तरीही भक्तांसाठी तू सौम्यांत सौम्यतर आणि अत्यंत सौम्यतम अशी शुभंकर वत्सल सुंदरी आहेस. ॥८१॥
प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात तू परमावधी आहेस आणि परम-ईश्वरी परमेश्वरी आहेस. तू सूक्ष्मांत अती सूक्ष्म आणि त्यातही अणू-परमाणुतील तू ऊर्जा आहेस. चांगल्यांत तू अत्यंत चांगली असून सर्व विश्वाची आणि प्रत्येक वस्तूत सामावलेली अशी अखिलात्मिका आहेस. ॥८२॥
या सर्व शक्‌ती तुझ्यामधे एकवटलेल्या असल्याने अशा सर्व गुणांचे निधान असणार्‍या तुझी मी किती स्तुती करू हे मला समजेनासे झाले. जगाचे सृजन आणि पालन फक्त तुझ्यामुळेच होते. त्या तुझ्या स्तुतीला माझेजवळ शब्द कमी पडत आहेत. वास्तविक जगाचे परिपालन-पोषण करण्याची जबाबदारी भगवान् विष्णूंची आहे. ॥८३॥
त्यांनीच आता निद्रेचा आश्रय घेतल्याने मी तुझ्या शिवाय दुसरे कोणाकडे जाऊ? तू भगवान् विष्णू आणि शंकराला शरीर धारण करायला लावलेस, जन्माला घातलेस अशी तुझी थोरवी. ॥८४॥
अशा प्रभावशाली देवमातेचे स्मरण आणि स्तुती करण्यास मी असमर्थ असलो तरीही तू उदारधी असल्याने आणि तुझ्या सामर्थ्याची, प्रभावी शक्तीची मला जाणीव असल्याने मी अती नम्रपणाने तुझी स्तुती करीत आहे. ॥८५॥
हे देवी, हे माझे सहोदर मधु आणि कैटभ राक्षस दुराचारीपणाने मला मारण्यासाठी उत्सुक असून मी फार संकटात आहे, भयभीत आहे, तर तू जगत्पालन करणार्‍या जगदीशाला किंचित् काळ जागे कर.  ॥८६॥
प्रभूला जागे करून मला मारण्यासाठी माझ्यावर चालून येणार्‍या या भयंकर दोन्ही राक्षसांना मारून टाकण्यासाठी त्यांना (प्रभूला) उद्युक्त कर आणि माझे रक्षण कर. ॥८७॥
ऋषी म्हणाले, "या प्रमाणे ब्रह्मदेवांनी रात्रीदेवीची त्यावेळी स्तुती केली. ॥८८॥८९॥
"भगवान् विष्णूंना उठवून मधु आणि कैटभ या राक्षसांचा संपूर्ण नाश करण्याची तू विनंती कर." त्यावेळि रात्रीदेवी प्रभूंच्या नेत्र, नाक, बाहू, ह्रदयातून अव्यक्तातून प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मदेवासमोर उभी राहिली. ॥९०॥
भगवान् जगन्नाथाच्या सर्वावयांतून बाहेर पडलेली रात्रीदेवी व्यक्तरूपाने नवजन्म झालेल्याप्रमाणे उभी राहिल्यानंतर भगवान् विष्णू निद्रापाशातून मुक्त होऊन जागे झाले. ॥९१॥
एकार्णवाच्या गाढ निद्रेतून जागे झाल्यावर प्रभूंनी अती पराक्रमी पण दुराचारी व दुरात्मा असणार्‍या मधु आणि कैटभ या राक्षसांना पाहिले. ॥९२॥
ब्रह्मदेवाला मारण्यासाठी करीत असलेले राक्षसांचे चाळे त्यांनी पाहिले व ते रागाने व संतापाने लाल झाले. उठून प्रभूंनी राक्षसांशी घोर युद्धास प्रारंभ करून शस्त्रमारांनी त्यांचा (राक्षसांचा ) संहार करण्याची शर्थ केली. ॥९३॥
मधु आणि कैटभ राक्षसांशी प्रभूंचे हे युद्ध पाच हजार वर्षे चालले. शेवटी  महामायेने त्यांना मोहाच्या जाळ्यात अडकविले. कारण त्या बळाने उन्मत्त झालेल्या राक्षसांचा वध करणे भगवंतालाही अशक्य झाले. ॥९४॥
मोहाच्या आवरणाखाली आल्यानंतर मात्र आपण अजिंक्य आहोत असे वाटून व भगवान् विष्णूच्या दुर्दम्य पराक्रमावर खूष होऊन ते म्हणाले, "प्रभू आम्ही आपल्यावर प्रसन्न आहोत. आमच्याकडून वर मागून घ्यावा." ॥९५॥
भगवान् म्हणाले, "पुत्रांनो ! तुम्ही जर खरोखरच माझ्या पराक्रमावर संतुष्ट झालेले असाल तर तुमचे मरण माझ्या हातून घडावे असा वर मला द्या. याशिवाय माझ्यासाठी मी तुमच्या जवळ दुसरे काय मागावे?" ॥९६॥९७॥९८॥
ऋषी म्हणाले, "अशा प्रकारे मोहाच्या आवरणाखाली आल्याने दोन्ही राक्षस फसले. त्या वेळी पृथ्वी पाण्याच्या आवरणाखाली आलेली त्यांनी दिसली.॥९९॥१००॥
ते पाहून राक्षस भगवान् विष्णूला म्हणाले, "पिताजी ज्या ठिकाणी पाण्याने हे जग वेढलेले नसेल अशा कोरड्या स्थानी आपण आमचा वध करावा." ॥१०१॥
सुमेधा ऋषी नंतर म्हणाले, "असे ऎकल्यावर त्या दोन्ही राक्षसांना आपल्या मांडीवर घेऊन शंख, चक्र, गदाधारी श्री भगवान् विष्णूंनी आपल्या हातातील चक्राने त्यांची डोकी कापून त्यांचा वध केला.  ॥१०२॥
अशा प्रकारे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही संकटात सापडल्यावर स्वत:  देवीला शरण जावे लागले. ती प्रत्यक्ष अवतीर्ण झाली व ब्रह्मदेव तिच्या प्रभावाने संकटमुक्त झाले. देवीने यानंतर केलेल्या अनेक पराक्रमांचे प्रसंग मी यापुढे वर्णन करून सांगतो ते ध्यानपूर्वक ऎकवे. ऎं ॐ"
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये
मधुकैटभवधो नाम प्रथमोऽध्याय: ॥१॥
उवाच १४, अर्धश्लोका: २४, श्लोका: ६६,
एवमादित: १०४ ॥
अशी ही मार्कण्डेय पुराणातील सावर्णिक मन्वतर काळातील मधु-कैटभ-वध नावाची पहिली कथा.
उवाच १४, अर्ध श्लोक२४, श्लोक ६६, एकूण १०४.
श्री महामाया विजयते

References : N/A
Last Updated : September 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP