हरि नामोच्चारानें पापांचा क्षणांत क्षय.
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
हरी नामजपानें अग्निरुपता
तृण अग्नीं मेळे समरस झालें । तैसें नामे केलें जपता हरी ॥२॥
हरि नामोच्चाराने भूतबाधेची पिछेहाट
हरि उच्चारणीं मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भय याचें ॥३॥
ज्ञानेश्वरमहारांजांचा हरि हा सर्वसमर्थ असुन त्यांचे वर्णन करतानां उपनिषदें थकली
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥