विनायकी :
या चतुर्थीस 'कामदा' असे अभिधान आहे. या दिवशी सर्व देवांनी अनुष्ठाने करून गणेशास प्रसन्न करून घेतले. त्यांच्या मनकामना परिपूर्ण झाल्या व मदनाला जगात विविध रूपात राहण्यास जागा देऊन रतीला सौभाग्यदान केले. म्हणून या चतुर्थीस ' कामदा' म्हणतात. या दिवशी विघ्नेश्वर गणेशाची पूजा, प्रार्थना करुन एका ब्राह्मणास लाडवाचे भोजन व दक्षिणा द्यावी. हे व्रत विधिपूर्वक करण्यास धन-संपत्तीचा अभाव राहत नाही.