* दधिव्रत :
श्रावण शु. द्वादशी दिवशी दधिव्रत करतात. त्यावेळी दह्याचा उपयोग करतात. जर त्या दिवशी विमानारूढ भगवान श्रीधराची पूजा करून अहोरात्र आनंदोत्सव केला तर पंचयज्ञासमान फळ मिळते.
* पंचमहापापनाशन व्रत:
हे एक व्रत श्रावण शु. द्वादशीला आणि पौर्णिमेला श्रीकृष्णाच्या जगन्नाथ, देवकीसुत इ. बारा रूपांची पूजा करतात आणि या महिन्याच्या अमावस्येला ब्राह्मणांना तीळ, मूग, गूळ, भात, इ. पदार्थांचे भोजन घालतात. त्यावेळी पंचरत्ने दान देतात.
फल - पंचमहापातकांपासून मुक्त.