चैत्र शु. अष्टमी
Chaitra shuddha Ashtami
१ अशोककलिकाप्राशनव्रत :
हे व्रत चैत्र शु. अष्टमीला करतात. त्या दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे उरकून अशोकवृक्षाची पूजा करावी. त्याची फुले किंवा कोमलपर्णयुक्त आठ कळ्या घेऊन त्यांनी शिवाची पूजा करावी. 'त्वामशोक नमाम्येनं मधुमाससमुद्भवम् । शोकार्तः कलिकां प्राश्य मामशोकं सदा कुरु ॥' असे म्हणून आठ कळ्या भक्षण करुन व्रत केले असता व्रती शोकरहित होतो. त्या दिवशी बुधवार किंवा पुनर्वसु नक्षत्र असेल किंवा दोन्ही असतील तर व्रती मनुष्याला कोणतेही दुःख राहात नाही,
२ भवानीव्रत :
भवानीचा अवतार चैत्र शु. अष्टमीला झाला म्हणून त्या दिवशी देवीचे पूजन करुन 'अनरसे' आदीचा नैवद्य दाखवावा. या दिवशी अष्टमी नवमीयुक्त घ्यावी. जो मनुष्य अष्टमीस भवानीचे दर्शन घेईल, तो कदापी शोक पावणार नाही. सर्वकाल आनंदी राहील. या दिवशी पुनर्वसुनक्षत्र बुधवारयुक्त ही तिथी असता प्रातःकाळी यथाविधी स्नान केले असता, वाजपेय यज्ञाचे फल प्राप्त होते. या दिवशी ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान केले असता ब्रह्मपद प्राप्त होते. त्याचप्रमाणे शुद्ध व नियतमन होऊन सर्व चैत्र महिना ब्रह्मपुत्रतीर्थात स्नान करील त्यास मोक्षप्राप्ती होईल.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP