१ ईशानव्रत :
पौशह शु. चतुर्दशीचे व्रत करून पुष्पयुक्त पौर्णिमा असेल तर पांढर्या वस्त्राने आच्छादलेल्या वेदीवर चारी बाजूंनी अक्षतांचे पुंज ठेवावेत व मध्यावर एक ठेवावा. त्यावर पूर्वेस विष्णू, पश्चिमेस ब्रह्मा, दक्षिणेस सूर्य व उत्तरेस रुद्र यांची स्थापना करावी. मध्यावर ईशान स्थापन करून त्याची यथाविधी व शास्त्रोक्त पूजा करावी आणि एक गौमिथुन (गाय व बैल) दान द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्वतः गोमूत्र पिऊन उपवास करावा. याप्रमाणे पाच वर्षे केल्यास हे व्रत पूर्ण होते. गोदानात एक विशेष हा की, पहिल्या वर्षापासून एक बैल पण वाढत्या संख्येने दान द्यावीत. बैल गोर्हा ( न जुंपलेला) असावा. या व्रताने सर्व प्रकारचे सुख मिळून लक्ष्मीची प्राप्ती होते.
२ विरूपाक्षपूजन :
पौष शु. १४ ला विरूपक्षाची पूजा करावी व तदनुकूल उपकरण महोक्ष (मोठा बैल किंवा उंट) याचे दान करावे. याप्रमाणे प्रत्येक शु. चतुर्दशीला वर्षभर करण्याने राक्षसादींचे भय राहत नाही व घरात सुखशांती नांदते.