षष्ठोऽध्याय:
ध्यानम्
ॐ नागाधीश्वरविष्टरां फणिफणोत्तंसोरुरत्नावली-
भास्वद्देहलतां दिवाकरनिभां नेत्रत्रयोद्भासिताम् ।
मालाकुम्भकपालनीरजकरां चन्द्रार्धचूडां परां
सर्वज्ञेश्वरभैरवाङ्कनिलयां पद्मावतीं चिन्तये ॥
'ॐ' ऋषिरुवाच ॥१॥
इत्याकर्ण्य वचो देव्या: स दूतोऽमर्षपूरित: ।
समाचष्ट समागम्य दैत्यराजाय विस्तरात् ॥२॥
तस्य दूतस्य तद्वाक्यमाकर्ण्यासुरराट् तत: ।
सक्रोध: प्राह दैत्यानामधिपं धूम्रलोचनम् ॥३॥
हे धूम्रलोचनाशु त्वं स्वसैन्यपरिवारित: ।
तामानय बलाद् दुष्टां केशकर्षणविह्वलाम् ॥४॥
तत्परित्राणद: कश्चिद्यदि वोत्तिष्ठतेऽपर: ।
स हन्तव्योऽमरो वापि यक्षो गन्धर्व एव वा ॥५॥
ऋषिरुवाच ॥६॥
तेनाज्ञप्तस्तत: शीघ्रं स दैत्यो धूम्रलोचन: ।
वृत: षष्ट्या सहस्राणामसुराणां द्रुतं ययौ ॥७॥
स दृष्ट्वा तां ततो देवीं तुहिनाचलसंस्थिताम् ।
जगदोच्चै: प्रयाहीति मूलं शुम्भनिशुम्भयो: ॥८॥
न चेत्प्रीत्याद्य भवती मद्भर्तारमुपैष्यति ।
ततो बलान्नयाम्येष केशाकर्षणाविह्वलाम् ॥९॥
देव्युवाच ॥१०॥
दैत्येश्वरेण प्रहितो बलवान् बलसंवृत: ।
बलान्नयसि मामेवं तत: किं ते करोम्यहम् ॥११॥
ऋषिरुवाच ॥१२॥
इत्युक्त: सोऽभ्यधावत्तामसुरो धूम्रलोचन: ।
हुंकारेणैव तं भस्म सा चकाराम्बिका तत: ॥१३॥
अथ क्रुद्धं महासैन्यमसुराणां तथाम्बिका ।
ववर्ष सायकैस्तीक्ष्णैस्तथा शक्तिपरश्वधै: ॥१४॥
ततो धुतसट: कोपात्कृत्वा नादं सुभैरवम् ।
पपातासुरसेनायां सिंहो देव्या: स्ववाहन: ॥१५॥
कांश्चित् करप्रहारेण दैत्यानास्येन चापरान् ।
आक्रम्य चाधरेणान्यान् स जघान महासुरान् ॥१६॥
केषांचित्पाटयामास नखै: कोष्ठानि केसरी ।
तथा तलप्रहारेण शिरांसि कृतवान् पृथक् ॥१७॥
विच्छिन्नबाहुशिरस: कृतास्तेन तथापरे ।
पपौ च रुधिरं कोष्ठादन्येषां धुतकेसर: ॥१८॥
क्षणेन तद्बलं सर्वं क्षयं नीतं महात्मना ।
तेन केसरिणा देव्या वाहनेनातिकोपिना ॥१९॥
श्रृत्वा तमसुरं देव्या निहतं धूम्रलोचनम् ।
बलं च क्षयितं कृत्स्नं देवीकेसरिणा तत: ॥२०॥
चुकोप दैत्याधिपति: शुम्भ: प्रस्फुरिताधर: ।
आज्ञापयामास च तौ चण्डमुण्डौ महासुरौ ॥२१॥
हे चण्ड हे मुण्ड बलैर्बहुभि: परिवारितौ ।
तत्र गच्छत गत्वा च सा समानीयतां लघु ॥२२॥
केशेष्वाकृष्य बद्ध्वा वा यदि व: संशयो युधि ।
तदाशेषायुधै: सर्वैरसुरैर्विनिहन्यताम् ॥२३॥
तस्यां हतायां दुष्टायां सिंहे च विनिपातिते ।
शीघ्रमागम्यतां बद्ध्वा गृहीत्वा तामथाम्बिकाम् ॥ॐ॥२४॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहत्मये शुम्भनिशुम्भसेनानीधूम्रलोचनवधो नाम
षष्ठोऽध्याय: ॥६॥
उवाच ४, श्लोका: २०, एवम् २४
एवमारित: ॥४१२॥
श्री अंबिका विजयते
नागराजाच्या आसनावर बसलेली देवी, तिचे मुखमंडल नागफणीवरील नागमण्यांच्या तेजाने तेजस्वी झालेले, तिची कुसुमाकार देहलत तेजस्वी सूर्याच्या समान, तिची निश्चयी तेजोप्रखरता तीन्ही डोळ्यांत समाविष्ट झालेली, सर्वज्ञेश्वर भगवान्विष्णूच्या अंकावर बसलेल्या अशा देवी पद्मावती श्री गौरीला आमचे शतश: नमस्कार असोत. तिच्या शिरोभागीचा अर्धवलंकातिचंद्रकिरीट आम्हाला सतत स्फूर्ती, सुख देवो.
ऋषी म्हणाले, या प्रमाणे देवीने शूंभाच्या दूताला दिलेला प्रतिनिरोप खूप असह्य झाला व तो रागाने परत येऊन त्याने आपल्या धन्याला-दैत्यराजाला विस्तारपूर्वक सांगितला. ॥१।२॥
दूताकरवी मिळालेला देवीचा या प्रकारचा प्रतिनिरोप ऎकून दैत्यराज संतापाने जवळजवळ वेडाच झाला आणि रागाने त्याने धूम्रलोचन नावाच्या आपल्या सेनानीला बोलावले व त्याला म्हणाला-
॥३॥
हे धूम्रलोचना! तुझ्याबरोबर तुला पाहिजे तेवढे सैन्य घेऊन तू देवीच्या वसतिस्थानावर जाऊन त्या दुष्टेला जबरदस्तीने बांधून आण किंवा केसांना धरून विव्हळ स्थितीत माझ्यासमोर उपस्थित कर. ॥४॥
तिच्या रक्षणासाठी इतर कोणी देव-देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर येऊ पाहतील तर त्यांचे पारिपत्य करून, त्यांना ठार करून, काय वाटेल त्या परिस्थितीत तिला ओढीत ओढीत घेऊन ये. ॥५॥
ऋषी म्हणाले, "दैत्यराजाची अशी आज्ञा घेऊन धूम्रलोचन राक्षसवीर साठ हजार राक्षससेना घेऊन कोणतीही उशीर न करता देवीच्या वसतिस्थानाकडे हिमालय प्रांती निघाला. ॥६॥७॥
त्याने हिमालय-पर्वतस्थानी त्या रमणीय पर्वतीय सर्वांगसुंदर वनविभागात देवीला पाहिले आणि म्हणाला, "हे स्त्रिये, तू माझ्याबरोबर माझे स्वामी शुंभ-निशुंभाकडे बर्या बोलाने चल. ॥८॥
शांतपणाने तू माझ्या स्वामींकडे न आलीस आणि उगाच लढाई करण्याचा आव आणलास तर मी तुला जबरदस्तीने तुझ्या केसांच्या झिपर्या धरून ओढीत नेईन." ॥९॥
देवी म्हणाली, "हे राक्षसवीरा, तुला तुझ्या दैत्यराजाने पाठविले आहे, तू स्वत: शक्तिशाली व ताकदवान आहेस. तू जर मला जबरदस्तीने केसांना धरून ओढीत न्यायचे म्हणतोस, तर मी एक अबला तुझे काय करणार? तुझ्यापुढे किती टिकणार?" ॥१०॥११॥
ऋषी म्हणाले, "हे देवीचे बोलणे ऎकल्यावर असुर धूम्रलोचन धावत धावत देवीला पकडण्यास आला, पण तो तिच्या जवळ येण्याआधीच अंबिकेने एका फुंकरीने त्याची राख करून टाकली. ॥१२॥१३॥
आणि अतिशय क्रोध, आवेशाने आपल्या हातांतील धनुष्यबाणांनी, शक्ती, परशु या शस्त्रांनी असुरसेनेत संहार सुरू केला. बाणांचा वर्षाव केला. तीक्ष्ण त्रिशूळाने अनेकांना भोसकले. ॥१४॥
देवीचे वाहन सिंह यालाही राग आला व मोठ्या त्वेषाने त्याने असुरसेनेत शिरून असुरांशी संग्राम सुरू केला. त्याने केलेली गर्जना इतकी भयानक होती की, प्रत्यक्ष भैरवालाही त्या गर्जनेची भीती वाटावी. ॥१५॥
सिंहाने कुणाला आपल्या पंजांनी मारले, कित्येक दैत्यांना आपल्या दातांनी चावून ठार केले. कित्येकांना आपल्या जबड्याने फटकारले, तर कित्येक आपल्या भयंकर दाढांखाली रगडून टाकले. ॥१६॥
सिंहाने आपल्या नखांनी कित्येक शत्रूंची पोटे फाडली, हात व मस्तके तोडली, आपली आयाळ हलवून भयंकर क्रोधाने दैत्य सैन्यातील वीरांची हत्या करून रक्त प्राशन केले. ॥१७॥
हातपाय तुटलेले, संग्राम-स्थळी रक्त वहात आहे, पोटे फुटून सर्व आतडी बाहेर आलेली आहेत, असे विव्हळणारे राक्षसवीर देवीच्या सिंहाच्या क्रोधाला बळी पडले व सिंह त्यांचे रक्त पीत आहे, मांस खात आहे असे भीषण दृश्य तेथे दिसू लागले. ॥१८॥
अशा प्रकारे रागाने व आवेशाने उन्मत्त झालेल्या देवीच्या सिंहाने राक्षससेनेचा अती थोड्याशा काळातच धुव्वा उडविला व त्यांचे संख्याबल घटविले. ॥१९॥
सिंहाने असुरसेनेचा व देवीने धूम्रलोचनाचा अशाप्रकारे रणभूमीत संहार केल्याचे वृत्त राक्षसराज शुंभाला समजले. ॥२०॥
तो दैत्यराज शुंभ हे वृत्त ऎकून संतापाने लाला झाला. त्याला राग अनावर झाल्याने त्याचे ओठ थरथरू लागले, डोळे लाल झाले व त्याने चण्ड आणि मुण्ड या महादैत्यांना बोलावून आज्ञा केली. ॥२१॥
हे चण्ड वीरा आणि मुण्डवीरा, तुम्ही प्रचंड सेनासागर बरोबर नेऊन देवी असेल त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब देवीचे पारिपत्य करा. ॥२२॥
देवीशी लढून तिला जिंकून युद्धाला लागणार्या सर्व सामग्रीनिशी येताना युद्धत तिला कोणी मदत करतील असा संशय असला तरी त्यांचा नायनाट करून देवीला पकडून, बांधून घालून, तिला केसांनी ओढीत फरफटात फरफटत माझ्या समोर आणा. ॥२३॥
ती जर जिवंत पकडली गेली नाही तर तिला मारून, तिच्या सिंहाचा वध करून प्रेते बांधूनच येथे माघारी या. कोणत्याही परिस्थितीत पराभव न स्वीकारता जिवंत वा मृत ती देवी तिच्या सिंहासह येथे उपस्थित करणे हे तुमचे काम आहे व तशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. ॥२४॥
असा हा श्रीमार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरा-समयी घडलेला देवीमाहात्म्य कथेतील धूम्रलोचन वध नावाचा सहावा अध्याय.